Raid 2 : अजय-रितेशच्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; सांगितले ‘हे’

Esha Deol: ईशा देओलने अमृता रावला कानाखाली का मारली होती?
बॉलिवूडमध्ये जितक्या चर्चा कलाकारांच्या मैत्रीच्या होतात तितक्याच त्यांच्या भांडणाच्या किंवा मतभेदांच्याही होतात. इंडस्ट्रीमधीव अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचं एकमेकांशी कधीच पटलं नाही. सेटवर त्यांच्यात होणारे वाद बऱ्याचदा पेज ३ चा कंटेन्ट असतो. असाच ईशा देओल (Isha Deol) आणि अमृता राव (Amrita Rao) यांच्यातील वाद आणि त्यातून ईशाने अमृताला लगावलेली एक सणसणीत चपराख याबद्दल तुम्हाला माहित आहे का? नाही? तर नक्की वाचा हा किस्सा…(Entertainment masala)

तर झालं असं की, २००६ मध्ये ‘प्यारे मोहन’ (Pyaare Mohan) हा एक चित्रपट आला होता. ज्यात फरदीन खान (Fardeen Khan), विवेक ऑबरॉय (vivek Oberoi), अमृता राव आणि ईशा देओल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटात फरदीन आणि विवेकने आंधळा आणि बहिऱ्याचं पात्र साकारलं होतं. या चित्रपटाच्या शुटवेळी अमृताने ईशाला दिग्दर्शक इंद्र कुमार आणि कॅमेरामनच्या समोर अपशब्दांमध्ये सुनावलं होतं. आणि ते ऐकून तिळपापड झालेल्या ईशाने अमृताच्या कानशिलात लगावली होती. (Entertainment news)

ईशा देओलने बऱ्याच वर्षांनंतर आता या घटनेबद्दल खुलासा करत मी अमृताच्या कानाखाली मारल्याचा मला पश्चाताप नाही असं म्हटलं आहे. “माझ्या आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी, त्या क्षणी मी तिला कानाखाली मारली. मला याबद्दल कोणताही पश्चाताप नाही.” दरम्यान, झालेल्या घटनेनंतर स्वत:ची चूक मान्य करत अमृताने ईशाची माफी देखील मागितली होती. याबद्दल ईशाने सांगितले की, “आता आमच्यात सर्व काही ठीक आहे.” ईशा देओलने स्पष्ट केले की, ती एका सुसंस्कृत कुटुंबातून आली आहे आणि अशा प्रकारची कृती तिच्या स्वभावात नाही, परंतु जर कोणी तिच्या आत्मसन्मानावर आघात करत असेल, तर ती स्वतःसाठी स्टॅन्ड घेऊ शकते. (Bollywood gossips)
दरम्यान, ईशा देओलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर २००२ मध्ये ‘कोई मेरे दिल से पुछे’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘ना तुम जानो ना हम’, ‘कुछ तो है’, ‘युवा’, ‘धुम’, ‘नो एन्ट्री’, ‘काल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने कामं केली आहेत. (Esha Deol Movies)
==============
हे देखील वाचा : Supriya : चमेलीच्या भूमिकेत सुप्रिया नाही तर पल्लवी जोशी असत्या?; काय आहे किस्सा…
==============
तर अमृता राव हिने ‘इश्क विश्क’, ‘मै हुं ना’, ‘विवाह’, ‘वा लाईफ हो तो ऐसी’, ‘जॉली एल.एल.बी’ अशा चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. (Amrita Rao Movies)