जेव्हा शायर Kaifi Azmi यांनी आपल्या बेगमला रक्ताने पत्र लिहिले

जेव्हा शायर Kaifi Azmi यांनी आपल्या बेगमला रक्ताने पत्र लिहिले होते!
ख्यातनाम शायर कैफी आजमी (अभिनेत्री शबाना आजमी यांचे वडील) यांनी हिंदी सिनेमाच्या दुनियेत मोजकच काम करून अतिशय दर्जेदार अशी गाणी दिली आहेत. ते उत्तम शायर होते हिंदी सिनेमात त्यांनी कितीतरी अप्रतिम गीतांना आपल्या लेखणीतून जन्म दिला आहे. त्यांचा जन्म (१४ जानेवारी १९१९) उत्तर प्रदेश मधील आझमगडचा . घरात शायरीचे पेव फुटले होते. यांचे तीनही भाऊ शायर. कैफी यांचे पाळण्यातील नाव होतं अख्तर हुसैन रिझवी. पण त्या काळातील प्रथेनुसार त्यानी ‘कैफी’ हे ताख्खल्लूस घेतले आणि त्या पुढे आपल्या गावाचे नाव लावले आणि बनले कैफी आजमी! (Bollywood)

१९५१ साली ते हिंदी सिनेमाची गाणी लिहू लागले. बुझदिल हा त्यांचा पहिला सिनेमा. लाला रुख पासून ओळख मिळाली. पण खऱ्या अर्थाने ते लोकप्रिय गीतकार ठरले गुरुदत्त यांच्या ‘कागज के फूल’ पासून. १९५९ साली आलेल्या या क्लास सिनेमातील ‘वक्त ने किया क्या हंसी सितम तुम रहे न तुम हम रहे न हम‘ या गीताने कैफी रसिकांपुढे आले. ‘शोला और शबनम’, ‘हकीकत’, ‘अनुपमा’, ‘बहारे फिर भी आयेगी’, ‘आखरी खत’, ‘हिर रांझा’, ‘पाकिजा’, ‘बावर्ची’, ‘शंकर हुसैन’, ‘हंसते जखम’, ‘अर्थ’, ‘रजिया सुलतान’…. अशी प्रदीर्घ त्यांची रुपेरी कारकीर्द आहे. दर्जेदार आणि भावपूर्ण अशी गाणी लिहिणाऱ्या कैफी यांना सिनेमातील गाण्यांसाठी फारशी पारितोषिके मिळाली नाहीत. उर्दू साहित्य आणि शायरी करीता मात्र त्यांना कायम गौरवण्यात आले.

अर्थात त्याचं पाहिलं प्रेम आपल्या शायरी वरच होते. त्यांची पत्नी शौकत आजमी यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये आपल्या पती प्रेमाच्या एका नाजूक प्रसंगाचा उल्लेख केला आहे. या दोघांमध्ये किती उत्कट प्रेम होतं हे या प्रसंगावरून लक्षात येतं. कोणता होता तो प्रसंग आणि काय होता नेमका किस्सा. खरंतर शायर कैफी आजमी हे उत्तर प्रदेश चे होते तर शौकत आजमी या हैदराबादच्या. पण मुशायऱ्याच्या निमित्ताने कैफी यांचा संचार संपूर्ण देशभर असायचा. शौकत या कैफी यांच्या नज्म गझलच्या प्रेमात होत्या. एकदा हैदराबादला कैफी मुशायऱ्यासाठी आलेले असताना त्यांची भेट झाली. आणि पहिल्या भेटीतच दोघांनी एकमेकांना हदय देऊन टाकलं. या प्रेम कहाणीला तिच्या घरातून पाठिंबा मिळणे शक्यच नव्हतं. कारण शौकत यांच्या वडिलांना शायरी वगैरे हे सगळे बिनकामाचे धंदे वाटत होते त्याना ते आवडत नव्हते. पण सच्चे प्यार को कौन रोक सकता है?
================================
हे देखील वाचा: Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?
=================================
शौकत आणि कैफी यांचा निकाह झाला आणि हे दोघेही मुंबईच्या चक्क झोपडपट्टीत राहायला आले. ऐषोरामात वाढलेल्या शौकतला सुरुवातीला खूप कठीण गेलं पण पती प्रेमा पायी त्यांनी हे अवघड जिणं मान्य केले. सामान्य पती-पत्नी प्रमाणे त्यांच्या दोघात देखील क्षुल्लक कारणावरून वाद होत असत. एकदा दोघांमध्ये कुठल्यातरी फालतू कारणावरून वाद झाला आणि शौकत आजमी आपल्या माहेरी म्हणजे हैदराबादला निघून गेल्या. जाताना “मी या घरात पुन्हा पाय ठेवणार नाही!” असे देखील सांगून गेल्या. कैफी खूप संवेदनशील मनाचे. यांना खूप वाईट वाटले. आधीच शायर त्यात पुन्हा असे प्रसंग म्हटल्यानंतर ते आतून दुखावले.

दररोज ते शौकत यांना पत्र पाठवत होते. तिकडे शौकत माहेरी आली होती खरी पण तिचं मन मात्र मुंबईतच होतं. बऱ्याच पत्रांना उत्तर न दिल्यानंतर कैफी यांनी एकदा तिला चक्क आपल्या रक्ताने पत्र लिहून पाठवले.. तिने तिच्या वडिलांना ते पत्र दाखवले. वडील म्हणाले.” या शायर बडे चालू किसम के लोग होते है. जैसे दिखते है वैसे नही होते. ये खून कैफी का नही है… मुझे लगता है किसी काटे हुए बकरे या मुर्गी का है!” वडिलांनी जरी हसत हसत विषय टाळला असला तरी शौकतला जाणीव होती की हे रक्त आपल्या कैफी यांचेच आहे. या पत्रात कैफी यांनी लिहिले होते ते सर्व पत्र वाचून शौकत आतून हलली. पत्राचा मजकूर साधारणपणे असा होता.
“मेरी शौकत, अभी रात एक बजे तुम्हे खत लिख कर लिफाफे में बंद कर मै लेट गया था. सोचा शायद नींद आयेगी. मगर नींद नही आयी. फिर तुम्हारे खत पढे. और आंखो से बेइख्तीयार आंसू निकल पडे. मेरी शौकत, तुमको मुझपर भरोसा नही या मेरी मुहोब्बत पर ऐतबार नही? ये मेरी बद्नसीबी नही तो और क्या है? समझ में नही आता तुमको अपने मुहोब्बत का यकीन कैसे दिलाऊ? फिर एक बात समझ आयी. खयाल आ गया और अपने खून से खत लिख रहा हू. अब तक तुम्हारी मुहोब्बत में आंसू बहे थे. अब खून बहेगा. आगे आगे देखिये होता है क्या.. सिर्फ तुम्हारा कैफी “ आता मात्र शौकत खडबडून जागी झाली. आणि लगेच दुसऱ्या दिवशी ती मुंबईला गेली आणि दोघे एकमेकाच्या गळ्यात पडून मनसोक्त रडले. आणि आयुष्यभर पुन्हा असं करायचं नाही याची शपथ त्यांनी घेतली!