Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाडचा पुढचा प्रवास होणार फक्त ‘हिच्यासोबत’

 देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाडचा पुढचा प्रवास होणार फक्त ‘हिच्यासोबत’
आईच्या गावात

देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाडचा पुढचा प्रवास होणार फक्त ‘हिच्यासोबत’

by Kalakruti Bureau 04/04/2022

कलाकार आणि सोशल मीडिया यांचे खूपच अनोखे आणि घनिष्ठ नाते आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे कलाकारांना मोठी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळते. त्यामुळेच हे माध्यम जेवढे लोकांसाठी महत्वाचे आहे तेवढेच कलाकारांसाठी देखील महत्वाचे आहे. 

सोशल मीडिया मार्फत कलाकार त्यांच्या वैयक्तिक आणि व्यायसायिक आयुष्यात घडणाऱ्या अनेक बाबींची माहिती त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचवताना दिसतात. मराठी कलाकार देखील सोशल मीडियाच्या जगात अमाप लोकप्रिय आहेत. सध्याच्या घडीला टेलिव्हिजनविश्वातील ‘देवमाणूस’ असणारा किरण गायकवाड देखील प्रेक्षकांमध्ये  तुफान लोकप्रिय आहे. 

झी मराठीवरील ‘लगीर झालं जी’ या मालिकेतील खलनायकाच्या भूमिकेने अभिनेता किरण गायकवाड याला भरपूर लोकप्रियता मिळवली. या मालिकेनंतर तो ‘देवमाणूस’ या मालिकेत दिसला. सध्या या मालिकेचा दुसरा सिझन सुरु असून, तुफान गाजत आहे. मात्र यासर्वांमधे किरणने सोशल मीडियावर नुकतीच केलेली पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेत खूपच गाजत आहे. 

किरणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत लिहिले, “आता पुढचा प्रवास हिच्या सोबत” त्याच्या या पोस्टचे हे कॅप्शन वाचून अनेकांना प्रश्न पडला आहे की, किरणने देवमाणूस ही मालिका सोडली की काय?

View this post on Instagram

A post shared by Kiran Shakuntla Gaikwad (@kiran_gaikwad12)

मात्र, असे काहीही नसून किरणने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक गाडी खरेदी केली आहे. किरणने काळ्या रंगाची किया गाडी खरेदी केली असून, ही गाडी त्याने स्वतःलाच गिफ्ट केली आहे. या गाडीसोबतचे दोन व्हिडिओ किरणने सोशल मीडियावर पोस्ट केले असून, एका व्हिडिओमध्ये तो गाडीसोबतच दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो गाडीच्यापुढे नाचताना दिसत आहे. 

दुसरा व्हिडिओ पोस्ट करताना किरणने लिहिले, “मंडळामध्ये नवीन गाडीचे आगमन !!!” नवीन गाडी घेतल्याचा आनंद किरणच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. किरणच्या या पोस्टवर कलाकारांसोबतच त्याचे चाहते देखील शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by 3G Photography (@umeshgodse)

किरण गायकवाड याने ‘लागिरं झालं जी’ या मराठी मालिकेतून त्याच्या अभिनयाची सुरुवात केली. या मालिकेत त्याने रंगवलेला खलनायक खूपच गाजला. त्यानंतर त्याने ‘देवमाणूस’ या मालिकेत डॉ. अजितकुमार देव ही भूमिका साकारली जी अमाप गाजली. किरण नेहमीच त्याच्या खलनायकी भूमिकांसाठी जास्त ओळखला जातो.

=====

हे देखील वाचा: राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यानंतर प्राजक्ता माळीची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट आलीये तुफान चर्चेत 

=====

किरणला आधीपासूनच अभिनयाची आवड होती. अभिनयाचे उत्तम शिक्षण घेण्यासाठी त्याने अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि तिचे पती प्रमोद प्रभुलकर यांच्या मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमधून अभिनयाचे धडे गिरवले आहे. किरण गायकवाड हा मधुराणीचाच विद्यार्थी असून, आता तो मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीचा अभिनेता बनला आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Celebrity News celibrity news Entertainment Marathi Actor Marathi Movie zee marathi
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.