‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
जपान : टाॅयलेटमध्येही चित्रपट
आपण कायमच जपानच्या(japan) वेगवान प्रगतीचं कौतुक करीत असतोच. आणि तेही तांत्रिक प्रगतीत नवनवीन फंडे आणत असतात. टेक्नाॅसाॅव्ही आहेतच. डिजिटल युगात तर फार फाॅर्मात आहेत. स्वस्थ बसणे त्यांच्या स्वभावातच नाही. आणि का बसावे?
आता तर त्यांनी कमालच केलीय.
आपण सिनेमात गुंतलोय, पटकथा बंदिस्त आहे, आपण पडद्याशी एकरुप झालोय, बाहेरचं जग आणि हातातील मोबाईल विसरलोय आणि अशातच टाॅयलेटला जायची वेळ आली (नैसर्गिक गोष्ट आहे, कधीही त्याची गरज निर्माण होऊ शकते. त्यात काहीच गैर नाही) आता मधूनच बाहेर जायचं तर त्या रांगेतील इतरांना नाहक त्रास ( डिस्टर्ब करा) आणि पाच सात मिनिटे आपण पडद्यापासून अर्थात सिनेमापासून दूर राहिलो तर त्या काळात काय घडलं ते समजणार नाही. आल्यावर कोणाला विचारणे योग्यही नाही.(japan)
रहस्यरंजक चित्रपट असेल (सायकॉलॉजिकल थ्रीलर असेल) तर त्याच वेळेस एकादा टर्न आणि ट्विस्ट यायचा. बरं, नैसर्गिक क्रिया जास्त काळ दाबून ठेवू नये असं वैद्यकीय शास्त्र समजावून सांगते. “इकडे पडदा तिकडे प्रेशर” असा अद्भुत प्रकार. मग काय करायचे? जपानमधील(japan) थिएटरवाल्यांनी ती अडचण ओळखून टाॅयटेलमध्येही जमीनीवर स्क्रीनवर चित्रपट एन्जाॅय करता येईल. (सोबतचा फोटो बघा). एकाच वेळेस दोन्ही काम.
आपण ‘टाॅयलेट एक प्रेमकथा‘ या चित्रपटात ग्रामीण भागातील टाॅयलेटची सुविधा/ असुविधा यावर मनोरंजनातून सामाजिक आशय मांडला. अशा चित्रपटाना रिस्पॉन्स मिळतोच. शहरात सार्वजनिक टाॅयलेटची फारच कमतरता/ गैरसोय, हायवेवर दूरदूरवर टाॅयलेट नाही आणि ग्रामीण भागात अनेक गावांत अगदी दूरवर, उघड्यावर वा झाडाआड टाॅयलेटला जावे लागणे हे सामाजिक वास्तव आहे. तात्पर्य, अजून आपण ही समस्या म्हणावी तशी सोडवू शकलो नाही तर मग मल्टीप्लेक्समधील टाॅयलेटमध्येही ती पाच सात मिनिटे चित्रपट पाहता येईल ही सोय इतक्यात होईलसे वाटत नाही. काय सांगावे? डिजिटल युगात तेही शक्य व्हावे.
चित्रपटगृहातील टाॅयलेट हादेखील एक विशेष विषय आहे बरं का? बघा तर, फार पूर्वी प्रदर्शित झालेल्या नवीन चित्रपटाला रसिकांचा कसा बरे रिस्पॉन्स आहे हे जाणून घेण्याच्या काही अगदी छोट्या छोट्या पध्दती होत्या. चित्रपटाचे जग अनेक लहान मोठ्या गोष्टींसह भरलेले. शुक्रवारपासून नवीनच प्रदर्शित झालेला चित्रपट सुरु असतानाच एकादा प्रेक्षक सिगारेट ओढण्यासाठी बाहेर आलाच तर तो चित्रपटात फारसा इन्व्हॉल्व्ह नसावा असे मानले जाई. एखादे गाणे पडद्यावर सुरु होताच अगदी जास्त प्रमाणावर प्रेक्षक सिगारेट ओढणे/ चहा म्हणा, पाणी म्हणा पिणे/ टाॅयलेटला जाण्यासाठी बाहेर पडताच ते गाणे प्रेक्षकांना आवडलेले नाही असे म्हटले जाई आणि असं नवीन चित्रपटाबाबत पहिले दोन तीन दिवस झाल्यास चक्क ते गाणे सोमवारपासून कापले जाई. असं अनेकदा घडे. पब्लिकला काय आवडते ते महत्वाचं हो.(japan)
