‘या’ डायलॉगमुळेच राजेश खन्ना चित्रपटासाठी सिलेक्ट झाला…
मीडियाने ज्याला भारतातील पहिला ऑफिशियल सुपरस्टार म्हणून संबोधले त्या राजेश खन्ना (Rajesh Khanna) या अभिनेत्याने १९६९ ते १९७४ या पाच वर्षाच्या काळात प्रेक्षकांवर गारुड घातले होते. सलग सोळा ओळीने सिल्वर जुबली सिनेमे देण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर अजूनही कायम आहे. राजेश खन्नाने (Rajesh Khanna) त्याच्या आधीच्या पिढीच्या त्रिदेवचे म्हणजे दिलीप राज देव या तिघांच्याही अभिनयातील प्लस पॉईंट्स खूप चांगल्या पद्धतीने आपल्या अभिनयात सामील करून घेतले. त्यामुळे त्याच्या इमोशनल, म्युझिकल, फिलॉसॉफिकल, सोशल या कुठल्याही जॉनरच्या मूव्हीमध्ये तो कधीही अनफिट वाटला नाही. राजेश खन्ना (Rajesh Khanna) प्रामुख्याने आठवला जातो त्याच्या अभिनयासाठी, त्याच्या गाण्यासाठी आणि त्याच्या रोमँटिक इमेजसाठी. बुलंद डायलॉग बाजी हा काही त्याचा प्रांत नव्हता. तरी पण त्याच्या काही डायलॉगवर प्रेक्षक जाम फिदा होते. रो मत पुष्पा आहे आय हेट टियर्स (अमर प्रेम) जिंदगी और मौत उपर वाले के हाथ में है जहांपनाह, जिसे ना आप बदल सकते हैं ना मैं। हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं, जिसकी डोर उपर वाले के हाथ बंधी हैं, कब, कौन, कैसे उठेगा, ये कोई नहीं जानता (आनंद) हे त्याचे संवाद त्या काळात लोकप्रिय झाले होते. पण तरीही प्रामुख्याने राजेश खन्ना आठवतो तो त्याच्या अभिनयासाठीच! परंतु तुम्हाला माहित आहे का, एका डायलॉग मुळेच राजेश खन्ना (Rajesh Khanna) चित्रपटासाठी सिलेक्ट झाला होता. काय होत हा किस्सा?
राजेश खन्ना (Rajesh Khanna) सिनेमात येण्यापूर्वी रंगभूमीवर कार्यरत होता. युनायटेड प्रोड्यूसर्स आणि फिल्मफेयर यांनी साठच्या दशकाच्या मध्यावर एक टॅलेंट हंट स्पर्धा घेतली होती. देशभरातून तब्बल दहा हजार हून अधिक तरुणांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. राजेश खन्नाने (Rajesh Khanna) वर्तमानपत्रातील कटिंग व्यवस्थित भरून सोबत तीन फोटो या स्पर्धेसाठी पाठवले होते. राजेश खन्नाला या टॅलेंट हंट साठी बोलावणे आले. त्यावेळी त्यांना एक डायलॉग देखील पाठवण्यात आला होता ज्याची तयारी करून त्यांना स्पर्धेत उतरायचे होते. राजेश खन्नाचा जेंव्हा मुलाखतीसाठी नंबर आला त्यावेळी एका मोठ्या हॉलमध्ये नामांकित दिग्दर्शकांची मोठी फौज समोर बसली होती. त्यात विमल रॉय, बी आर चोप्रा, एच एस रवेल, जी पी सिप्पी, शक्ती सामंत, जे ओम प्रकाश आदी बडी बडी मंडळी होती. राजेश खन्ना (Rajesh Khanna) बऱ्यापैकी नर्व्हस झाला होता. ज्या वेळेला शक्ती सामंत यांनी त्याला सांगितले ,”आम्ही तुम्हाला एक डायलॉग पाठवला होता तो आम्हाला म्हणून दाखवा.” त्यावर राजेश खन्नाने (Rajesh Khanna) म्हणाला,” तुम्ही डायलॉग पाठवला पण बाकी गोष्टी कुठे पाठवल्या?” सर्व जण प्रश्नाकिंत चेहऱ्याने पाहू लागले. तेंव्हा राजेश म्हणाला ,” कारण तुम्ही पाठवलेला जो डायलॉग आहे ज्यात तो नायक त्याच्या आईला म्हणतो,” हां, मै उस नाचने वाली से प्यार करता हू और उसके साथ शादी करने के लिए तैय्यार हू…“ तो नायक नेमक्या कोणत्या पार्श्वभूमीवरचा आहे? तो गरीब आहे, श्रीमंत आहे, बेकार आहे, ऑफिसर आहे, बिजनेसमन आहे? त्याचा सामाजिक स्तर कसा आहे? तो बंगल्यात राहत असतो, फ्लॅटमध्ये राहत असतो, की झोपडीत राहत असतो? हे जोपर्यंत मला कळणार नाही तोपर्यंत मी तो डायलॉग कसा काय आपल्यासमोर सादर करू शकतो? ”
======
हे देखील वाचा : या कव्वालीमधील चूक मनमोहन देसाईंनी दुरुस्ती केली…
=====
समोर बसलेल्या सर्व दिग्दर्शकांना हा उमेदवार आणि त्याचे उत्तर मोठे प्रोमिसिंग वाटले. कारण त्यांनी देखील हा विचार कधीच केला नव्हता. समोर असलेला कलाकार हा अतिशय अभ्यास करून आणि विचार करून आला आहे, हे त्यांच्या लक्षात आले. चोप्रांनी त्याला विचारले,” क्या आप थेटरसे ताल्लुख रखते हो? त्यावर राजेश खन्नाने (Rajesh Khanna) हो म्हणून सांगितले मग चोप्रांनी त्याला तुझ्याच एखाद्या नाटकातील डायलॉग म्हणून दाखवा असे सांगितले. त्यावर राजेश खन्नाने त्याच्या एका नाटकातील डायलॉग मोठ्या दिमाखात म्हणून दाखवला. “हां मै एक कलाकार हूं. क्या करोगे मेरी एक कहानी सुनकर… ? आज से कई साल पहले मैखाने से एक ऐसा प्याला पी चुका हूं जो मेरे लिये जहर था और औरों के लिए अमृत… हां मै एक कलाकार हूं. क्या करोगे मेरी एक कहानी सुनकर… ? ” हाच तो डायलॉग होता हा डायलॉग ऐकून सर्व दिग्दर्शक प्रचंड इम्प्रेस झाले आणि दहा हजार तरुणातून याची निवड झाली याच स्पर्धेत सुभाष घई आणि धीरज कुमार (हे दोघेही पुण्याच्या FTTI चे विद्यार्थी होते) यांची देखील निवड झाली होती. हिरोइन्समध्ये फरीदा जलालची निवड झाली होती. अशा प्रकारे एक बुलंद डायलॉग सादर करून राजेश खन्ना ने ही टॅलेंट स्पर्धा जिंकली.