
Nana Patekar : ‘माझ्या गरजा साध्या’ नाना पाटेकरांचे गावात राहण्याबद्दल वक्तव्य
पूर्वी लोकं कायम शहरांकडे आकर्षित व्हायचे. इथले आधुनिक जीवन, सुखसोयी आदी सर्वच गोष्टी गावातल्या लोकांना कायम खुणवायच्या. यासाठीच सतत शहरात काम कसे मिळवता येईल आणि त्या निमित्ताने शहरात कसे जाता येईल याचा विचार करायची. काळ बदलला आणि सर्वच गावातले लोकं छोट्या छोट्या कामाच्या निमित्ताने शहरात येऊ लागले आणि कायमचे शहराचे झाले. (Nana Patekar)
हळूहळू शहराची लोकसंख्या वाढली आणि त्याचे मोठे दुष्परिणाम शहरात जाणवू लागले. तेव्हा लोकांना गावाचे, तिथल्या शुद्ध वातावरणाचे महत्व आणि फायदे समजू लागले आहेत. म्हणून जर आपण पाहिले तर आजच्या काळात अनेक कलाकार लोकं किंवा सामान्य लोकं देखील गावाकडे घर घेऊन राहत आहे. किंवा सुट्टीच्या दिवशी जमेल तसे गावाला जाऊन तिथल्या निसर्गाचा आनंद घेतात. मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार देखील गावाकडे फार्म हाऊस घेऊन राहतात. काही कलाकार तर गावाकडेच राहतात आणि कामाच्या निमित्ताने मुंबईत किंवा शहरात येतात. (Marathi News)

असेच एक दिग्गज अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. नाना यांनी देखील मुंबईला रामराम केला असून आता ते त्यांचे जीवन गावाकडे राहूनच व्यतीत करत आहे. मागील काही वर्षांपासून नाना गावालाच राहून आनंदाने त्यांचे जीवन जगत आहे. काही दिवसांपूर्वी नाना यांनी एका मुलाखतीमध्ये ते गावाकडे राहत असून त्यांचे तिकडे रोजचे रुटीन कसे आहे आणि ते गावाकडच्या घरात काय काय काम करतात हे सांगितले होते.(Nana Patekar News)
नाना यांनी सांगितले की, “मी शहरातला नाही, मी गावाकडचा माणूस आहे. मी इकडे शहरात काम करतो, आणि काम झाले की, परत गावात जातो. मी गाव-खेड्यात राहतो, आणि तिथेच राहणार, तिकडेच बरे वाटते.” पुढे नाना यांनी त्यांचे रुटीन देखील सांगितले ते म्हणाले, “मी सकाळी उठतो, घरी माझे स्वतःचे एक जिम आहे. मी जिममध्ये व्यायाम करतो. त्यानंतर माझ्याकडे दोन गायी आणि एक बैल आहे. न्याहारी, जेवण माझं सगळं जेवण मीच बनवतो. मी खरंच चांगले जेवण बनवतो. कधी कधी तर मला वाटते की, जर मी या क्षेत्रात नसतो तर मी एक छोटेसे हॉटेल उघडले असते. (Top Marathi News)
==============
हे देखील वाचा : Laxmikant Berde : लक्ष्मीकांत बेर्डे यांना केवळ १ रुपया देऊन ‘या’ दिग्दर्शकाने केले होते साईन
==============
मी आयुष्याकडून जितकी अपेक्षा केली होती, त्यापेक्षा आयुष्याने मला खूप जास्त दिले आहे. माझ्या गरजा अगदी साध्या झाल्या आहेत. संध्याकाळी मी पुस्तकं वाचतो. माझ्याकडे भरपूर पुस्तकं आहेत. रात्री मला सकाळी उठण्यासाठी अलार्म लावायची गरज नसते. मला पक्ष्यांच्या आवाजानेच सकाळी जाग येते. माझे घर डोंगरांमध्ये आहे. अतिशय सुंदर वातावरण असते तिथले माझ्या घरी कधी कधी मोर देखील येतात.” (Marathi Trending News)
नाना यांच्या घरी मराठी मनोरंजनविश्वातले त्यांचे अनेक मित्र मैत्रिणी जातात आणि त्यांचा दिवस छानपैकी व्यतीत करतात. मागे एकदा नाना यांनी कौन बनेगा करोडपती या शोमध्ये अमिताभ बच्चन यांना देखील त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. (Marathi News)