Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kahtey Hain Mujhko Raja चित्रपटाची पन्नाशी!

 Kahtey Hain Mujhko Raja चित्रपटाची पन्नाशी!
कलाकृती विशेष

Kahtey Hain Mujhko Raja चित्रपटाची पन्नाशी!

by दिलीप ठाकूर 02/01/2026

साठच्या दशकाच्या उत्तरार्धातील एक यशस्वी गोष्ट. काहीजण विश्वजीतला नशिबवान नायक म्हणत, कारण त्या काळातील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींचा तो (आणि जॉय मुखर्जी, मग नवीन निश्चल )रुपेरी पडद्यावरील नायक झाला. एखाद्या नायकाचे यश मोजायचे बॅरोमिटर त्याला कोणत्या अभिनेत्री लाभल्या यावरूनही मोजलं जातं. त्या उगाच ‘हो’ कशाला म्हणतील? त्याना कळते हो कॅमेरासमोर रोमान्स करताना जास्त कन्फर्ट कोणासोबत वाटते आणि का? विश्वजीतही आपल्या नायिकाबाबत कधी खट्याळपणे, खोडकरपणे वागला. त्याचे खमंग, रुचकर किस्से आजही फोडणी देऊन चर्चेत असतात.

काही चित्रपट रसिकांना रुपेरी पडद्यावरील श्रवणीय गाणी ऐकण्यासाठी विश्वजीतचे चित्रपट पहावेसे वाटत. आता तुम्ही म्हणाल हे काय? तर इराणी हॉटेलमधील ज्यूस बाॅक्समध्ये आठ आण्याचे नाणे टाकून आपल्या आवडत्या चित्रपट‌ गीतांना ऐकताना कधी कधी लक्षात येई, विश्वजीतची भूमिका असलेला ‘बीस साल बाद’(१९६२) आता मॅटीनी शोला आला आहे, दोन तीन वर्षांपूर्वी फस्ट रनला पाहिला होताच, आता परत पाहायचाय तर गाण्यासाठी पाहूया.

कोणी विश्वजीतला बायकी हीरो म्हणत. हा त्याच्या नाजूक पर्सनॅलिटीचा परिणाम. त्या काळात सिक्स पॅक, धष्टपुष्ट आणि उघड्या निधड्या छातीचा हिरो एक तर स्टंटपटात असे अथवा एखाद्या चित्रपटात थीमनुसार एखाद्या दृश्यात असे. अशा विश्वजीतने अभिनित, निर्मित आणि दिग्दर्शित केलेल्या ‘कहते हैं मुझको राजा’ ( मुंबईत प्रदर्शित २ जानेवारी १९७६. मेन थिएटर नाझ) या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्या नवीन वर्षाच्या पहिल्याच शुक्रवारची ही खेळी.या चित्रपटात रेखा त्याची नायिका आहे, ही केवळ एका ओळीतील गोष्ट नाही. याच रेखाचे त्याने ‘अंजाना सफर’ (१९७०) च्या सेटवर विश्वजीतने चक्क चुंबन घेतल्याची घटना (कोणी दुर्घटनाही म्हणतात. मत स्वातंत्र्य असल्यानेच असं कोणी काहीही म्हणतो.) गाॅसिप्स मॅगझिनमधून अशी काही रंगवून खूलवून वाढवून लिहिली गेली की अजूनही अधूनमधून ही गोष्ट सांगितली जाते. पन्नास वर्षांपूर्वीचे सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम वातावरण पाहता ही गोष्ट फारच धाडसी

नायक म्हणून आपल्या अनुभवाच्या जोरावर विश्वजीतने ‘कहते है मुझको राजा’चे दिग्दर्शन केले आणि त्याच्या प्रगती पुस्तकात दिग्दर्शक म्हणून नोंद झाली. चित्रपटातील पाहुणे कलाकार धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांना चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीत विशेष स्थान दिले, ही जोडी लोकप्रिय असल्याने ते साहजिकच होते. चित्रपटात शत्रूघ्न सिन्हा, फरयाल, नादिरा यांच्याही भूमिका आहेत. संगीत राहुल देव बर्मनचे. हा चित्रपट प्रदर्शित झाला इतकेच. मुख्य चित्रपटगृह नाझमधून अवघ्या दोन आठवड्यात उतरलाही. मोठाच फ्लॉप.

