
Suraj Chavan : “गावातल्या मुलाला स्वीकारणारच नाही का?”; केदार शिंदेंचा ट्रोलर्सला थेट प्रश्न
मराठी बिग बॉस फेम सूरज चव्हाण याचा नुकताच ‘झापुक झुपूक’ (Zhapuk Zhupuk) चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षक कौतुक जरी करत असले तरीही चित्रपटाला आणि सूरजला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अशात आता दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सोशल मिडियावरुन ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत गावातल्या मुलाला अभिनेता म्हणून आपण स्वीकारणारच नाही का? असा थेट प्रश्नच त्यांनी विचारला आहे. नेमकं काय म्हणाले? वाचा….(Marathi movies)
सूरज चव्हाणच्या (suraj chavan) ‘झापुक झुपूक’ चित्रपटाबद्दल केदार शिंदे यांनी इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. केदार यांनी म्हटले आहे की, “सूरजच्या ज्या चुका असतील त्या सांगा. तो नट म्हणून आता सुरुवात करतोय. यापुढे त्याला मोठं करिअर आहे. सूरजचे फॅन्स कुठे गेलेत तेच कळत नाहीये. ते ट्रोलर्सना का उत्तर देत नाहीयेत? बिग बॉस करत होतो तेव्हा सूरजची प्रसिद्धी बघितली होती. तळागाळातला माणूस सूरजच्या मागे होता. आज नेमकी तीच माणसं कमी दिसत आहेत.” (Trending news)

पुढे केदार म्हणाले की, “अशा लोकांना वेळीच थांबवलं नाही तर या महाराष्ट्रातल्या गावखेड्यातला माणूस पुढे येणार नाही. ही गोष्ट एका शहरापुरती मर्यादीत नाही. ही गोष्ट एका शहरापुरती मर्यादीत राहू नये, यासाठी आपण सर्व मराठी माणसांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. गावातला मुलगा आपण स्वीकारणारच नाही का? मी त्याला स्वीकारला.”(Bollywood news)
केदार पुढे म्हणाले की,”मी आजपर्यंत जे १७ चित्रपट केले त्यात वेगवेगळ्या लोकांसोबत काम केलं. सोनाली कुलकर्णी कुठुन पिंपरी चिंचवडमधून येते का, मग तिला कशाला घ्यायचं? असा विचार नाही केला. मग सिद्धार्थ जाधव कुठुन येतो तो बहुजन समाजातला आहे का, तर त्याला नाही घ्यायचं! असा विचार कधीच माझ्या मनात नाही आला. ते पण शिकतच होते. आज त्यांची प्रगती दृष्ट लागण्यासारखी आहे. हळूहळू का होईना सूरज त्या लेव्हलला नक्की पोहोचेल.” (Entertainment news)

चित्रपटाच्या टीझरला ट्रोल केल्याच्या घटनेवरुन ते म्हणाले की, “पहिल्या टीझरला लोकांनी सूरजला खूप ट्रोल केलं. ट्रेलर आल्यावर थोडे त्यांचे सूर बदलले. सिनेमा पाहिल्यानंतर त्यांचे सूर बदलले पण तरीसुद्धा सूरजला ठोकायचंय. म्हणजे त्यांना वेगळं बोलायचंय हे कळतंय पण हा ठरवून काहीतरी वेगळंच बोलतंय. ही गोष्ट माणूस म्हणून मनाला लागण्यासारखी आहे. माणूस म्हणून आपण एकमेकांशी कनेक्ट करु शकलो नाही, तर आपण कपाळकरंटे आहोत हे माझं ठाम मत आहे”. (Marathi movie)
============
हे देखील वाचा :Hera Pheri 3: राजू, श्याम आणि बाबू भैया पुन्हा ‘हेरा फेरी’ करायला सज्ज!
============
दरम्यान, केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ या चित्रपटात सूरज चव्हाण जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Zhapuk Zhupuk movie cast)