Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा

Mahesh Manjrekar “जेव्हा मी ५०० लोकांना खूश करतो तेव्हा…”; MICTA वर मांजरेकराचं स्पष्टीकरण!
मराठी चित्रपटसृष्टीत अनेक पुरस्कार सोहळे संपन्न होतात. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांचा झेंडा फडकावा आणि तेथील चित्रपटप्रेमींना मराठी चित्रपट, कलाकार यांची ओळख कळावी यासाठी दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा सुरु केला होता. परदेशात साजरा होण्याच्या या पुरस्काराचं पुर्वीचं नाव मिफ्टा (MIFTA – Marathi International Film and Theatre Awards) असं होतं आणि कालांतराने त्याचं नाव मिक्ता (MICTA – Marathi International Cinema and Theatre Awards) असं करण्यात आलं होतं. मात्र, गेले अनेक वर्ष त्यांनी हा पुरस्कार सोहळा बंद केल्यामुळे त्यांनी असं का केलं याचं उत्तर मांजरेकरांनी दिलं आहे. (Marathi movies news)

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले की, “जेव्हा मी मिक्ता करायचो तेव्हा आम्हाला घेऊन जात नाही, असं कोणीतरी म्हणायचं. म्हणजे, मी काय पिकनिक नाही काढलीये. धर्मादाय नाही काढलाय. तो पुरस्कार सोहळा आहे. त्यात कोणाला नॉमिनेशन द्यायचं हे मी ठरवत नाही. नॉमिनेटेड आहेत त्यांना मी घेऊन जातो. आता काही कलाकारांनी वर्षभर कोणताही पिक्चर केला नाही. तुमचा काय मान आहे का की, लॉलीपॉप घे आणि मी तुम्हाला नेतो.” (Marathi international awrads)
पुढे ते (Mahesh Manjrekar) असं देखील म्हणाले की,”जेव्हा मी ५०० लोकांना खूश करत असतो ना तेव्हा मी ५००० लोकांना नाखूश करत असतो. ज्यांना वाटतं हे आम्हाला नेत नाहीत, तर असं काही नाहीये. त्या ५०० लोकांना मला एवढंच सांगायचंय की, माझी तुमच्याशी काही दुश्मनी नाही किंवा ५०० लोकांशी माझं काही चांगलं नाही. जे नॉमिनेटेड आहेत आणि ते काहीतरी करतात म्हणून मी त्यांना घेऊन जातो. तुम्ही नॉमिनेटेड झालात की तुम्हाला नेईल. म्हणून शेवटी मी मिक्ता बंद केलं. खूप पैसे वाया घालवले.” (Bollywood update)
===============================
हे देखील वाचा: Mahesh Bhatt : परवीन आत्महत्या करण्याच्या मार्गावर होती आणि….
===============================
महेश मांजरेकर यांनी सिनेसृष्टीच्या त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्याच पण हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही त्यांनी स्वत:चा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तसेच, अभिनयासोबतच अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन करत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचं नाव जनमाणसांच्या मनात कोरलं आहे. ‘वास्तव’, ‘अंतिम’, ‘नटस्रमाट’, ‘हथ्यार’, ‘काकस्पर्श’, ‘वा लाईफ हो तो ऐसी’, ‘कुरुक्षेत्र’ अशा अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. (Mahesh Manjrekar movies)