Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘मुंबईचा फौजदार’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये प्राजक्ता माळी दिसणार?; Gashmeer Mahajani म्हणाला…

Janhvi Kapoor हिला ३ मुलं का हवी आहेत?; तिनेच सांगितलं

राणी मुखर्जी आणि Shah Rukh Khan पुन्हा एकत्र दिसणार?; ;त्या;

Isha Deol : अभिषेक बच्चन जावई व्हावा अशी होती हेमा

Manoj Bajpayee आणि राम गोपाल वर्मा पुन्हा एकत्र; नव्या हॉरर

Rajinikanth यांना बॉलीवूडमध्ये लॉन्च करणाऱ्या सिनेमात बाजी मारली होती अमिताभ

Janhvi Kapoor आणि Siddharth Malhotra यांच्या ‘परम सुंदरी’चं कलेक्शन झालं

Priya Marathe आणि Shantanu Moghe ची साधी पण क्युट लव्हस्टोरी!

Priya Marathe : ‘२ वर्षांपूर्वी ‘नमो रमो नवरात्री’मध्ये…’ रवींद्र चव्हाण

Famous Studio आता पडद्याआड चालला!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Operation Sindoor : २००४ मधील ‘या’ चित्रपटाने काश्मिरव्याप्त पाकबदद्ल भारताच्या तीव्र भावना मांडल्या!

 Operation Sindoor : २००४ मधील ‘या’ चित्रपटाने काश्मिरव्याप्त पाकबदद्ल भारताच्या तीव्र भावना मांडल्या!
मिक्स मसाला

Operation Sindoor : २००४ मधील ‘या’ चित्रपटाने काश्मिरव्याप्त पाकबदद्ल भारताच्या तीव्र भावना मांडल्या!

by रसिका शिंदे-पॉल 07/05/2025

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ७ मे २०२५ रोजी पुर्ण करुन ९ दहशतवादी कॅम्प्सना नेस्तनाभूत केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या भारत-पाकिस्तान तणावामुळे पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असता भारताने काश्मिरव्याप्त पाकिस्तानला चोख उत्तर दिलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का २००४ मध्ये एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यात भारताच्या काश्मिरव्याप्त पाकिस्तानबद्दल काय तीव्र भावना आहेत? किंवा युद्धादरम्यान सैनिकांची काय मनस्थिती असते याचं अगदी तंतोतंत चित्रिकरण या चित्रपटात करण्यात आलं होतं. कोणता होता तो चित्रपट जाणून घेऊयात… (Bollywood patriotic movies)

तर, २००४ मध्ये फरहान अख्तर दिग्दर्शित ‘लक्ष्य’ (Lakshya) या चित्रपटात १९९९ मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या कारगिल युद्धावर (Kargil War) चित्रपटाचं कथानक आधारित आहे. चित्रपटात एका अशा मुलाची कथा दाखवण्यात आली आहे जो आपल्या करिअरबाबतीत फार संभ्रमित आहे.आयुष्यात नेमकं करायचं काय? हा प्रश्न त्याला सतत पडत असतो. काही काळानंतर तो सैन्यात भरती होण्याचं ठरवतो आणि अनेक अडचणींचा सामना करत सैन्यात भरती होऊन देशसेवा करतो.चित्रपटात ह्रतिक रोशनने (Hrithik Roshan) लेफ्टनंट करण शेरगिल ही भूमिका केली आहे. तसेच, चित्रपटात ओम पुरी, अमिताभ बच्चन, प्रिती झिंटा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.(Bollywood movies)

खरं तर ‘लक्ष्य’ हा चित्रपट सध्या देशात असणाऱ्या परिस्थितीशी फार मेळ खाणारा आहे. शिवाय, चित्रपटातील प्रत्येक सीन्स संवाद आजही प्रेक्षक रिलेट करु शकत आहेत. चित्रपटात मध्यांतरानंतरच्या कथानकात एक सीन असा आहे जिथे भारतीय सैन्य पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पाहतो. त्यावेळी ओम पुरी ह्रतिकला विचारतात की, “युद्ध वाईट आहे हे सैनिकांपेक्षा अजून कुणाला चांगलं माहित असणार?”, त्यांना उत्तर देताना भावूक डोळ्यांनी ह्रतिक म्हणतो की,”देवाने एकच पृथ्वी तयार केली होती पण माणसांनी त्यावर लोह आणि बारुद यांनी एक रेष ओढली. हे तुझं आणि ते माझं. मी खरंच मनापासून आभार मानतो की चंद्र अवकाशात आहे; नाहीतर पृथ्वीवर जर का चंद्र असता तर त्याचीही फाळणी लोकांनी केली असती”. (Lakshya Movie)

===============================

हे देखील वाचा:   Mahesh Bhatt : परवीन आत्महत्या करण्याच्या मार्गावर होती आणि….

===============================

दरम्यान, ‘लक्ष्य’ चित्रपटाचे संवाद जावेद अख्तर यांनी लिहिले होते आणि फरहान अख्तरने चित्रपट दिग्दर्शित केला होता.’लक्ष्य’ चित्रपटाव्यतिरिक्त आजवर अनेक देशभक्तीपर चित्रपट आले खरे पण ‘बॉर्डर’, ‘ऊरी :द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटांनी अधिक सखोलपणे भारतीय सैन्य कशापद्धतीने काम करतं याचं सादरीकरण केलं होतं.(Entertainment news)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Patriotic Movies Entertainment farhan akhtar hrithik roshan india kargil war lakshaya operation sindoor operation sindoor 20205 pakistan raazi uri the surgical strike Vicky Kaushal
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.