Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kishore Kumar यांनी रेकोर्डिंग स्टुडिओत गाढव आणायला कां सांगितले?

 Kishore Kumar यांनी रेकोर्डिंग स्टुडिओत गाढव आणायला कां सांगितले?
बात पुरानी बडी सुहानी

Kishore Kumar यांनी रेकोर्डिंग स्टुडिओत गाढव आणायला कां सांगितले?

by धनंजय कुलकर्णी 13/06/2025

किशोर कुमार यांच्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या अनेक किस्से आज देखील अनेक कार्यक्रमात सांगितले जातात. त्यांचा स्वभाव , त्याचं वागणं सर्वच अचंबित करणारं होतं. किशोर कुमार हरहुन्नरी कलाकार होते पण कधी कधी त्यांच्या याच स्वभावामुळे अनेक निर्मात्यांचे धाबे दणाणले जायचे! किशोर कुमारमध्ये एक छोट मूल दडलेलं होते. त्या मुळे ते वेगवेगळ्या डिमांड निर्मात्यांकडे करायचे. कधी कधी तर या डिमांड इतक्या विचित्र असायच्या की त्याची पूर्तता करताना निर्मात्याच्या नाकी नऊ यायचे. असाच एक किस्सा ‘दिल्ली का ठग’ या १९५८ साली प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी घडला होता. (Kishore Kumar songs)

या चित्रपटात किशोर कुमार आणि नूतन हि जोडी अभिनय करत होती. सिनेमाचे दिग्दर्शक होते एस डी नारंग. या चित्रपटाची गाणी तीन गीतकारांनी लिहिली होती. संगीत रवि यांनी दिले होते. प्रस्तुत गीत मजरूह सुलतानपूरी यांनी लिहिले होते. आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरातील युगल गीताचे बोल होते ‘सी ए टी कॅट कॅट माने बिल्ली आर ए टी रॅट रॅट माने चुहा…..’ ताडदेव येथील फेमस स्टुडिओमध्ये या गाण्याचे रेकॉर्डिंग होते. आशा आणि किशोर सकाळी नऊ वाजता स्टुडिओमध्ये पोहोचले. गाण्याचे कागद त्यांच्या हातात देण्यात आले. गाण्याचे शब्द वाचून किशोर कुमार हसू लागले आणि आशा भोसले यांना म्हणाले ,”आशा , ये जानवरो का गाना है ना आज थोडी मस्ती करते है…!” आशा भोसले यांच्या लक्षात आलं की किशोर कुमार आज काहीतरी ड्रामा करणार. (Entertainment news)

चित्रपटाचे दिग्दर्शक एस.डी. नारंग तिथे उपस्थित होते. त्यांना एक सवय होती कुणी काहीही म्हणाले तरी ते म्हणायचे ‘राईट राईट’. किशोर कुमार नारंग यांना म्हणाला,” सर ये गाना जानवरों का है ना?” ते म्हणाले ‘राईट राईट.’ मग किशोर कुमार म्हणाला,” या गाण्यात जर संपूर्ण भाव आणायचे असतील तर, एक गाढव तुम्ही स्टुडिओत घेऊन या. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहून गाणे म्हणेल. त्यामुळे काय होईल? गाण्यातली धमाल आणखी वाढेल!” त्यावर एस डी नारंग म्हणाले “राईट राईट.” आणि लगेच त्यांनी प्रोडक्शन एका माणसाला गाढव आणण्यासाठी पाठवलं! मुंबईमध्ये ताडदेव सारख्या एरियात गाढव मिळणं अशक्यच होत. (Entertainment)

============

हे देखील वाचा : Kishore Kumar : किशोर कुमार ‘हे’ गाणं गातांना का नर्व्हस होते !

============

दोन तास फिरून प्रोडक्शनचा माणूस दमून भागून परत आला आणि म्हणाला,” सर, गाढव मिळत नाही.” मग किशोर कुमार डोळे मिचकावत म्हणाला ,” अगर गधा नही मिलता तो घोडा मिलता है क्या देखो..!” पुन्हा प्रोडक्शनच्या माणसाला बाहेर पिटाळला पण पुन्हा प्रकार. तोवर दुपारचे दोन वाजले. किशोर कुमार म्हणाले ,” जाऊ द्या नारंग साहेब. आता लंच टाईम झालाय. सगळ्या म्युझिशियन साठी आता तुम्ही लंच मागवा नंतर आपण रेकॉर्डिंग करू.” त्यानंतर सर्वांचे जेवण झाले. (Bollywood masala)

किशोर कुमार एस डी नारंग यांना म्हणाले,” जाऊ द्या आता . घोडा गाढव काहीच मिळत नाही. मी तसाच गातो.” एका टेक मध्ये ओके झालं. गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यानंतर किशोर कुमार डोळे मिचकावत आशा भोसले यांना म्हणाला,” आशा, लोग मुझे पागल समझते है. लेकिन आज मैने सबको गधा बनाया ना!” किशोर कुमार असं विक्षिप्त का वागत होता कळत नाही. पण यातून त्याचा हेतू वाईट कधीच नसायचा. (Latest bollywood News)

एखादा निर्माता कंजुषपणा करीत असेल तर असे काही करून तो निर्मात्याकडून सर्व म्युझियम साठी लंच मिळवून घ्यायचा. मग बिर्याणी मागवायचे. आईस्क्रीम मागवायचे. त्याच्या या हट्टा मुळे सर्व युनिटला चांगलं चुंगल खायला मिळायचं! ‘दिल्ली का ठग’ त्या काळात चांगला चालला. यात नूतन ने चक्क स्विमिंग सूट घातला होता. या सिनेमातील गाणी मजरूह सोबतच एस एच बिहारी आणि शैलेंद्र यांनी देखील लिहिली होती. हम तो मुहोब्बत करेगा , ये राते ये मौसम नदी का किनारा हि गाणी त्या काळात प्रचंड गाजली होती. (Untold Stories of bollywood)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Asha BHosale Bollywood Bollywood Chitchat bollywood classic movies bollywood masala bollywood update Celebrity Celebrity News dilli ka thug Entertainment Entertainment News Kishore Kumar kishore kumar songs latest entertainment news nutan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.