Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

‘ट्रॅजेडी क्वीन’ मीनाकुमारांच्या बायोपिकमधून Kriti Sanonचा पत्ता कट?; ‘ही’ अभिनेत्री करणार एन्ट्री?
हिंदी चित्रपटसृष्टीतील ट्रेजेडी क्वीन अर्थात अभिनेत्री मीना कुमारी (Meena Kumari) यांच्या जीवनावर लवकरच बायोपिक येणार आहे… बऱ्याच महिन्यांपासून या बायोपिकची चर्चा सुरु असून मीना कुमारी यांची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार याचा अंदाज लोकं लावत आहेत.. पण आता फॅशन डिझायनर मनीश मल्होत्रा (Manish Malhotra) यांचा दिग्दर्शकीय पदार्पण असणाऱ्या या बायोपिकमध्ये चक्क कियारा अडवानी हिची एन्ट्री झाल्याची माहिती समोर येत आहे… (Kiara Advani Movie)

मुळात मीना कुमारी यांचे जितके चित्रपट आणि त्यांच्या प्रत्येक भूमिका हिट ठरल्या आणि चर्चेत होत्या तितकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत असायचं…दिग्दर्शक कमाल अमरोही (Kamal Amrohi) आणि त्यांचं वैवाहिक जीवन आणि त्यांच्या जीवनातील इतरं बऱ्याच गोष्टी कायम गॉसिप्स बनत होत्या… मात्र, त्याहीपलिकडे त्या यशस्वी अभिनेत्री होत्या हे सत्य डावलून चालणार नाही… आणि म्हणूनच मीनाकुमारींच्या जीवनावरील बायोपिकमध्ये त्यांची भूमिकता कियारा अडवाणी साकारणार असं सांगितलं जात आहे…(Bollywood News)
मिड डेने दिलेल्या माहितीनुसार, निर्माते बिलाल अमरोही यांच्या या चित्रपटात मीना कुमारी आणि त्यांचे पती कमल अमरोही यांची कहाणी दाखवण्यात येणार आहे… आधी मीना कुमारींच्या भूमिकेसाठी क्रिती सेनॉनच्या नावाची चर्चा सुरु होती… मात्र, कदाचित कियाराने तिला रिप्लेस केल्याची शंका नाकारता येत नाही… तरी, कियाराच ही भूमिका साकारणार अशी अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही आहे… (Kriti Sanon Movies)

दरम्यान, क्रिती सेनॉन आणि कियारा अडवाणी या दोन्ही गुणी अभिनेत्रींनी आपला बॉलिवूडमधला प्रवास एकाच वर्षी सुरु केला होता… २०१४ मध्ये क्रितीचा ‘हिरोपंती’ आणि कियाराचा ‘फुगली’ चित्रपट आला होता… एकाहून एक दर्जेदार चित्रपट दोन्ही अभिनेत्रींनी दिले खरे पण राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरण्याचा बहुमान क्रितीला मिळाला… आता कियारा अडवाणी खरंच मीना कुमारी यांची भूमिका साकारणार का आणि या चित्रपटातून ती राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे… (Meena Kumari Biopic)
================================
हे देखील वाचा : Charlie Chaplin यांना ‘हा’ मराठी चित्रपट आवडला होता!
================================
मीना कुमारी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर १९३९ मध्ये Leather Face या चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली होती… बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या मीनाकुमारी यांनी १९४६ मध्ये ‘बच्चों का खेल’ या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटात पदार्पण केलं… ४०-५० चं दशकं आपल्या अभिनय आणि सौंदर्याने गाजवणाऱ्या मीना कुमारी कॅमेऱ्यासमोर कायम डावा हात लपवायच्या हे तुम्बहाला माहित आहे का? त्याचं खरं कारण असं होतं की महाबळेश्वर ते मुंबई या प्रवासादरम्यान त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता आणि त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताला मार लागला होता… याच कारणामुळे मीना कुमारी कॅमेऱ्यासमोर त्यांच्या डावा हात लपवायच्या…(Meena Kumari Accident)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi