
Kiara Advani : प्रेग्नेंसीनंतर कियारानं ‘या’ चित्रपटातून घेतली माघार
बॉलिवूडमधील क्यूट कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि Kiara Advani यांनी २८ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या चाहत्यांना लवकरच त्यांच्या गरी पाहूणा येणार असल्याची गोड बातमी दिली. २ वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकलेल्या सिद्धार्थ-कियाराकडून ही आनंदाची बातमी ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक होते. दरम्यान, एकीकडे कियाराने प्रेग्नंसी जाहिर केली असून दुसरीकडे तिने एका मोठ्या हिंदी चित्रपटातून माघार घेतल्याचं समोर येत आहे. या आगामी बिग बजेट चित्रपटात कियारा अडवाणी रणवीर सिंगसोबत झळकणार होती.
फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन २’ या चित्रपटाच्या यशानंतर लवकरच ‘डॉन ३’ (Don 3) यावा अशी मागणी डॉन चित्रपटाचे चाहते करत होतेच. त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी डॉ ३ चित्रपटाची अधिकृत घोषणा करत या चित्रपटात रणवीर सिंग आणि Kiara Advani प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. मात्र, आता कियारा प्रेग्नेंसीमुळे ‘डॉन ३’ चित्रपटातून माघार घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे कियारा अडवाणीला‘डॉन ३’ चित्रपटात कोणती अभिनेत्री रिप्लेस करणार याचा चर्चा सुरु असून निर्माते दिग्दर्शक नक्कीच काळजीत आहेत. (Kiara-Siddharth preganancy)

इंडिया टुडे’ मध्ये दिलेल्या माहितीनुसार, कियारा अडवाणी सध्या मॅटरनिटी सुट्टीवर जाण्यापूर्वी ‘टॉक्सिक’ आणि ‘वॉर २’ चं शूटिंग पूर्ण करत आहे. तसेच, परत आल्यावर कियारा ‘शक्ती शालिनी’ या मॅडॉकच्या हॉरर-कॉमेडीचा भाग असेल असं सांगितलं जात असून यशराज फिल्म्सच्या Dhoom 4 मध्येही कियारा असणार असं म्हटलं जात आहे. मात्र, आई झाल्यानंतर जेव्हा Kiara Advani शुटींग सुरु करेल तेव्हाच या चित्रपटांचा ती भाग आहे या बातम्यांवर शिक्कामोर्तब होईल. (Bollywood gossip)
===============================
हे देखील वाचा : Re-Release 2025 : जुनं ते सोनं; Re-release trend का होतोय व्हायरल?
===============================
‘डॉन’ या चित्रपटाचे लाखो चाहते आहेत. १९७८ साली अमिताभ बच्चन यांनी साकारलेला डॉन सलीम-जावेद यांनी लिहिला होता. त्यानंतर २००६ मध्ये ‘डॉन २’(Don 2) ची फरहान अख्तर याने घोषणा करत त्यात शाहरुख खान डॉन होता. आता बॉलिवूडमधल्या दोन सुपरस्टार्सनी डॉन ची भूमिका साकारल्यामुळे ‘डॉन ३’ (Don 3) मध्ये कोण असणार? पुन्हा शाहरुख असणार का अशी चर्चा सुरु असताना फरहान रणवीर सिंगच्या नावाची घोषणा केली होती. त्यामुळे आता ‘डॉन ३’ मध्ये रणवीर काय कमाल करणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. (Entertainment masala)