Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Amitabh Bachchan : ‘कभी कभी’ चित्रपटाची ५० वर्ष पूर्ण!

Rashmika & Vijay : ‘विरोश’च्या हळदीचे खास फोटो आले समोर;

The Kerala Story 2 ला सेन्सॉर बोर्डाची कात्री; तब्बल १६

Bigg Boss Marathi 6: ‘आम्ही रीलस्टार नाही रियल स्टार’, Bigg

‘बागबान‘ सिनेमाकरीता बी आर चोप्रा यांना Dilip Kumar हवा होता!

Abhinay Berde, हार्दिक जोशी अभिनेत्री प्रितम कागणे, दीप्ती देवी यांचा

Rohit Raut म्हणतोय ‘डीपी झूम करून’

Big Boss Marathi 6 : टोळी आणि बाल्कनी ग्रुपने केलं

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Rishi Kapoor : ऋषी कपूर व नीतू सिंगमध्ये खुल्लम खुल्ला प्यार

 Rishi Kapoor : ऋषी कपूर व नीतू सिंगमध्ये खुल्लम खुल्ला प्यार
कलाकृती विशेष

Rishi Kapoor : ऋषी कपूर व नीतू सिंगमध्ये खुल्लम खुल्ला प्यार

by दिलीप ठाकूर 14/05/2025

चित्रपटाच्या रहस्यरंजकतेत एखाद्या कलाकाराच्या प्रतिमेचा सही रे सही उपयोग करुन घेता आल्यास प्रेक्षकांना क्लायमॅक्सपर्यंत खिळवून ठेवण्यात यश मिळते आणि मग खरा खुनी कोण? हे समजताच जोर का धक्का धीरे से लगे असे होऊन जाते….यातही दिग्दर्शक दिसतो. इफ्तेखार हे साठ व सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटातील अतिशय कर्तबगार असे पोलीस इन्स्पेक्टर म्हणून ओळखले जात होते. कधी त्यांना कमिशनर पदावर बढतीही मिळाली. त्यांचं उलटसुलट प्रश्नांनी जाब विचारणे, रोखून बघणे, विशिष्ट शैलीत हातातील सिगारेट ओढणे हे सगळेच चित्रपट रसिकांना ज्ञात झालेले. त्याच शैलीत ते खुनांचा तपास सुरु करतात. (Rishi Kapoor And Neetu Singh)

अजय (ऋषी कपूर) व निशा ( नीतू सिंग) हे प्रेमिक पोलीस इन्स्पेक्टर भूपेन्द्र सिंह ( इफ्तेखार) यांना सगळा घटनाक्रम सांगतात. अशातच एक उंच धिप्पाड व्यक्ती ( देवकुमार) त्यांचा पिच्छा सोडत नाही. त्याच्यापासून अजय व निशा दूर पळतात. पण…. पण चित्रपटाच्या क्लायमॅक्सला समजते की ही उंच धिप्पाड व्यक्ती म्हणजे इन्स्पेक्टर सूद आहे तर जी व्यक्ती आपण पोलीस इन्स्पेक्टर आहोत हे सांगत असते ते भूपेन्द्र सिंह खुनी असतात. (Bollywood news)

दिग्दर्शक रवि टंडन ‘खेल खेल में’ या चित्रपटात असा चकमा देण्यात यशस्वी ठरले आणि हा म्युझिकल रहस्यरंजक चित्रपट सुपर हिट ठरला. १६ मे १९७५ रोजी हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला. मेन थिएटर मराठा मंदिर. १९७५ हे एकाच वेळेस अनेक जाॅनरचे चित्रपट यशस्वी ठरल्याचे उल्लेखनीय वर्ष. यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’ असो, गुलजार दिग्दर्शित ‘आंधी’ असो, फिरोज खान दिग्दर्शित ‘धर्मात्मा’ असो, सतराम रोहरा दिग्दर्शित ‘जय संतोषी मां’ असो. ( आणखीन दोनच आठवड्यात जय संतोषी मां चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. ) आणि या सगळ्यावर रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ ( १५ ऑगस्ट २०२५ ला पुन्हा प्रदर्शित होतोय) चा दबदबा असो. (Entertainment update)

राज कपूर दिग्दर्शित’ बाॅबी’ ( १९७३) च्या खणखणीत यशाने ऋषी कपूर स्टार झाला तरी दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटाची रिमेक असलेल्या पुत्तन्ना कनागल दिग्दर्शित ‘झहरिला इन्सान’ ( १९७४) च्या सुपर फ्लाॅपने हिसाब बरोबरीचा झाला. आता ऋषी कपूरला सावरायला एका सुपर हिट चित्रपटाची गरज होती ( हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अलिखित नियम हे असेच यशापयशाभोवती आहेत.)

