
कोणत्या गाण्यासाठी Anil Kapoor ने निर्मात्यांशी भांडून किशोर कुमारचा प्ले बॅक घेतला?
सिनेमातील गाणी कोणी गायची याचा निर्णय संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक आणि कलावंत हे सर्व मिळून घेत असतात. पण अंतिम निर्णय हा निर्मात्याचा असतो कारण या सिनेमाचं बजेट तो ठरवत असतो आणि त्यानुसार तो पार्श्वगायक किंवा गायिकांची निवड करत असतो. ऐंशी च्या दशकातील एका लोकप्रिय चित्रपटातील एका गाण्यासाठी अभिनेता अनिल कपूर यांना निर्माता दिग्दर्शक फिरोज खान यांच्याशी चक्क भांडण करावं लागलं होतं. ते गाणं किशोर कुमार यांच्या आवाजात रेकॉर्ड करून घ्यावे असं त्याचं म्हणणं होतं. या सिनेमात अनिल कपूर वर चित्रीत असलेली गाणी नवोदित गायक कलाकाराकडून गाऊन घेतली जाणार होती आणि अनिल कपूर यांना हे अजिबात आवडलं नव्हतं त्यामुळे त्यांनी फिरोज खान यांच्यासोबत चक्क वाद घातला आणि आपल्या मनासारखा करून घेतलं कोणतं होतं. कोणतं होतं ते गाणं आणि काय होता तो किस्सा?

१९८४ साली फिरोज खान ‘जानबाज’ या आपल्या बिग बजेट सिनेमाच्या तयारीत होते. ‘कुर्बानी’ या सुपर डुपर हिट सिनेमा नंतर चा हा त्यांचा सिनेमा होता. या सिनेमांमध्ये फिरोज खान, अनिल कपूर, डिंपल कपाडिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या, तर अभिनेत्री रेखा आणि श्रीदेवी स्पेशल अपीयरन्समध्ये या चित्रपटात दिसणार होत्या. हा चित्रपट फार मोठ्या स्केलवर बनत होता. फिरोज खान आपल्या सिनेमाच्या बजेटच्या बाबत काहीच तडजोड करत नसायचा .‘कुर्बानी’ या चित्रपटातील एका दृश्यासाठी त्याने नव्या कोऱ्या मर्सिडीज बेंझ ची वाट लावली होती. ‘जांबाज’ हा देखील त्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सिनेमा होता पण काय कारण होतं माहित नाही या सिनेमासाठी फिरोज खान यांनी जे प्लेबॅक सिंगर्स निवडले होते ते सर्व नवोदित होते. मनहर उधास ,महेश गढवी आणि सपना मुखर्जी! या चित्रपटात अनिल कपूर वर दोन गाणी चित्रीत होणार होती . सिनेमाचं शूटिंग सुरू झालं त्याचबरोबर गाण्याचे रेकॉर्डिंग देखील.
‘जब जब तेरी सूरत देखू..’ हे गाणं डिंपल कपाडिया आणि अनिल कपूर यांच्यावर चित्रित होणार या गाण्याच्या शूटिंगच्या दरम्यान अनिल कपूरच्या असं लक्षात आलं की या गाण्याचे प्लेबॅक सिंगर महेश गढवी यांचा आवाज खूपच फ्लॅट आहे आणि सॉफ्ट आहे. मर्दाना नाही. कारण यातील अनिल कपूरची जी व्यक्तिरेखा होती ती अशी डॅशिंग होती. त्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असा हा आवाज नव्हता. म्हणून अनिल कपूर दुसऱ्या दिवशी संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्याकडे गेला आणि त्यांना सांगितलं,” हे गाणं तुम्ही किशोर कुमार यांच्या स्वरात पुन्हा एकदा रेकॉर्ड करून घ्या. हा आवाज मला अजिबात स्युट होत नाही. संगीतकार म्हणाले,” हा निर्णय पूर्णपणे निर्माता आणि दिग्दर्शक फिरोज खान यांनी घ्यायचा आहे!”

त्या नुसार अनिल कपूर फिरोज खान यांना भेटायला गेला आणि त्यांना आपल्याला या चित्रपटातील प्लेबॅक सिंगर बदलायचा आहे असे सांगितले. त्यावर फिरोज खान म्हणाले,” तू असं कसं म्हणू शकतोस? जब जब तेरी सुरत देखू या गाण्याचे तर शूटिंग देखील पूर्ण झाले आहे!” अनिल कपूर म्हणाला ,”बरोबर आहे. पण महेश गढवी चा आवाज मला अजिबात स्युट होत नाही. यापूर्वीच्या माझ्या चित्रपटात किशोर कुमार यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. साहेब, मोहब्बते, मशाल….. या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेली गाणी माझ्या चित्रीत झालेली आहेत. त्यामुळे या चित्रपटातील गाणी देखील किशोर कुमार यांनी माझ्यासाठी गायला पाहिजेत.” त्यावर फिरोज खान चिडले ते म्हणाले,” तू माझ्याशी अशा पद्धतीने कसे काय बोलू शकतोस?” त्यावर अनिल कपूर याने किशोर कुमारचा आवाज या गाण्यासाठी किती योग्य आहे हे पटवून सांगितले.
================================
================================
फिरोज खान थोडे शांत झाले आणि म्हणाले,” पण आपण किशोर कुमार यांच्यासोबत काहीच बोललेलो नाहीत. ते केवळ एका गाण्यासाठी आपल्याकडे गायला येतील का?” त्यावर अनिल कुमार अनिल कपूर असं म्हणाले ,” कदाचित मी बोलावले तर येणार नाही पण तुम्ही किंवा कल्याणजी आनंदजी यांनी बोलावल्यानंतर नक्की येतील. “ फिरोज खान यांनी संगीतकार कल्याणजी यांना किशोर कुमार यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला सांगितले. त्या पद्धतीने त्यांनी किशोर कुमारला कॉन्टॅक्ट करून गाण्याबद्दल सांगितले आणि गाणे गाण्याची विनंती केली. किशोर कुमार रेकॉर्डिंग ला आले आणि त्यांनी सपना मुखर्जी सोबत गाणे गायले. फिरोज खान देखील या रेकॉर्डिंगच्या वेळी उपस्थित होते. किशोर कुमार यांच्या स्वरातील मॉड्युलेशन बघून त्यांना खूप आनंद झाला. अशा पद्धतीने अनिल कपूर वर चित्रित ‘तेरा साथ है कितना प्यारा..’ हे गाणं रेकॉर्ड झालं! जांबाज चित्रपट सुपरहिट झाला त्यातील सर्वात लोकप्रिय गाणं हेच ठरलं!