बी. आर. चोप्रा निर्मित व राज तिलक दिग्दर्शित ‘३६ घंटे‘ (१९७३) च्या वेळेस अगदी असेच घडले. या चित्रपटात सुनील दत्त, रणजित व डॅनी डेन्झोपा या तीन खौपनाक व्हीलननी राजकुमार व माला सिन्हा यांचे सगळे कुटुंब एका प्रशस्त घरात ओलीस ठेवलेले असते. अशातच त्यांच्या मुलीची (परवीन बाबी) आपल्या प्रियकरासोबतची दोन गाणी चित्रपटात होती. प्रेक्षकांना रिलीफ मिळावा या हेतूने जरी ती गाणी होती तरी याचा उलट परिणाम झाला. ही गाणी चित्रपटात स्पीड ब्रेकर ठरली आणि प्रेक्षकांना चहा, टाॅयलेट, सिगारेट यासाठी सोय उपलब्ध झाली. ( आजच्या ग्लोबल युगात मोबाईल मेसेजची सोय झाली. मोबाईल बोलण्यासाठी नाही तर मेसेजसाठी आहे अशीच अनेकांची सवय झालीय.)(japan)
आमच्या गिरगावातील खेतवाडीतील प्रताप निवासमधील मनमोहन देसाई यांच्या घरीच त्यांच्या मुलाखतीचा अनेकदा योग येई. एकदा ते मुलाखतीनंतर आम्ही चहा पीत पीत गप्पा करत असतानाच औपचारिकपणा ते गप्पांच्या ओघात म्हणाले, मी कधीही चित्रपटगृहात जाऊन माझा चित्रपट पाहत नाही. एखाद्या दृश्याच्या वेळेस अथवा गाण्याच्या वेळेस एक जरी प्रेक्षक सिगारेट ओढायला वा टाॅयलेटला जरी बाहेर पडला तरी मला वाटतं, माझ्याच दिग्दर्शनात काही तरी फसलयं वा चुकलयं. मला ते कसंसंच वाटतं…. त्या काळात चित्रपटगृहातील टाॅयलेटमध्ये छोट्या स्क्रीनची व्यवस्था असती तर त्यांना असे अजिबात वाटले नसते….
रमेश सिप्पी दिग्दर्शित सर्वकालीन बहुचर्चित सुपर हिट ‘शोले‘ला सुरुवातीस काही दिवस काहीसा सो सो ( सामान्य) रिस्पॉन्स होता. चित्रपट कसा आहे याबाबत उलटसुलट चर्चा सुरु होती हा इतिहास कायमच रंगवून खुलवून सांगितला जातो. पण पिक्चर आवडू लागलाय, प्रेक्षक त्यात गुंतत चाललाय, पडद्यावरची साहसी दृश्य पाहताना थ्रिल होतोय, जोरदार डायलॉगबाजीला दाद देतोय हे कधी लक्षात आले माहितीये?
साधारण दुसर्या आठवडय़ात मिनर्व्हात सत्तर एम.एमच्या भव्य पडद्यावर स्टीरिओफोनिक साऊंडच्या अनुभवातून पाहत असतानाच सिनेमा सुरु झाल्यापासून मध्यंतरापर्यंत एकही प्रेक्षक चहा अथवा टाॅयलेटसाठी बाहेर पडला नाही. आणि कधी एकदा जागेवर जाऊन बसतोय असे त्यांना झालयं असे लक्षात आले, त्यानंतर चित्रपट संपेपर्यंत एकही जण जागेवरुन उठला नाही यावरुन लक्षात येत गेले, “शोले” आवडू लागलाय. चित्रपट व्यवसायाची बातच वेगळी .खुद्द दिग्दर्शक रमेश सिप्पीनेच मला त्याची “जमाना दीवाना“च्या वेळेस त्याच्या खार येथील कार्यालयात विशेष मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी सांगितले.(japan)
========
हे देखील वाचा : ‘हजार वर्षात शाहरुख खान होणे नाही…..’
========
चित्रपट आणि चहापाणी, टाॅयलेट, सिगारेट यांच्या नातेसंबंधाची गोष्ट कोणाला तर्हेवाईक वाटेलही. पण त्यातच फारच मोठी वास्तवता आहे. जी पटकन दिसत नाही… पण तोही एक चित्रपट पाहण्यातील संस्कृतीमधील एक भाग आहे. अशाच अनेक छोट्या छोट्या गोष्टींसह ही चित्रपटगृह संस्कृती वाटचाल करतेय. छोट्या वाटणार्या अशा येथील अनेक गोष्टी फार रंजक आहेत की नाहीत? जपानला(japan) कधी गेलाच तर मल्टीप्लेक्समधील टाॅयलेटमधील स्क्रीन नक्की एन्जाॅय करा. एक नवीन अनुभव हो.