‘खेल खेल मे’ची ध्वनिमुद्रिका प्रकाशित होताच त्यातील युथफुल गीत संगीत ऐकता ऐकता एकदम लोकप्रिय झाले. गुलशन बावरा यांच्या गीतांना राहुल देव बर्मनचे तरुण संगीत होते. एक मै और एक तू दोनों मिले इस तरह (पार्श्वगायक किशोरकुमार व आशा भोसले), खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों किशोरकुमार व आशा भोसले), हमने तुमको देखा तुमने हमको देखा कैसे (शैलेंद्रसिंग), सपना मेरा टूट गया ( आशा भोसले), आये लो प्यार के दिन आये ( किशोरकुमार व आशा भोसले) अशी सर्वच गाणी लोकप्रिय. (Indian classic movies)

खुल्लम खुल्ला गाण्याचे चित्रीकरण काश्मीरमधील पहेलगाम इत्यादी ठिकाणचे. सस्पेन्स पिक्चर असो वा भूतपट असो त्यातील गीत संगीत एकदम भारी असणारच ही त्या काळातील खासियत. खऱ्या अर्थाने ते मनोरंजनाचे उत्तम पॅकेज होते. (आजच्या सिनेमावाल्यांना नेमका त्याचाच विसर पडलाय, ते जास्त भर जोरशोर करणाऱ्या पार्श्वसंगीतावर देतात. अनेकदा त्याचीच भीती वाटते.) खेल खेल मे प्रदर्शित सज्ज होईपर्यंत गाण्यांची जबरा क्रेझ निर्माण झालेली. पिक्चर प्रदर्शित होण्यासाठीची ही सकारात्मक सपोर्ट सिस्टीम. आणि तेच घडले, फर्स्ट शोपासूनच पिक्चर हिट. लोकप्रिय संगीत व चकमा देणारा क्लायमॅक्स यांनी चित्रपट सुपर हिट ठरला. (Bollywood tadaka)

==============

हे देखील वाचा : Sholay :’शोले’ची ५० वर्ष पुर्ण; प्रेक्षकांसाठी खास रि-रिलीज होणार चित्रपट

==============

एका महाविद्यालयातील तरुण तरुणींचा एक ग्रुप अभ्यासाबरोबरच धमाल मौज मस्ती मनोरंजन धटिंगणपणा करत काॅलेज लाईफ मस्त एन्जॉय करत असतानाच एकेक खून होत जातो आणि रहस्यमय वातावरण निर्माण होते. लुई धाॅमस लिखित ‘गुड चिल्ड्रन डोन्ट किल’ या कादंबरीवर आधारित खेल खेल मेची पटकथा सचिन भौमिक यांची आहे. टर्न आणि ट्वीस्ट त्यात भरपूर.
खेल खेल मेच्याच सेटवर ऋषी कपूर व नीतू सिंग वाढलेली मैत्री आणि त्यांचे प्रेमात झालेले रुपांतर यांचा प्रत्यय चित्रपटात पडद्यावर दिसतोय. (Untold stories)

विशेषत: रोमॅन्टीक गाण्यात क्या कहने. एकदम कलरफुल आणि मनमोकळी. ऋषि कपूर व राकेश रोशन यांनी एकत्र भूमिका केलेला हा पहिला चित्रपट. तेव्हापासून त्यांची जमलेली आणि त्यात जितेंद्रचा सहभाग ही एक हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित फ्रेन्डशीप ठरली. त्यावर स्वतंत्र फोकस टाकता येईल अशा अनेक झक्कास गोष्टी आहेत. ‘खेल खेल मे’ चित्रपटात अरुणा इराणी, जानकीदास, युनुस परवेझ, प्रीती गांगुली, सत्येन कप्पू, ललिता पवार, हरी शिवदासानी, कमल कपूर, चांद उस्मानी इत्यादींच्याही भूमिका. चित्रपटाचे संवादलेखन कादर खानचे आहेत. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील हा चित्रपट. आणि या संवादलेखनाचे त्याला एकवीस हजार रुपये मानधन मिळाले. पन्नास वर्षांपूर्वी ही खूपच मोठी रक्कम होती. गंमत म्हणजे चित्रपटात मिथुन चक्रवर्ती ज्युनियर आर्टिस्ट म्हणून जेमतेम दिसतो. तसा तो आणखीन काही चित्रपटात जेमतेम दिसला आणि त्यातूनही त्याने मोठी झेप घेतली.(Entertainment masala)

==============

हे देखील वाचा : Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते

==============

दिग्दर्शक रवि टंडन हे रविना टंडनचे पिता. आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटात त्यांनी केवढी तरी विविधता दाखवली. त्यात रहस्यरंजकता ही एक यशस्वी ठरलेली पाॅवरफुल गोष्ट. त्यांच्या दिग्दर्शनातील अनहोनी ( १९७३), मजबूर ( १९७४) , जवाब ( १९८५) यात ते पाह्यला मिळते. दिग्दर्शक रवि टंडनने खेल खेल मेचीच टीम घेऊन ‘झूठा कही का’ ( १९७९) बनवला. त्याचीही गाणी लोकप्रिय. ‘खेल खेल मे’चाच मसाला वापरुन दिग्दर्शक अब्बास मुस्तानने ‘खिलाडी’ ( १९९२) बनवला आणि अक्षयकुमार स्टार झाला, त्याला ‘खिलाडी हीरो’ अशी उपाधी मिळाली. ‘खेल खेल मे’च्या यशाची गोष्ट इतक्यावरच थांबत नाही. ऋषी कपूरने आपल्या आत्मचरित्राला नाव दिले, ‘खुल्लम खुल्ला…’ एक सुपरड्युपर हिट चित्रपट बरेच काही घडवत असतो ते असे, एकदम खुल्लम खुल्ला. (Bollywood news)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood classic film Entertainment Indian Cinema khel khel mein nitu singh Rishi Kapoor
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.