Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

War 2 Vs Coolie : बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची कमाई झाली

‘अभंग तुकाराम’ चित्रपटात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत Yogesh Soman

Madhubala : रोमँटिक ड्यूएट गाण्याची चाल चक्क अंधेरीच्या रेल्वे स्टेशनवर

Alia Bhatt-Ranbir Kapoor यांचा बंगला तयार झाला?

Ganpati Festival 2025 : गणेशोत्सवात घरबसल्या नक्की पाहा बाप्पाचे हे

Raj Kapoor : ‘दुनिया की सैर…’ आपल्याकडील पहिला सत्तर एमएम

ऐश्वर्या रायची प्रेग्ननसी आणि Madhur Bhandarkar यांचं डिप्रेशन; काय आहे

Prasad Oak : ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

Last Stop Khanda Movie Poster: प्रत्येकाच्या प्रेमाची कहाणी सांगणारा ‘लास्ट स्टॉप खांदा’

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे ची

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Julie : ‘ज्युली’ची ५० वर्ष; काळाच्या पुढची प्रेमकथा

 Julie :  ‘ज्युली’ची ५० वर्ष; काळाच्या पुढची प्रेमकथा
कलाकृती विशेष

Julie : ‘ज्युली’ची ५० वर्ष; काळाच्या पुढची प्रेमकथा

by दिलीप ठाकूर 25/04/2025

आजच्या ग्लोबल युगात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह खूपच मोठ्याच प्रमाणावर होताना आपण पाहतोय. पण पन्नास वर्षांपूर्वीचे सामाजिक, कौटुंबिक वातावरण अशा गोष्टी सहजपणे स्वीकारण्याइतके मोकळे असण्याची शक्यता नव्हतीच. त्यात एकाद्या चित्रपटात अशी गोष्ट असेल तर? (Julie movie)

के. एस. सेतुमाधवन दिग्दर्शित ‘ज्युली’ ( मुंबईत प्रदर्शित १८ एप्रिल १९७५. मुख्य चित्रपटगृह मेट्रो ) या चित्रपटात ते होते. या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण झालीदेखिल. कथानक, त्याची धाडसी मांडणी, त्यातील भावनिक गुंतागुंत याबाबत हा चित्रपट काळाच्या खूपच पुढचा होता. पारंपरिक लोकप्रिय मनोरंजक चित्रपटातही काही वेगळी कथानके त्या काळात पाह्यला मिळत. मात्र त्या प्रयत्नांचे म्हणावे तसे कौतुक होत नसे.

शशी भट्टाचार्य ( विक्रम) या हिंदू ब्राह्मण युवकाच्या प्रेमात ज्युली ( लक्ष्मी) ही ख्रिश्चन ॲन्लो इंडियन युवती पडते. तमिळनाडूतील एका निसर्गरम्य गावात घडणारी ही गोष्ट. दोघांच्या प्रेमसंबंधातील असोशी, ओढ, उत्कटता यात काही मर्यादा ओलांडल्या जातात. अशातच शशी भट्टाचार्य नोकरीनिमित्त शहरात येतो. आणि नेमक्या त्याच वेळेस ज्युली गरोदर राहते. हा तिला प्रचंड धक्काच असतो. ही गोष्ट ती आपल्या आईला ( नादिरा) सांगते. ती एक धाडसी निर्णय घेते…. चित्रपट एक वेगळे वळण घेत घेत क्लायमॅक्सला जातो. (untold stories)

तमिळ चित्रपट “चट्टाकारी ” ( १९७४) ची ही रिमेक. मूळ चित्रपटातील लक्ष्मी आणि तिच्या बहिणीच्या भूमिकेतील श्रीदेवी या हिंदी चित्रपटात आल्या. दोघींचाही हा पहिलाच हिंदी चित्रपट. श्रीदेवी तोपर्यंत बालकलाकार ते नायिका असा प्रवास करत होती. “ज्युली”च्या वेळेस ती अकरा वर्षांची होती. तमिळ व तेलगू चित्रपटातून तिचा तो प्रवास सुरु होता. ” ज्युली” मध्ये नादिरा, रिता भादुरी, ओम प्रकाश, उत्पल दत्त, जलाल आगा, अचला सचदेव, राजेंद्रनाथ इत्यादींच्याही भूमिका. ओम प्रकाश ज्युलीच्या पित्याच्या भूमिकेत आहेत. पिता व मुलगी यांच्या नात्यातील घट्ट वीण या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे साकारलीय. त्या काळातील चरित्र कलाकार आपल्या भूमिकेत अधिकाधिक समरस होत. त्यांना तेवढा स्कोपही मिळे. ( आज चित्रीत झालेली किती दृश्य पडद्यावर येतात हा प्रश्नच आहे. आणि यावर कलाकार काही बोलेलच असे नाही.)


