IIFA Awards 2025 :‘अमर सिंह चमकिला’ ‘पंचायत ३’ने गाजवला सोहळा!

Indian Cinema : शुटींगसाठी लागली २३ वर्ष; वर्ल्ड रेकॉर्ड आणि बरंच काही….
भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास फार जुना आहे. या चित्रपटसृष्टीत दरवर्षी अनेक चित्रपट येतात आणि प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतात. ठराविक चित्रपटांना प्रेक्षक फारच उत्सफुर्त प्रतिसाद देतात तर काही चित्रपटांना केराची टोपलीही दाखवतात. मात्र, हिंदी असो किंवा अन्य कुठल्याही भाषेतील चित्रपटसृष्टी असो बऱ्याच कलाकृतींनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये भारताची मान उंचावली आहे. जाणून घेऊयात असे कोणते चित्रपट आहेत ज्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. (Guinness book of world record)
यादें
१९६४ साली प्रदर्शित झालेल्या ‘यादें’ (Yaadein) या चित्रपटात केवळ एकच अभिनेते होते ते म्हणजे सुनील दत्त. जगातील हा एकमेव चित्रपट आहे ज्यात केवळ एकच अभिनेता असून चित्रपटाची कथा त्याच्याभोवती फिरते. आणि याच कारणामुळे Sunil Dutt अभिनित, निर्मित आणि दिग्दर्शित यादें या चित्रपटाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आले. या चित्रपटाची आणखी एक विशेष बाब म्हणजे चित्रपटात नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्या पत्नीची भूमिका केली असूनही चित्रपटात त्यांचं अस्तित्व केवळ आवाजातून दाखवलं आहे. (Indian Cinema History)

कहो ना प्यार है
ह्रतिक रोशन याचा डेब्यू चित्रपट असणाऱ्या ‘कहो ना प्यार है’ (Kaho Na Pyaar Hai) या चित्रपटाची नोंदही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. २००० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ७८.९३ कोटींचं लाईफटाईम कलेक्शन केलं आहे. केवळ इतकंच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर ९२ पुरस्कार जिंकणारा हा एकमेव चित्रपट ठरल्यामुळे या चित्रपटाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली गेली आहे. (Entertainment Masala)

===========
हे देखील वाचा : Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय
===========
इंद्रसभा
१९३२ साली प्रदर्शित झालेल्या ‘इंद्रसभा’ (Indrasabha) या संगीत-नृत्य चित्रपटात तब्बल ७२ गाणी होती. आत्तापर्यंत इतकी गाणी असणारा एकही चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत तयार झाला नाही. आणि याच कारणामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या चित्रपटाची दखल घेतली होती.(Untold Stories)

लव एन्ड गॉड
एखाद्या चित्रपटाच्या शुटींगसाठी किमान काही महिने किंवा जास्तीत १-२ वर्ष लागू शकतात; बरोबर ना? पण ‘लव एन्ड गॉड’ (Love & god) हा चित्रपट शूट होण्यासाठी तब्बल २३ वर्ष लागली होती. याच कारणामुळे ‘लव एन्ड गॉड’ चित्रपटाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. १९६३ साली या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली होती. पण त्यानंतर चित्रपटातील प्रमुख अभिनेते गुरुदत्त यांचं निधन झालं, त्यानंतर १९७० मध्ये संजीव कुमार यांच्यासोबत शूट सुरु झालं आणि तेव्हा दिग्दर्शक आसिफ यांची तब्येत बिघडली आणि त्यात त्यांचं निधन झालं. अशा अनेक अडचणींचा सामना करत अखेर आसिफ यांच्या पत्नीने उरलेलं शुटींग पुर्ण करत १९८६ साली चित्रपट प्रदर्शित केला. (Trending News)
