जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi: ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ पुन्हा भेटीला; नव्या अंदाजात भेटायला येणार तुलसी आणि मिहीर !
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thí: खूपच लोकप्रिय ठरलेला आणि घराघरात पाहिला गेलेला टीव्ही शो ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ आता नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकता कपूर दिग्दर्शित या मालिकेत भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. आता ही मालिका जिओ हॉटस्टारवर 20 भागांच्या मिनी-मूव्ही सीरिजच्या स्वरूपात पुन्हा प्रसारित केली जाणार आहे. बालाजी टेलीफिल्म्सने निर्मित केलेली ही नवीन मालिका जुन्या आठवणींना उजाळा देतानाच नव्या पिढीला त्या अनुभवाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Return)

या बद्दल एकता कपूर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आजपासून दोन दशकांपूर्वी जेव्हा ही मालिका बनवली, तेव्हा तिला इतका मोठा प्रतिसाद मिळेल, याची कल्पनाही नव्हती. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी: तुलसी का सफर’ या नव्या सीरिजच्या माध्यमातून आम्ही त्या खास क्षणांना नव्या पद्धतीने पुन्हा जिवंत करत आहोत.”

त्या पुढे म्हणाल्या, “ही सीरिज त्या पात्रांप्रती, त्या भावना आणि कथा यांना आदरांजली आहे, ज्यांनी ह्या मालिकेला लोकांच्या हृदयात खास स्थान मिळवून दिलं. जुन्या आणि नव्या पिढीसाठी हा एक सुंदर अनुभव ठरेल, याची आम्हाला आशा आहे.” या सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले अभिनेते रोनित रॉय म्हणाले, “ही कथा कालातीत आहे. ती पुन्हा नव्या आणि क्रिएटिव्ह पद्धतीने सादर होत आहे, हे खूपच उत्साहजनक आहे. या प्रवासाचा भाग बनल्याचा मला अभिमान वाटतो.”
===============================
===============================
मिहिर विरानीच्या भूमिकेत झळकलेले अभिनेता अमर उपाध्याय म्हणाले, “‘ क्योंकि सास भी कभी बहू थी ’ ही मालिका म्हणजे त्या जुन्या सुंदर आठवणींच्या अल्बममध्ये फेरफटका मारण्यासारखं आहे. हे फक्त रिक्रिएशन नाही, तर त्या क्षणांना पुन्हा एकदा मनापासून अनुभवण्याचा प्रयत्न आहे.”ही तीन तासांची मिनी फिल्म दर शुक्रवार जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.