
Kareena Kapoor : करिना नाही तर ‘जब वी मेट’मधील गीत असती ‘ही’ अभिनेत्री
बॉलिवूडमध्ये सध्या नेपोकिड्स आपलं नशीब आजमवण्यासाठी चित्रपटात येत आहेत. मात्र, आपल्या आई-वडिलांची अभिनयाची परंपरा काही ठराविक स्टारकिड्सच पुढे नेऊ शकत आहेत. आता स्टार किड्स म्हटलं की कपूर कुटुंबाचं नाव घेणं आलंच की. पृथ्वीराज कपूर (Prithviraj Kapoor) यांच्यापासून सुरु झालेला कपूर कुटुंबाचा चित्रपटसृष्टीतील प्रवास रणबीर कपूरपर्यंत सुरुच आहे. तसं, पाहायला गेलं तर चित्रपटसृष्टी ही काही अंशी Male Dominated आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मात्र, या पुरुषप्रधान चित्रपटसृष्टीत कपूर कुटुंबातील मुलींनी आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर नवं विश्व निर्माण केलं आहे. करिना कपूर (Kareena Kapoor) हे याचं विश्वातील एक नाव. आजवर अनेक सुपरहिट चित्रपट देणारी करिना ‘जब वी मेट’ (Jab We Met) चित्रपटात नसती हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊयात इंटरेस्ट्रिंग किस्सा…(Bollywood Movies)
करिना कपूर (Kareena Kapoor) हिच्या चित्रपटांची यादी काढली तर ‘जब वी मेट’ हा चित्रपट पहिल्या ५ टॉप चित्रपटांमध्ये नक्कीच असेल. इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील ‘गीत’ (Geet) करिना कपूर शिवाय कुणी असू शकेल अशी कल्पना खरं तर नक्कीच करता येत नाही. पण ‘गीत’ या भूमिकेसाठी करिना कपूर नाही तर आधी प्रिती झिंटा (Preity Zinta) हिला अप्रोच करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर आदित्यच्या भूमिकेसाठी देखील शाहिद कपूर (Shahid Kapoor) नव्हे तर वेगळाच अभिनेता फायनल करणार होते. करिना आणि शाहिद यांच्या ब्रेकअपूर्वी त्यांचा हा एकत्रित शेवटचा चित्रपट आधी प्रिती झिंटा आणि बॉबी देओल (Bobby Deol) या जोडीला ऑफर झाला होता. (Untold stories)

दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी Galatea India सोबत बोलताना चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल भाष्य केलं. ते म्हणाले की, “बॉबी देओल हा माझा फार जुना आणि जवळचा मित्र असल्यामुळे त्यांच्यासोबत एक चित्रपट मी करावा अशी इच्छा होती. आणि त्यामुळेच ‘जब वी मेट’साठी (Jab We Met) त्याला विचारलं होतं. पण त्यावेळी तो इतर प्रोजेक्ट्समध्ये बिझी असल्यामुळे त्याला हा चित्रपट करता आला नाही”. (Entertainment masala)
================================
हे देखील वाचा: Shahid-Kareena : इम्तियाज अलींनी ‘जब मी मेट २’ बद्दल केलं महत्वाचं विधान
================================
तर, ‘गीत’ या भूमिकेबद्दल बोलताना इम्तियाज म्हणाले की, “गीत या भूमिकेसाठी मी प्रिती झिंटाला विचारलं होतं पण तिने नकार दिला. खरं तर आजवर मी जे जे चित्रपट केले त्यांपैकी सर्वाधिक रिजेक्शन मिळवणारा ‘जब वी मेट’ हा चित्रपट होता. ज्यावेळी मी प्रितीला कथा ऐकवली होती तेव्हा ती हसत होती. आधी मला वाटलं ती माझ्यावर हसतेय. पण ती म्हणाली की कथा खरंच छान आहे. काही कारणामुळे जब वी मेटमध्ये प्रिती झिंटा आणि बॉबी देओल जरी दिसले नसले तरी आजही प्रिती झिंटाला (Preity Zinta) मी माझ्या चित्रपटाचं पहिलं क्रेडिट देतो कारण ती पहिली व्यक्ती होती जिने हा चित्रपट चांगला आहे अशी सकारात्मक रिएक्शन दिली होती”. (Bollywood tadaka)

बॉबी देओल आणि प्रिती झिंटा यांच्याकडून नकार आल्यानंतर शाहिद कपूर आणि करिना कपूर यांना गीत-आदित्य या भूमिकांसाठी विचारलं आणि त्यानंतर जब वी मेट चित्रपटाने इतिहासच रचला आहे. आजही प्रेक्षकांना जब वी मेट हा चित्रपट आपलासा वाटतो. त्यातील गीत हे पात्र प्रत्येक मुलगी स्वत:शी कनेक्ट करते तर आदित्य फेस करत असलेल्या घटना मुलं कनेक्ट करतात. १५ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या जब वी मेट चित्रपटाने १७ वर्षांपूर्वी ५०.९ कोटी कमावले होते. हिंदी चित्रपसृष्टीतील अनेक आयकॉनिक चित्रपटांमध्ये जब वी मेट चित्रपटाचा सहभाग होतोच.(Kareena Kapoor Movies)
दरम्यान, करिना आणि शाहिद यांनी ‘चुप-चुपके’, ‘फिदा’, ‘३६ चायना टाऊन’, ‘मिलेंगे-मिलेंगे’ या चित्रपटात एकत्र कामं केली होती. तर प्रिती झिंटा आणि बॉबी देओल यांनी ‘झुम बराबर झुम, ‘Soldier’’, ‘हिरोज’ हे चित्रपटात स्क्रिन शेअर केली होती. लवकरच बऱ्याच वर्षांनी प्रिती झिंटा मोठ्या पडद्यावर ‘लाहौर १९४७’ या चित्रपटात Sunny Deol सोबत दिसणार आहे.