‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘कौन बनेगा करोडपति 15’ चे रजिस्ट्रेशन झाले सुरु; जाणून घ्या कसे कराल
देशातील सर्वात लोकप्रिय गेम शो पैकी एक असलेल्या कौन बनेगा करोडपतीच्या 15 व्या सीझनसाठी नोंदणी शनिवारी सायंकाळपासून सुरू झाली आहे. स्वतः महानायक अमिताभ बच्चन यांनी याची घोषणा केली आहे. बिग-बी यांनी याबाबतचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर लिहिले की, केबीसी 15 साठी नोंदणी 29 एप्रिल रोजी रात्री 9 वाजल्यापासून सुरू झाली आहे. केबीसीची सुरुवात 2000 सालापासून झाली होती. त्यानंतर 14 सीझनमध्ये लोकांनी केबीसीच्या हॉट सीटवर प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन कोट्यवधी रुपये जिंकले आहेत. (Kaun Banega Crorepati 15)
२००० मध्ये सुरू झाल्यापासून अमिताभ बच्चन या शोचे होस्ट आहेत. २००० मध्ये सुरू झालेल्या ‘केबीसी’चा तिसरा सीझन वगळता २००७ मध्ये सुपरस्टार शाहरुख खानने होस्ट केलेला ‘केबीसी’ हा शो बच्चन यांनी होस्ट केला आहे. २००७ मध्ये या शोचा तिसरा सीझन अभिनेता शाहरुख खानने सादर केला होता. केबीसीच्या 14 व्या पर्वात भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या सीझनमध्ये आमिर खान, एम.सी. स्टॅन, मेरी कोम, निखत झरीन, सुनील छेत्री यांसारखे सेलेब्स हॉट सीटवर बसले होते. केबीसीच्या 14 व्या सीझनमध्ये अनेक नवे नियम आणण्यात आले होते. त्यात ७५ लाख रुपयांच्या पैशाचा प्रश्नही जोडण्यात आला. या प्रश्नाचे अचूक उत्तर दिल्यानंतर स्पर्धक शो मधून ७५ लाख रुपये जिंकणार होतो.
केबीसी गेममध्ये सहभागी होण्यासाठी तुमचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे, तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे, तसेच तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणे आवश्यक आहे. कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही दोन प्रकारे केबीसीची नोंदणी करू शकता. केबीसी ची नोंदणी करण्यासाठी आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धती वापरू शकता. जर तुम्हालाही नोंदणी करायची असेल तर खाली दिलेल्या गोष्टी फॉलो करा.(Kaun Banega Crorepati 15)
===================================
हे देखील वाचा: लाखांची गाडी सोडून सारा अली खान ने केला चक्क मुंबई मेट्रोतून प्रवास !
====================================
जाणून घेऊया केबीसीमध्ये नोंदणीच्या तिन्ही मार्गांबद्दल. सर्वप्रथम kbcliv.in वेबसाइटवर जा किंवा केबीसीमध्ये नोंदणीवर क्लिक करा.वरील लिंकवर क्लिक करताच एक नवीन पेज ओपन होते. ज्यामध्ये तुम्हाला केबीसी गेम शो कौन बनेगा करोडपती – रजिस्ट्रेशन प्रश्न विचारण्यात आला आहे. हा प्रश्न रोज बदलत जातो. असा प्रश्न तुमच्यासमोर आल्यानंतर आता त्याचे उत्तर निवडा. आता तुमच्या मोबाईल नंबरवरून मेसेज टाइप करा. उत्तर देण्यासाठी, खाली वर्णन केल्याप्रमाणे संदेश लिहा.
केबीसी ए / बी / सी / डी वय पुरुष / महिला 509093 जर तुमचे उत्तर बी असेल आणि तुम्ही पुरुष असाल ज्याचे वय 27 असेल तर असे टाइप करा, केबीसी बी 27 एम आणि 509093 या नंबर वर पाठवून द्या. आणि जर तुमचे उत्तर बी असेल आणि तुम्ही महिला असाल ज्याचे वय 27 वर्षे असेल तर असे टाइप करा केबीसी बी 27 एफ 509093 वर पाठवा.