Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….

Perfect Family Series Trailer: सोशल मिडिया सेन्सेशन गिरिजा ओक च्या

Isha Keskar चा ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेला रामराम? मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे चर्चांना

Bollywood : हिरोईनने नकार दिल्याने कोणता कलाकार फिल्म इंडस्ट्रीच सोडून

Ranveer Singh : लेखक ते अभिनेता असा प्रवास करणारा बॉलिवूडचा

‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

Bigg Boss 19 च्या नव्या व्होटिंग ट्रेंडनुसार Gaurav Khanna नाही तर

Asha Marathi Movie Teaser: बाईपणाच्या संघर्षाची गोष्ट दाखवणाऱ्या रिंकू राजगुरुच्या

जेव्हा Amitabh Bachchan आणि धर्मेंद्रचे सिनेमे एकाच आठवड्यात प्रदर्शित झाले!

१,३०० मुलींना पछाडत २० वर्षांची ‘धुरंधर’ चित्रपटातील रणवीर सिंगची नायिका

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

८०च्या दशकातील Kishore Kumar यांच्या रॅप गाण्याचा किस्सा!

 ८०च्या दशकातील Kishore Kumar यांच्या रॅप गाण्याचा किस्सा!
बात पुरानी बडी सुहानी

८०च्या दशकातील Kishore Kumar यांच्या रॅप गाण्याचा किस्सा!

by धनंजय कुलकर्णी 17/06/2025

नव्वदच्या दशकामध्ये एका ब्रेथलेस गाण्यान खूप लोकप्रियता असेल केली हे गाणं शंकर महादेवन यांनी गायलं होतं. कोई जो मिला तो मुझे ऐसा लगता है…. हे त्या गाण्याचे बोल होते. तरुणाई मध्ये या गाण्याची प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती. अशीच लोकप्रियता १९८० साली प्रदर्शित झालेल्य एका चित्रपटातील रॅप बर्थलेस गाड्याने निर्माण केली होती. हे गाणं किशोर कुमार यांनी गायलं होतं आणि अमिताभ बच्चन यांच्यावर हे गाणे चित्रित झाले. या गाण्याला त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण चित्रपट मात्र यशस्वी होऊ शकणार नाही. (Bollywood news)

किशोर कुमारच्या आवाजाचा एक वेगळा नजारा रसिकांना इथे पाहायला मिळाला. कोणता होता तो चित्रपट? आणि कोणतं होतं ते गाणं? अमिताभ बच्चन तेव्हा सुपरस्टार पदावर आरूढ झाला होता त्या काळात त्याचा प्रत्येक सिनेमा म्हणजे सुपरहिट होण्याची गॅरंटी होती. शशी कपूर यांच्यासोबत अमिताभ बच्चन या काळात भरपूर चित्रपट आले होते. दिग्दर्शक राकेश कुमार यांनी या दोघांना घेऊन ‘दो और दो पांच’ या चित्रपटाची निर्मिती सुरू केली होती. सिनेमातील नायिकांच्या भूमिकेमध्ये हेमामालिनी आणि परवीन बाबी होत्या. चित्रपटाचे कथानक चांगले होते पण पटकथा अगदी विस्कळीत झाली होती. त्यामुळे हा सिनेमा कुठेही भरकटच गेला होता. (Untold stories)

चित्रपटातील गाणी अंजान यांनी लिहिली होती. तर चित्रपटाला संगीत राजेश रोशन यांचे होते. या सिनेमातील सर्व गाणी किशोर कुमार यांनी गायलेली होती, यात एक रॅप सॉंग होते. जेव्हा राजेश रोशन यांनी या गाण्याची धून बनवली आणि ती घेऊन ते किशोर कुमार यांच्याकडे गेले तेव्हा ते राजेश रोशन यांना म्हणाले,” राजू ये तूने क्या बनाया है? मेरी सांस अटकाकर मरवाना चाहता है क्या?” राजेश रोशन म्हणाले,” दादा, ऐसा बिलकुल नही. आप गा सकते हो” किशोर कुमार म्हणाले,”चलो ट्राय करके देखते है!” हे गाणे होते ‘अरे तुने अभी देखा नही देखा है तो जाना नही मुझे पहचाना नही दुनिया दिवानी दिवानी मेरे पीछे पीछे भागे किस मे है दम यहा ठहर जो मेरे आगे मेरे आगे आना नही मुझसे टकराना नही किसीसे भी हारे नही हम जो समझे जो चाहे वो करके दिखाये हम वो है जो दो और दो पाच बनाये….’ (Kishore Kumar untold stories)

एवढा प्रदीर्घ मुखडा असलेल्या गाण्यात कुठेही श्वास घ्यायला जागा नव्हती. संगीतकार राजेश रोशन यांना हे गाणं ब्रेथलेस पद्धतीने हा मुखडा गाऊन घ्यायचा होता. त्या पद्धतीने रिहर्सल सुरू झाल्या. किशोर कुमार यांनी श्वास न घेता एकादम एका दमात हा मुखडा गाऊन दाखवला. राजेश रोशन खूष झाले. दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग ठरले. रेकॉर्डिंगच रिहर्सल झाल्या. राजेश रोशन यांचे सहाय्यक म्हणाले,” थांबा मला यात आणखी थोडा एक्स्प्रीमेंट करायचा आहे .” तेव्हा राजेश रोशन म्हणाले “आता एक्सपिरिमेंट वगैरे बंद आता टेक घ्यायचा आहे.” आणि टेक घ्यायला सुरुवात झाली. (Entertainment)

किशोर कुमार यांनी गायला सुरुवात केली पण मुखड्यात एका ठिकाणी त्यांनी श्वास घेतला. राजेश रोशन कट म्हणाले. पुन्हा रेकॉर्डिंग सुरू झाले. पुन्हा किशोर कुमार यांनी श्वास घेतला. राजेश रोशन पुन्हा कट म्हणाले. किशोर कुमार म्हणाले “राजू तू बार बार कट क्यू बोल रहा है?” त्यावर राजेश रोशन म्हणाले ,”दादा आपको यहा सांस नही लेनी है.” त्यावर किशोर कुमार म्हणाले,” राजू अब तू जादा मत कर .अब मुझे नही होगा.” राजेश रोशन म्हणाले,” ठीक आहे “ आणि त्यांनी पुन्हा रेकॉर्डिंग सुरू केले. किशोर कुमार यांनी अगदी हलकास श्वास घेतला. होता पण प्रेक्षकांच्या ते अजिबात लक्षात आले नाही.

================================

हे देखील वाचा: Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

=================================

हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं, किशोर कुमार यांच्या गायकीचा एक वेगळा नजारा रसिकांना पाहायला मिळाला. तसे किशोर कुमारने यापूर्वी देखील अनेक फास्ट धून वरील गाणी म्हटली होती पण या गाण्याची मजा काही औरच होती. याच
चित्रपटात हेच गाणे शशी कपूर वर देखील चित्रित होते परंतु ते गाणे राजेश रोशन यांनी गायले होते. याच सिनेमात किशोर कुमारने ‘मेरी जिंदगी ने मुझ पर अहसान क्या किया है जीने दे न मरने दे मुझे ऐसा गम दिया है…’ हे अतिशय सॉफ्ट आवाजात गाणे गायले होते जे चित्रपटात शशी कपूर वर चित्रीत झाले होते पण सिनेमात फ्लॉप झाल्याने हे सुंदर गाणे मागे पडले!(Kishore kumar songs)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood classic movies Bollywood News bollywood update Celebrity Entertainment Entertainment News Kishore Kumar kishore kumar movies kishore kumar songs
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.