” ज्युली” ची पटकथा चक्रपाणी यांची तर संवाद इंदर राज आनंद यांचे. गीत संगीत या प्रेमकथेची खासियत. आनंद बक्षी यांच्या गीतांना राजेश रोशनचे संगीत. दिल क्या करे कब किसी को किसीसे प्यार हो जाए ( पार्श्वगायक किशोरकुमार), भूल गया सबकुछ याद नहीं अब कुछ ( लता मंगेशकर व किशोरकुमार), सोचा नाम तेरा तू श्याम मेरा ( आशा भोसले व उषा मंगेशकर) या गाण्यांसह माय हार्ट इज बिटींग या इंग्लिश गाण्याचाही यात समावेश आहे. प्रीती सागरने हे गाणे गायले..हिंदी चित्रपटातील हे पहिले इंग्लिश गाणे असल्याचे मानले जाते. पण तसे नाही. (Bollywood dhamaka)

==============

हे देखील वाचा : दिलीप कुमार दिग्दर्शित “कलिंगा” पाह्यला मिळणार….

==============

१९३७ सालच्या प्रभात फिल्म कंपनी या निर्मिती संस्थेच्या दिग्दर्शक व संकलक व्ही.शांताराम यांच्या ” कुंकू ” या चित्रपटात प्रसिद्ध इंग्रजी कवी लाॅन्ग फेलो यांची in the world’s broad field of battle ही कविता होती. या चित्रपटातील नायिका शांता आपटे यांनीच ती गायलीय आणि संगीत केशवराव भोळे यांचे आहे. हा चित्रपट हिंदीत ” दुनिया ना माने ” या नावाने पडद्यावर आला होता. तर भप्पी सोनी दिग्दर्शित ” एक फूल चार कांटे ” ( १९६०) या चित्रपटात इंग्लिश गाणे होते. शैलेंद्र लिखित ब्युटीफुल बेबी ऑफ ब्राॅडवे हे इंग्लिश गाणे इक्बाल सिंग यांनी गायले असून संगीत शंकर जयकिशन यांचे आहे. (Entertainment)

‘ज्युली’ बद्दल त्या काळातील एक गाजलेले गाॅसिप्स म्हणजे, ” ज्युली”च्या भूमिकेसाठी झीनत अमानला ऑफर होती. पण ज्यूली गरोदर असल्याचे दाखवलयं, त्यातील काही दृश्य साकारणे तिला पटले नाही म्हणून तिने नकार दिला. ( झीनत अमानचा रुपेरी पडद्यावरील परफॉर्मन्स पाहता तिने खरंच असा विचार केला असेल का? की फक्त औपचारिक ऑफर होती ?) ” ज्युली” च्या यशाचा लक्ष्मीला हिंदी चित्रपटसृष्टीत फारसा फायदा झाला नाही. दोन चार हिंदी चित्रपट तिला मिळाले. त्याच वेळेस ती साऊथच्या पिक्चरमध्ये बिझी होती. ” ज्युली” नायिकाप्रधान चित्रपट असल्याने विक्रम दुर्लक्षित राहिला. ऐवीतेवी त्याच्या कारकिर्दीने कधीच आकार घेतला नाही. ” सितम ” नावाच्या चित्रपटाच्या दिग्दर्शनात तो अनेक वर्ष रेंगाळला. काही चित्रपट सर्वकालीन सदाबहार लोकप्रिय असतात पण त्यातील कलाकारांचे भाग्य उजळत नाही हे दुर्दैव. सिनेमाचे जग अशा अनेक लहान मोठ्या गोष्टींसह वाटचाल करत आहे. (Bollywood classic movies)

” ज्युली” प्रमाणेच त्या काळात दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची रिमेक हिंदीत येत असे. ” प्रेम नगर” पासून ” प्यासा सावन” पर्यंत अनेक उदाहरणे आहेत. प्रसाद प्राॅडक्सन्सचा एल. व्ही. प्रसाद निर्मित व के. बालचंदर दिग्दर्शित ” एक दुजे के लिए ” या वाटचालीतील सर्वोत्तम उदाहरण. कालांतराने ” बाहुबली ” पासून साऊथचा धमाकेदार चित्रपट एकाच वेळेस हिंदीसह अन्य भाषेत डब होऊन जगभरातील अनेक देशांत प्रदर्शित होवू लागला. आजच्या डिजिटल पिढीसमोर हे आजच्या काळातील उदाहरण होते. पण दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीत रिमेक करण्यात येण्याचा प्रवास साठच्या दशकापासूनचा. त्यात ” ज्युली” हा काळाच्या खूपच पुढचा धाडसी प्रेमपट. त्यातील लोकप्रिय गीत संगीताने रसिकांच्या किमान तीन पिढ्या ओलांडून त्याचा प्रवास सुरु आहे….हेदेखील मनोरंजक चित्रपटाचे यशच.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Chitchat bollywood classic movie bollywood movies Celebrity Celebrity News Entertainment Featured Julie Sridevi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.