‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अभिनेत्यांना जास्त मानधन का? क्रीती सेनॉनचा परखड सवाल
काही मोजक्या स्टार्सचे चित्रपट सोडले तर बरेच बिग बजेट बॉलिवूड चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. मोठमोठे दिग्दर्शक आणि त्यांचे बिग बजेट चित्रपट आणि त्यासाठी मोठमोठ्या स्टार्सना मिळणारं मानधन यांची सध्या प्रचंड चर्चा होत आहे.
मध्यंतरी सलग फ्लॉप चित्रपट देणाऱ्या, ४० दिवसांत चित्रपट पूर्ण करणाऱ्या आणि कोट्यवधी रुपयांचे मानधन घेणाऱ्या अक्षय कुमारबद्दल चांगलीच चर्चा रंगली होती.
आता नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री क्रीती सेनॉन (Kriti sanon) हीने चित्रपटसृष्टीतील पुरुष आणि महिला कलाकारांच्या मानधनातील तफावत या विषयावर भाष्य केलं आहे.
सध्या महिलांना केंद्रस्थानी ठेवून बरेच चित्रपट तयार होत असले तरी मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या बाबतीत मात्र मानधनात फरक आढळून येत आहे.
टेलिव्हिजन असो किंवा चित्रपट, हिंदी असो वा मराठी ही तफावत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते. नायकांच्या तुलनेत अभिनेत्रींना कमी मानधन मिळत असल्याबद्दल क्रीती सेनॉन (Kriti sanon) हीने नाराजी व्यक्त केली आहे. काय आहे नेमकं तिचं म्हणणं? याबद्दलच आपण आजच्या लेखातून जाणून घेऊयात!
२०२४ मध्ये क्रीतीने (Kriti sanon) शाहिद कपूरच्या ‘तेरी बातो में ऐसा उलझा जिया‘ या चित्रपटात मुख्य भूमिका निभावली. तसेच तिने करीना कपूर आणि तब्बू यांच्यासह ‘क्रु‘ या स्त्रीप्रधान चित्रपटातही मुख्य भूमिका निभावली.
दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पण तरी नायिकांच्या तुलनेत नायकांचे मानधन हे १० पटीने कधी असल्याची खंत तिने नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केली.
‘फिल्म कम्पॅनियन‘शी संवाद साधतान क्रीतीने (Kriti sanon) या विषयावर प्रकाश टाकत चित्रपटसृष्टीतील या भेदभावावर भाष्य केलं.
“आज मानधनातील तफावत ही एक मोठी समस्या आहे. ही गोष्ट आम्हालाही बऱ्याचदा जाणवते. समोरच्या अभिनेत्याने गेल्या बऱ्याच वर्षात एकही सुपरहीट चित्रपट दिलेला नसला तरी त्याला तो म्हणेल तितकं असं रग्गड मानधन दिलं जातं.” असं क्रीती (Kriti sanon) या मुलाखतीमध्ये म्हणाली.
इतकंच नव्हे तर या मानधनातील फरकाबाबत क्रीतीने प्रश्नदेखील उपस्थित केला आणि निर्माते या गोष्टींचे समर्थन करतात असं स्पष्टही केलं.
===
हेदेखील वाचा : ‘हिरामंडी’साठी कुणी किती मानधन घेतले? जाणून घ्या
===
क्रीती (Kriti sanon) याबद्दल व्यक्त होताना म्हणाली, “मानधनाच्या फरकाबाबत स्पष्टीकरण देताना बरेच निर्माते ही एकप्रकारची रिकव्हरी असल्याचं सांगतात. रिकव्हरी ही डिजिटल आणि सॅटेलाइटद्वारे होते आणि ही रिकव्हरी चित्रपट रिलीज होण्याआधीच केली जाते.”
डिजिटल प्लॅटफॉर्मवर पुरुषप्रधान चित्रपटांना Women Centric फिल्म्सपेक्षा अधिक मागणी असते त्यामुळेच मानधनातही एवढा फरक असू शकतो अशी शक्यता क्रीतीने (Kriti sanon) व्यक्त केली.
इतकंच नव्हे तर ‘क्रु‘ या चित्रपटात निर्माते अधिक पैसा लावायला तयार नसल्याच क्रीतीने (Kriti sanon) या मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं. क्रीती सेनॉन, तब्बू, करीना कपूरसारख्या ए लिस्टच्या अभिनेत्री असूनही निर्मात्यांची बजेटबाबतची उदासीनता यावरुन स्पष्ट होते.
याबरोबरच स्टार्सच्या फीमुळे निर्मात्यांवर येणाऱ्या बर्डनबद्दलही क्रीतीने भाष्य केलं आहे. स्टार्ससाठी जेवण बनवायला वेगळा शेफ आणि कुक, तसेच त्यांचा स्पॉटबॉय, सेक्युरिटी, मेकअप मॅन यांच्या पायी होणाऱ्या खर्चातच निर्माता अर्धा बुडून जातो असं मत क्रीतीने (Kriti sanon) मांडलं आहे.
यामुळेच चित्रपटाचं बजेटही अवाच्या सव्वा वाढतं आणि जर तो चित्रपट चालला नाही तर निश्चितच याचं बर्डन निर्माते यांच्यावरच येतं, कारण अभिनेते आणि अभिनेत्री हे त्यांचं मानधन घेऊन बाहेर पडतात.
या विषयावर क्रीतीने (Kriti sanon) अगदी मानमोकळेपणे कोणाचीही भीड न् बाळगता भाष्य केलं. आता लवकरच ती ‘दो पत्ती‘ या चित्रपटात काजोलसह झळकणार आहे. अभिनयाबरोबरच या चित्रपटाची ती सहनिर्माती म्हणूनही समोर येणार आहे.