‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Rukmini Vasanth : ‘कांतारा – चॅप्टर १’ मधली ही सुंदर अभिनेत्री आहे तरी कोण?
सध्या सगळीकडे ‘कांतारा १’ (Kantara : The Legend- Chapter 1) चित्रपटाचीच हवा आहे… ऋषभ शेट्टी याचं लेखन, दिग्दर्शन आणि तुफान अभिनय याचं कौतुक देशभरातीय प्रेक्षक करत आहेत… परंतु, या चित्रपटातील एक सुरेख चेहरा लोकांचं विशेष लक्ष वेधून गेत आहे… आणि तो म्हणजे रुक्मिणी वसंत (Rukmini Vasanth) हिचा… ‘कांतारा १’ मध्ये कनकवथी ही भूमिका साकारणारी कन्नड अभिनेत्री रुक्मिणी वसंतबद्दल (Rukmini Vasanth) सर्वांना कुतुहल निर्माण झालं आहे.. कोण आहे ही अभिनेत्री आणि तिच्या वडिलांचं देशासाठी काय योगदान आहे जाणून घेऊयात…

तर, रुक्मिणी वसंत हिने कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत… २०१९ मध्ये तिने ‘बिरबल ट्रायलॉजी’ या कन्नड चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली…पण, २०२३च्या रोमँटिक ड्रामा ‘सप्त सागरदाता एलो’मुळे तिला प्रसिद्धी मिळाली. इतकंच नाही तर यासाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्रीच फिल्मफेअरही मिळाला होता… या शिवायक्मिणीनं ‘बघीरा’ या चित्रपटातही उत्कृष्ट अभिनय केला होता… (Kannada film industry)
================================
हे देखील वाचा : Kantara Chapter 1 : कांताराने पुन्हा राडा घातलाय !
=================================
रुक्मिणीचे वडिल वसंत वेणुगोपाल हे भारतीय लष्करात कर्नल या पदावर कार्यरत होते… ते मराठा लाईट इंन्फट्री या ९व्या बटालियनचे कमांडिग ऑफिसर होते… २००७ साली जन्मू-काश्मिरमध्ये झालेल्या उरी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले होते… तसेच, कर्नाटकातील अशोक चक्र प्राप्त करणारे रुक्मिणीडे वडिल पहिले व्यक्ती होते… तसेच, रुक्मिणीची आई सुभाषिनी वसंत ही भरतनाट्यम नृत्यांगना असून कर्नाटकातील शहीद सैनिकांच्या विधवांना आधार देण्यासाठी एक फाउंडेशन देखील चालवतात. (Rukmini Vasanth information)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi