Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Neena Kulkarni यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर

Mahesh Kothare : मराठी चित्रपटसृष्टीतील टॅक्नॉलॉजीचा बादशाह!

Anushka Sharma ५०० कोटी क्लबमध्ये चित्रपट देऊनही आता बॉलिवूडपासून आहे

Prasad Oak यांना यंदाचा ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान २०२५’ घोषीत!

Ahilyadevi Holkar Marathi Biopic: रुपेरी पडद्यावर येणार अहिल्यादेवींचा जीवनप्रवास; ‘हिंदू हृदय

‘All Is Well’ सिनेमात दिसणार धमाल त्रिकुट; अमर, अकबर आणि

GAADI NUMBER 1760 Teaser: रहस्य आणि हास्याची अनोखी सफर घडवणाऱ्या ‘गाडी

Ashok Saraf : ‘आपली माणसं’ ते ‘एक डाव भुताचा’! मामांचे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Jilabi Movie Trailer: १७ जानेवारीला ‘जिलबी’चे रहस्य उलगडणार; चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर भेटीला

 Jilabi Movie Trailer: १७ जानेवारीला ‘जिलबी’चे रहस्य उलगडणार; चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर भेटीला
Jilabi Movie Trailer
मिक्स मसाला

Jilabi Movie Trailer: १७ जानेवारीला ‘जिलबी’चे रहस्य उलगडणार; चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर भेटीला

by Team KalakrutiMedia 13/01/2025

Jilabi Movie Trailer: उत्तम आशयविषयासाठी मराठी सिनेमा ओळखला  जातो. मराठी  चित्रपटात नाविन्यपूर्ण  व चांगल्या विषयाची निवड निर्माते व दिग्दर्शक जाणीवपूर्वक करू लागले आहेत. 
ही बाब लक्षात घेऊन आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी हटके धाटणीचा ‘जिलबी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणलाआहे.
नितीन कांबळे दिग्दर्शित ‘गोड आणि गूढ’ अशा दोन्ही फ्लेवर्सच्या ‘जिलबी’ चित्रपटाचा  ट्रेलर नुकताच  कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 
या सोहळ्यात पत्रकार दिनाच्या निमित्ताने मान्यवर पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. 

Jilabi Movie Trailer
Jilabi Movie Trailer

‘रहस्याच्या सावल्यांत दडलेला आहे खेळ, विश्वासाचा प्रवास की फसवणुकीचा जाळ??’असं म्हणत प्रदर्शित झालेल्या या ट्रेलर मधून जबरदस्त रहस्याची झलक दिसून येत आहे. 
आपण जो विचार करतो त्यापलीकडे जाऊन आपल्या आजुबाजूला अनेक घटना घडत असतात. अशाच घडणाऱ्या घटनांमागचं नेमकं रहस्य काय असणार? 
याची उकल येत्या १७ जानेवारीला चित्रपटगृहात होणार आहे. रहस्य, थरार, उत्कंठा, शोध, संशय, समजगैरसमज या सगळ्यांच्यासंमिश्र मांडणीच्या या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे 
अभिनेता प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानीसुर्वे ‘जिलबी’ चित्रपटाच्या 
निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या तिघांसोबत पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांनी आपल्या अभिनयाने मनोरंजनाच्या 
या ‘जिलबी’चा खुसखुशीतपणा वाढवला आहे. 
एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट,उत्कृष्ट कलाकार यांना एकत्र पाहण्याची पर्वणी ‘जिलबी’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना 
लाभणार आहे.

Jilabi Movie Trailer
Jilabi Movie Trailer

आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांच्यासोबत काम करायला मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना चांगल्या निर्मिती मूल्यांमुळे मराठी चित्रपटांचाही निर्मिती व वितरणाचा कॅनव्हास मोठा होईल, असा विश्वास कलाकारांनी याप्रसंगी व्यक्त केला. 
एका चांगल्या संकल्पनेसोबतच ताकदीचे कलाकार आणि उत्तम दिग्दर्शक या सगळ्यांमुळे वेगळ्या धाटणीचा ‘जिलबी’ प्रेक्षकांनाही आवडेल, असा विश्वास निर्माते आनंद पंडित यांनी व्यक्त केला. 
या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून हे ‘रहस्य’ प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल, असा विश्वास दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी व्यक्त  केला.(Jilabi Movie Trailer)

==========

हे देखील वाचा: Fussclass Dabhade Teaser: ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज…

==========

‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे चित्रपटाचे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे.
छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.
आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेन्ट प्रा.लिमिटेड यांच्या सहयोगाने आणलेला ‘जिलबी’ चित्रपट १७ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Celebrity Entertainment Jilabi marathi movie Jilabi Movie Trailer Marathi Movie shivani surve swapnil joshi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.