Kalam : मराठमोळा दिग्दर्शक उलगडणार ‘मिसाईल मॅन’चं जीवनचरित्र!

War 2 : ह्रतिक-Jr NTRच्या चित्रपटाबद्दल करण जोहर म्हणतो, “हा चित्रपट तर…”
सोशल मिडियावर सध्या एकाच चित्रपटाची चर्चा आहे तो म्हणजे ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्यु. एन.टी.आर 9Jr Ntr) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘वॉर २’ (War 2). चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून दोन्ही कलाकारांच्या Action आणि अभिनयापेक्षा कियाकरा अडवाणी हिचा (Kiara Advani) बोल्ड लूक सध्या विशेष चर्चेत आहे. स्पाय युनिवर्समधील हा सहावा चित्रपट असून चाहते आता ट्रेलरची वाट पाहात आहेत. अशातच दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याने ‘वॉर २’ चित्रपटाबद्दल आपलं मत मांडलं आहे. (Bollywood news)

दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने ‘वॉर २’ च्या टीझरचे कौतुक केले आहे. इतकंच नाही तर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार असल्याचेदेखील त्याने म्हटले आहे. करण जोहर म्हणाला की, या वर्षातील हा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. मी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहू शकत नाही, अशा शब्दात त्याने त्याची उत्सुकता व्यक्त केली आहे. यापूर्वी करण जोहर याने ह्रतिक रोशन सोबत ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात काम केलं आहे. (Entertainment masala)

चित्रपटाच्या टीझरबद्दल सांगायचं तर अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’ (War 2) च्या टीझरची सुरुवात ह्रतिक रोशन आणि ज्युनिअर एन.टी.आर यांच्या इंट्रोडक्शनने होते. ह्रतिक (कबीर) चित्रपटात स्पाय एजंट आणि आर्मी ऑफिसर दाखवला असून ज्युनिअर एन.टी.आर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.याशिवाय कियारा अडवाणीचा बोल्ड लूकही प्रेक्षकांचं लक्ष नक्कीच वेधून घेतं. तसेच, यशराज फिल्म्सच्या स्पाय चित्रपटांची खासियत असणारे अॅक्शन सीन्सही उत्सुकता अधिक वाढवणारे आहेत. आता नेमकं या स्पाय चित्रपटात तिची काय भूमिका आहे हे लवकरच उलगडेल. पण ज्युनिअर एन.टी.आरचा (Jr NTR) डेब्यू हिंदी चित्रपट ‘वॉर २’ प्रेक्षकांना नक्कीच चक्रावून सोडणार यात वादच नाही. (Entertainment)
================================
हे देखील वाचा: War 2 : दमदार अॅक्शन आणि कसदार अभिनय; ह्रतिक-Jr NTRच्या चित्रपटाचा टीझर रिलीज
=================================
तसेच, यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्समधील (Spy universe) ‘वॉर २’ हा सहावा चित्रपट आहे. यापूर्वी ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘वॉर’, ‘पठाण’, आणि ‘टायगर ३’ आत्तापर्यंत रिलीज झाल्या आहेत. तर, लवकरच पहिला फिमेल स्पाय चित्रपट ‘अल्फा’ भेटीला येणार असून यात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. ‘वॉर २’ चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. (War 2 movie release date)