
Kantara 2 : सेटवर ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू, चित्रपटाचं शुटींग थांबवलं!
प्रेक्षकांना सतत काहीतरी वेगळं आणि हटके पाहायला आवडत असतं. अशीच काहीशी वेगळी कथा ऋषभ शेट्टीने ‘कांतारा’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडली होती. मुळ दाक्षिणात्य चित्रपट जरी असला तरी हिंदी भाषिक चित्रपटप्रेमींनी कांताराला भरभरुन यश मिळवून दिलं. पहिल्या भागाच्या अभूतपूर्व यशानंतर लवकरच कांताराचा दुसरा भाग येणार असून नुकताच टीझरही समोर आला होता. अशातच या चित्रपटाबद्दल एक वाईट बातमी समोर आली ती अशी की सेटवरील एका ज्युनिअर कलाकाराचा मृत्यू झाला आहे. (Bollywood trending news)

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, केरळमधील एमएफ कपिल नावाच्या ज्युनिअर आर्टिस्टची ७ मे २०२५ रोजी दुपारी कोल्लूरमधील सौपर्णीका नदीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जेवण झाल्यावर जे तो नदीत पोहण्यासाठी गेला असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचं समोर आलं आहे. यानंतर स्थानिक अग्निशमन विभागाने तात्काळ शोध घेतला आणि बचाव कार्य सुरू केलं आणि संध्याकाळी कपिलचा मृतदेह नदीत सापडला. (Kantara movie)
================================
हे देखील वाचा: Banjara Marathi Movie: निसर्गात हरवून, मैत्रीत रंगणारे ‘बंजारा’ मधील ‘कम ऑन लेट्स डान्स’ गाणे प्रदर्शित !
=================================
दरम्यान, कपिल याच्या मृत्यूमुळे सध्या चित्रपटाचं शुटींग थांबवण्यात आलं आहे. ही दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी कोल्लूरमध्ये काही कलाकारांना घेऊन जाणारी बस उलटली होती. त्यामुळे एकामागून एक होणाऱ्या या दुर्घटना संपूर्ण चित्रपटाच्या टीमसाठी फार आव्हानात्मक आहेत. सध्यातरी ऑक्टोबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असे जाहिर करण्यात आले आहे. मात्र, घडलेल्या घटनेमुळे तारीख बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. (south Indian movies)
कांतारा चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या दुर्घटनेआधी काही दिवसांपूर्वी रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या चित्रपटाच्या सेटवरही अशीच घटना घडली होती. चित्रपटाच्या कोरिओग्राफी टीमचा भाग असलेल्या २६ वर्षीय सौरभ शर्मा या डान्सरचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाला होता. सातारा जिल्ह्यातील संगम माहुली गावात ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना ही घटना घडली होती. त्यामुळे सध्या या देखील चित्रपटाचं चित्रिकरण थांबवण्यात आलं आहे. (Bollywood update)

‘कांतारा २’ बद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाचं लिखाण आणि दिग्दर्शन ऋषभ शेट्टीनेच केलं होतं. २०२२ मध्ये आलेल्या कांतारा चित्रपटासाठी ऋषभला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. आगामी ‘कांतारा: चॅप्टर १ – ए लीजेंड’ हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. (Kantara chapter 1 : A legend)