
Bollywood Diva Rekha बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार?
बॉलिवूडला पडलेलं एक लाघवी आणि सुखद स्वप्न म्हणजे रेखा (Rekha)…. सौंदर्य, अदाकार, उत्कृष्ट नृत्यांगना, दर्जेदार अभिनय या सगळ्या कलांनी रेखा परिपुर्ण आहेत… बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनयाची सुरुवात करत आज त्यांना इंडस्ट्रीत ६० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे… पण आजही त्यांची सुंदरता नवख्या अभिनेत्रींना मागे टाकणारी आहे यात शंकाच नाही… ६०-७०चं दशक गाजवलेल्या रेखा खरं तर २०१४ नंतर कुठल्याच हिंदी चित्रपटात दिसल्या नाहीत… परंतु, येत्या काळात कदाचित रेखा कमबॅक करणार अशी चर्चा सिनेविश्वात जोर धरु लागली आहे… नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात… (Bollywood News)

तर, झालंय असं की द फेमस फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा (Manish Malhotra) यांनी इंडस्ट्रीत दिग्दर्शन आणि निर्मिती या दोन्ही क्षेत्रात पदार्पण केलं आहे… आणि त्यांची निर्मिती असणाऱ्या आगामी ‘गुस्ताख इश्क’ (‘Gustaakh Ishq’) या चित्रपटात रेखा कॅमिओ रोल करणार असं म्हटलं जात आहे… बऱ्याच वर्षांपासून मनिष मल्होत्रा आणि रेखा यांची मैत्री असून रेखा यांची अभिनयाची लेगसी आजच्या पिढीला समजावी यासाठी मनिष प्रयत्न करत असल्याचं देखील सांगितलं जात आहे… ‘गुस्ताख इश्क’ या चित्रपटात विजय वर्मा आणि फातिमा शेख यांची प्रमुख भूमिका असून नसीरुद्दीन शाह (Nasuriddin Shah) देखील यात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत… आणि नसीरुद्दीन शाह यांच्या पात्राशी जोडणारं एक पात्र रेखा यांनी साकारावं अशी मेकर्स आणि निर्माते मनिष मल्होत्रा यांची इच्छा आहे…. (Entertainment News)

याबद्दल न्यूज १८शी बोलताना विजय वर्मा (Vijay Verma) म्हणाला होता की, गुस्ताक-ए-इश्क चित्रपटात रेखा यांनी काम करावं अशी आम्हा सगळ्यांचीच इच्छा आहे… पण ज्या पात्रासाठी त्यांचा विचार केला जात होता ते पात्र फार कमी काळासाठी स्क्रिनवर असणार आहे आणि ज्या रेखा यांनी आपल्याला अजरामर कलाकृती दिल्या आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीत इतकं काम करुन ठेवलं आहे त्यांना इतकी लहान भूमिका कशी द्यायची या संभ्रमात सगळे आहेत… खरं तर फार महत्वाची भूमिका आहे पण कमी स्क्रिनटाईम असल्यामुळे रेखा यांना ती द्यावी आणि त्यासाठी केवळ अर्ध्या दिवसासाठी त्यांना शुटींगला बोलवावं हे कुणालाच पटत नसल्यामुळे हा प्लॅन ड्रॉप झाला आहे”…

तर, रेखा यांचे मित्र मनिष मल्होत्रा असं म्हणाले की, “नक्कीच भविष्यात रेखा यांच्यासोबत चित्रपट नक्की करणार आहे… त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशी स्क्रिप्ट हातात आली की रेखा पुन्हा एकदा स्क्रिनवर आपल्या सगळ्यांना दिसतील… त्यामुळे सगळेच आता पुन्हा एकदा रेखा यांच्या कमबॅकसाठी उत्सुक आहेत…”
================================
हे देखील वाचा : Rekha-Amitabh Bachchan यांच्या नात्याचा ‘सिलसिला’!
================================
सध्या, बॉलिवूडचे अनेक लेजेंडरी कलाकार कमबॅक करत आहेत… तर अमिताभ बच्चन, शक्ती कपूर यांच्यासारखे ज्येष्ठ अभिनेते सतत काम करत आहेत… बॉलिवूडच्या ग्रेट अभिनेत्रींबद्दल बोलायचं झालं तर झीनत अमान, डिंपल कपाडिया, फरिदा जलाल चित्रपट, वेब सीरीजमध्ये कामं करत आहेतच.. दरम्यान २०१४ मध्ये ‘सुपर नानी’ (Super Nani) या चित्रपटात रेखा यांनी शेवटचं स्क्रिनवर काम केलं होतं… त्यानंतर ‘शमिताभ’ आणि ‘यमला पगला दीवाना ३’ मध्ये त्यांनी कॅमिओ केला होता… आता, रेखा यांचा कमबॅक आपल्या पालकांसाठी आणि ९०च्या दशकातील रेखा यांच्या प्रत्येक फॅन्ससाठी फार महत्वाचा ठरणार यात शंकाच नाही… (Movies of Rekha)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi