Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Gharoghari Matichya Chuli Serial: पात्र एक, रुपं अनेक…घरोघरी मातीच्या चुली मालिकेत

टॉम क्रुझच्या Mission Impossible : The Final Reckoning चित्रपटाची भारतात

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar: ह.भ.प. रामदास महाराज देसाई देतात १५० मुलांना मोफत शालेय शिक्षण

 Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar: ह.भ.प. रामदास महाराज देसाई देतात १५० मुलांना मोफत शालेय शिक्षण
Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar
टीव्ही वाले मिक्स मसाला

Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar: ह.भ.प. रामदास महाराज देसाई देतात १५० मुलांना मोफत शालेय शिक्षण

by Team KalakrutiMedia 15/04/2025

Sony Marathi वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’च्या मंचावर वेगवेगळ्या वयोगटाचे अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. कीर्तनकारांना उत्तम व्यासपीठ मिळून देणारा हा मंच आणि सहभागी स्पर्धक यांची चर्चा चांगलीच रंगली आहे. सामाजिक कुप्रथांवर आसूड ओढणारी आणि सामाजिक सौहार्दाची संस्कृती रुजवणारी कीर्तनकारांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. कीर्तनातून समाजप्रबोधन करण्याचं काम आजवर अनेक संतांनी आणि कीर्तनकारांनी केलं. आजच्या काळातही कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा हा वसा जपण्यासाठी साताऱ्याचे ह. भ. प. रामदास महाराज देसाई आपल्या कीर्तनातून समाजातल्या अनिष्ट रूढी, परंपरा नष्ट करून गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचं मोलाचं कार्य अखंडितपणे करतायेत. सातारा जिल्ह्यातल्या वाघोली गावात वारकरी संप्रदायाचा इतका प्रसार झाला नव्हता. कीर्तनाचे कार्यक्रमसुद्धा फार कमी प्रमाणात व्हायचे. मोकळेपणानं बाहेर पडण्यासाठी महिलापण घाबरत असत.(Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar)

Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar
Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar

या गावात कीर्तनातून ह. भ. प. रामदास महाराज देसाई यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सांगून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. अवघ्या एक वर्षात वाघोली गावात परिवर्तन घडून आलं. कीर्तनामुळे हे शक्य झालं. २०१९मध्ये ह. भ. प. रामदास महाराज देसाई यांनी श्रीराम वारकरी शिक्षणसंस्था उघडली. आज तिथे दीडशे मुलांचं शिक्षण ते स्वखर्चानं करतात. कीर्तन करून जे काही पैसे जमवता येतील त्यातून ते या मुलांचा सगळा खर्च करतात. भगवान मामा कऱ्हाडकर यांच्याकडून कीर्तनाचे धडे घेणारं ह. भ. प. रामदास महाराज देसाई यांचं संपूर्ण कुटुंब कीर्तनात आणि  श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांच्या सेवेत मग्न आहे. आपल्या पत्नीच्या आणि मुलांच्या सहकार्यानं मी ही जबाबदारी पेलू शकतो असं ह. भ. प. रामदास महाराज देसाई सांगतात. त्यांची मुलगी संस्थेत संस्कृतचे पाठ शिकवते. मुलगा उत्तमरीत्या मृदंग वाजवतो. कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची पूर्तता होणं आवश्यक आहे. माझे वर्षातून तीनशे ते चारशे कार्यक्रम होतात. माझ्या कीर्तनकलेची दखल संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जाते. यापेक्षा दुसरं भाग्य कोणतं असं ह. भ. प. रामदास महाराज देसाई म्हणतात.(Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar)

==================================

हे देखील वाचा :  गौतमी पाटील आता गाजवणार छोटा पडदा; ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात पहायला मिळणार पाककौशल्य…

==================================

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमात सहभागी होत असल्याचा त्यांना अभिमान वाटतो आहे. त्यांची कीर्तनसेवा बुधवारच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पाहायला विसरू नका साताऱ्यामधल्या वाघोली गावातल्या ह. भ. प. रामदास महाराज देसाई यांची कीर्तनसेवा ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमात सोमवार ते बुधवार, रात्री ८ वाजता, सोनी मराठी वाहिनीवर…!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar marathi abhang marathi kirtankar show Ramdas Maharaj Desai Sony marathi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.