जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात कमावले ‘इतके’ कोटी!
भारतात गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांचा विशेष कल दिसून येतो. मिशन इम्पॉसिबल, फायन डेस्टिनेशन अशा अनेक हॉलिवूडपटांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. आता नुकताच ‘कराटे किड: लिजेंड्स’ (Karate Kid Legends) चित्रपट भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी अजय देवगण आणि त्याचा मुलगा युग देवगण (Yug Ajay Devgan) यांनी दोन प्रमुख पात्रांना आवाज दिला आहे. भारतात या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शन किती केलं यावर एक नजर टाकूयात..(Box office collection)

‘कराटे किड: लिजेंड्स’ चित्रपट ३० मे रोजी भारतात प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १.७५ कोटींची कमाई केली आहे. तसं पाहायला गेलं तर फार प्रेक्षकांनी प्रतिसाद जरी . चित्रपटाला दिला नसला तरी अजय देवगणने (Ajay Devgan) आपल्या मुलाला हॉलिवूड चित्रपटात लॉंच केलं आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चित्रपटाच्या हिंदी एडिशन थिएटरमध्ये 6% उपस्थिती होती, तर इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू एडिशनमध्ये तुलनेत अधिक प्रतिसाद मिळाला.(Bollywood news)
================================
हे देखील वाचा: Ajay Devgan : ‘अजय ते विजय साळगांवकर’;बॉलिवूडमध्ये 9 मराठी पात्र साकारणारा देवगण!
=================================
‘कराटे किड: लिजेंड्स’ या चित्रपटाच्या हिंदी डबिंगमध्ये अजय देवगणने मिस्टर हॅन (जॅकी चॅन) या पात्राला, तर युगने ली फॉंग (बेन वांग) या पात्राला आवाज दिला आहे. तसेच, लवकरच व्हिडिओ-ऑन-डिमांड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. नेटफ्लिक्स या चित्रपटाचा ओटीटी पार्टनर असल्यामुळे, चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर चार महिन्यांनी, म्हणजे सप्टेंबर २०२५च्या अखेरीस नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.(Entertainment news)