बिबट्यांच्या हल्ल्यांविरोधात ‘Yed Lagal Premach’ मालिकेतून करण्यात येणार जनजागृती!

Kishore Kumar यांनी तब्बल आठ वेळा जिंकले होते बेस्ट सिंगर फिल्मफेअर अवार्ड!
भारतातील लोकप्रिय चित्रपट नियतकालिक फिल्म फेअरने पन्नासच्या दशकात फिल्म अवॉर्ड्स ची सुरुवात केली. १९५४ सालापासून सुरू झालेल्या फिल्म फेअर अवार्डस चा सिलसिला आज देखील चालू आहे. काहीजण याला भारतातील ऑस्कर पुरस्कार असे देखील म्हणतात. पार्श्वगायना चे फिल्मफेअर पुरस्कार १९५७ साला पासून सुरु झाले. मात्र त्या वेळी गायक आणि गायिका यांच्यासाठी एकच कॅटेगिरी होती. त्यामुळे पुरस्कार कुणा एकालाच मिळत असे. १९६७ सालापासून मात्र गायक आणि गायिकांना स्वतंत्र पुरस्कार दिले जाऊ लागले. पुरुष गायकांसाठीच्या पुरस्कारांची जेव्हा आपण आजवरची टोटल यादी बघतो त्यावेळी गायक किशोर कुमार यांना तब्बल आठ वेळेला सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळालेला दिसतो हा आजवर विक्रम आहे. (आता या विक्रमाची बरोबरी अरजित सिंग ने केली आहे! या लेखात आपण किशोर कुमार यांना कोणत्या गाण्यांसाठी हा पुरस्कार मिळाला होता आणि त्यांना कोण कोणत्या गाण्यांसाठी नामांकन मिळाले होते याचा आढावा घेऊत.
किशोर कुमार पन्नासच्या दशकापासून हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात कार्यरत होते परंतु पन्नास आणि साठ च्या दशकामध्ये प्रामुख्याने ते अभिनेता म्हणून जास्त बिझी होतो. १९६९ सालच्या ‘आराधना’ या चित्रपटापासून त्यांच्या गायकीची खरी कारकीर्द सुरू झाली आणि याच चित्रपटातील ‘रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना’ (सं. सचिन देव बर्मन) या गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला. चित्रपट सृष्टीत आल्यानंतर तब्बल वीस वर्षानंतर त्यांना पहिला पुरस्कार मिळाला. या नंतरचा पुरस्कार त्यांना १९७६ सालच्या ‘अमानुष’ या चित्रपटातील ‘दिल ऐसा किसी ने मेरा तोडा’ या गाण्यासाठी मिळाला या चित्रपटाला संगीत श्यामल मित्रा यांचे होते तर हे गाणे इंदीवर यांनी लिहिले होते.

तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट गायकाचा फिल्म फेअर पुरस्कार किशोर कुमार यांना १९७९ साली ‘डॉन’ या चित्रपटातील ‘खाईके पान बनारसवाला’ या गाण्यासाठी मिळाला. हे गाणं अंजान यांनी लिहिलं होतं तर संगीत कल्याणजी आनंदजी यांचे होते. या नंतरचा पुरस्कार १९८१ साली ‘थोडी सी बेवफाई’ या चित्रपटातील गुलजार यांनी लिहिलेल्या आणि खय्याम यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘हजार राहे मुड के देखी…’ या गाण्यासाठी मिळाला. पाचवा फिल्मफेअर पुरस्कार किशोर कुमार यांना १९८३ साली ‘ नमक हलाल’ या चित्रपटातील ‘पग घुंगरू बांध मीरा नाची थी..’ या अंजान यांनी लिहिलेल्या आणि बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यासाठी मिळाला. या नंतर चा पुरस्कार १९८४ साली ‘अगर तुम न होते’ या चित्रपटातील टायटल सॉंग साठी मिळाला. हे गाणे गुलशन बावरा यांनी लिहिले होते तर संगीत आर डी बर्मन यांचे होते.

या नंतरचा पुरस्कार त्यांना १९८५ साली मिळाला चित्रपट होता ‘शराबी’. गाण्याचे बोल होते ‘मंजिले अपनी जगह है रास्ते अपनी जगह’ हे गाणं प्रकाश मेहरा यांनी लिहिलं होतं त्याला संगीत बप्पी लहरी यांचं होतं. किशोर कुमार यांना आठवा आणि अखेरचा फिल्मफेअर पुरस्कार १९८६ साली ‘ सागर’ या चित्रपटातील ‘सागर किनारे दिल ये पुकारे’ या गाण्यासाठी मिळाला. हे गाणं लिहिलं होतं जावेद अख्तर यांनी तर संगीत राहुल देव बर्मन यांच होते. गंमत म्हणजे यापैकी १९८३,१९८४,१९८५ हे सलग तीन वर्ष त्यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला. १९८४ साली तर त्या वर्षीचे सर्व नामांकन किशोर कुमार यांनाच मिळाली होती!
================================
हे देखील वाचा : रुक जाना नही तू कभी हार के : Vinod Khanna वर चित्रित किशोर कुमारची गाणी!
================================
किशोर कुमार ला तब्बल २७ वेळा फिल्म फेअर चे सर्वोत्कृष्ट गायकाचे नामांकन मिळाले होते पैकी आठ वेळेला ते विजेते ठरले होते. किशोरच्या ज्या गाण्यांना पुरस्कार मिळाले नाहीत पण नामांकन होते ती गाणी होती, ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ (अंदाज-१९७१), ‘ये जो मुहोब्बत है’ (कटी पतंग-१९७१), ‘चिंगारी कोई भडके’ (अमर प्रेम-१९७२), ‘मेरे दिल में आज क्या है’ (दाग-१९७३), ‘गाडी बुला रही है सिटी बजा रही है’ (दोस्त-१९७४), ‘मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया’ (कोरा कागज-१९७४), ‘मै प्यासा तुम सावन’ (फरार-१९७५),’आप के अनुरोध पे मै ये गीत सुनाता हूं’ (अनुरोध-१९७७), ‘ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना’ (मुकद्दर का सिकंदर-१९७८), ‘हम बेवफा हरगीज न थे’ (शालीमार-१९७८), ‘इक रास्ता है जिंदगी’ (काला पत्थर-१९७९), ‘मेरी उमर के नौजवानो दिल न लगाना’ (कर्ज-१९८०) , ‘हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते’ ‘(कुदरत-१९८१), ‘छू कर मेरे मन को किया तुने’ (याराना-१९८१), ‘शायद मेरी शादी का खयाल’ (सौतन-१९८३), ‘इन्तेहा हो गई इंतजार की’ (शराबी-१९८४), ‘लोग कहते है मै शराबी हूं’ (शराबी-१९८४)