================================

हे देखील वाचा : B Merwan चे सिनेमावाल्याशी नाते….

================================

आता विश्वजीत म्हटल्यावर चित्रपट रसिकांच्या एका पिढीला पटकन काही लोकप्रिय गाणी आठवली असतीलच. आणि तेच जुन्या चित्रपटातील गीत संगीताचे वैशिष्ट्य. ‘बेकरार करके हमे यू न जाईये’, ‘जरा नजरों से कहदो तो’ (बीस साल बाद), ‘पुकारता चला हू मै’, मेरे हमदम मान भी जाओ, भला मानो बुरा मानो (मेरे सनम), ‘मेरी मोहब्बत पाक मोहब्बत, आ गले लग जा’ (एप्रिल फूल), ‘नजर ना लग जाऐ, अकेला हू मै’ (जाल), ‘तुम्हारी नजर क्यू खफा हो गई’ (दो कलिया), ‘लाखों है यहा दिलवाले, ऑखो मे कयामत के काजल’ (किस्मत), ‘मुझको ठंड लग रही है मुझसे दूर तू न जा’ (मै सुंदर हू) अशी साठच्या दशकातील सहज गुणगुणावी अशी गाणी ओठांवर सहज येतातच.

विश्वजीतला नामवंत अभिनेत्री नायिका म्हणून लाभल्या.‌ म्हणून तो ‘sनशिबवान नायक’ म्हणून कायम ओळखला जातोय. हे वैशिष्ट्यही कौतुकास्पद. वहिदा रेहमान (बीस साल बाद हा त्याचा पहिला चित्रपट), कोहरा), आशा पारेख ( मेरे सनम), सायरा बानू ( एप्रिल फूल), शर्मिला टागोर (यह रात फिर न आयेगी), माला सिन्हा (नाईट इन लंडन, जाल, दो कलिया), साधना (इश्क पर जोर नहीं), मुमताज (शरारत), बबिता (किस्मत), लीना चंदावरकर (मै सुंदर हू), रेखा (दो ऑखे, दो शिकारी, अंजाना सफर, कहते है मुझको राजा, मेहमान) अशा आघाडीचा अभिनेत्रींचा तो नायक झाला. काय भारी प्रगती पुस्तक आहे ना?

‘कहते है मुझको राजा’चे रसिकांकडून थंड स्वागत झाले यात आश्चर्य नाही. एक म्हणजे, चित्रपट निर्मितीवस्थेत फार रखडला, तोपर्यंत विश्वजीत मागील पिढीतील नायक म्हणून जमा झाला, हे स्वीकारणे अवघड असते. पण काळ कोणासाठी थांबत नाही. चित्रपटाच्या जगात तर नाहीच नाही. विश्वजीतने तरीही हार मानली नाही. त्याने अमिताभ बच्चन आणि रेखा या जोडीच्या ‘रॉकी’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली, तेव्हाच्या प्रथेनुसार ट्रेड पेपरमध्ये जाहिरात दिली.‌

================================

हे देखील वाचा : Multiplex चा रंग काही वेगळाच!

================================

आता अमिताभचे युग सुरु झाले होते आणि खुद्द अमिताभ आपल्या अशा स्वीकारलेल्या वा घोषणा झालेल्या, काही रिळाचे चित्रीकरणही झालेल्या चित्रपटांना बाजूला सारून पुढे निघाला… (सुनील दत्तने संजय दत्तच्या पहिला चित्रपटाचे ‘रॉकी’ हे नाव विश्वजीतकडूनच घेतले. असं एकाकडचे नाव दुसरा निर्माता वा दिग्दर्शक घेतो याच्याही रंजक गोष्टी खूप खूप)…. विश्वजीतही आपल्यावर चित्रीत झालेल्या सुपरहिट गाण्यांना गात गात स्टेजवर जाऊन रमला (तात्पर्य तो थांबला नाही हे महत्त्वाचे) आणि अधूनमधून एखाद्या चित्रपटात छोटी भूमिका साकारत राहिला… काही असो, ‘कहते है मुझको राजा’ हे चित्रपटाचं नाव छान आहे. पन्नास वर्षे पूर्ण झाली तरी त्या नावाचा रंग कायम आहे.

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Dharmendra Entertainment Entertainment News retro news of bollywood vishvajeet
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.