Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

स्टार प्रवाहच्या ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेला सुरु होण्याआधीच ब्रेक; १२ ऐवजी

Bigg Boss Marathi 6 मध्ये होणार  राजकीय नेत्याची एन्ट्री? रितेश भाऊने दिली

सत्तरच्या दशकात Dev Anand यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली

Dharmaveer 2 मधील शिवरायांची ‘ती’ फ्रेम खास का आहे?

४००० कोटींच्या Ramayanaची धुरा ‘या’ मराठी माणसावर!

गौरव अमुलची काळजी कशी घेणार?; लवकरच Single Papa 2 प्रेक्षकांच्या

Hollywood मधून मराठीत रिमेक झालेले ‘हे’ चित्रपट माहिती आहेत का?

अखेर Shashank Ketkar ने स्क्रिन शॉट्ससह शेअर केलं 5 लाख

Border 2: ‘घर कब आओगे…’ तब्बल 28 वर्षांनंतर प्रसिद्ध गाणं

जेव्हा अभिनेत्री Helan हिला अंडरवर्ल्ड डॉनने मदत केली होती!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Lata Mangeshkar संगीतविश्वाला पडलेले सुमधुर स्वप्न भारतरत्न लता मंगेशकर

 Lata Mangeshkar संगीतविश्वाला पडलेले सुमधुर स्वप्न भारतरत्न लता मंगेशकर
कलाकृती विशेष

Lata Mangeshkar संगीतविश्वाला पडलेले सुमधुर स्वप्न भारतरत्न लता मंगेशकर

by Jyotsna Kulkarni 06/02/2025

संपूर्ण जगभरातील संगीतप्रेमी लोकांचे जीवन संपन्न आणि समृद्ध करणारा एकमेव आवाज म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar). या मधुर आवाजाने अनेक लोकांना संगीताच्या प्रेमात पाडले, अनेकांचे जीवन या एका आवाजाने सार्थकी लागले तर काहींनी फक्त या आवाजासाठीच भारतीय संगीत ऐकण्यास सुरुवात केली. संपूर्ण जगाला लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने भुरळ घातली. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच या आवाजाचे आणि लता मंगेशकरांचा चाहते आहेत. जवळपास ७ दशकं लता दीदींनी आपल्या सुमधुर आवाजाने सगळ्यांचे मनोरंजन केले. आजच्याच दिवशी तीन वर्षांपूर्वी हा रसाळ आवाज कायमचाच शांत झाला. (Lata Mangeshkar)

६ फेब्रुवारी २०२२ रोजी लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. लता दीदींनी जवळपास ७० वर्ष आपल्या सुमधुर आवाजाने लोकांचे मनोरंजन केले. भारतीय संगीत इतिहासातील सुवर्णपान म्हणजे लता मंगेशकर. या नावाशिवाय केवळ भारतीय संगीताचाच नाही तर जगभरातील संगीताचा इतिहास अपूर्ण आहे. आज जरी लता दीदी आपल्यात नसल्या तरी त्या त्यांच्या गाण्यांनी कायम आपल्या सोबतच राहतील. दीदींच्या तिसऱ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटनांबद्दल. (Lata Mangeshkar Death Anniversary)

Lata Mangeshkar

लता दीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात एका महाराष्ट्रीय कुटुंबात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हेमा असे होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी ‘लता’ असे नाव ठेवले. दीदींचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि नाट्यकलावंत होते. मंगेशकर कुटुंबिय मूळचे गोव्याचे. सांगली येथे दीनानाथ मंगेशकर यांना मास्टर ही पदवी प्राप्त झाली. लता मंगेशकर यांची सांगलीतील हरिपूर रस्त्यावरील बागेतील गणपतीवर फार श्रद्धा होती. त्यामुळे त्या कोल्हापूरला जाताना नेहमी या गणपतीचे दर्शन घ्यायच्या. (Bollywood Tadka)

लता दीदी ह्या त्यांच्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य होत्या. त्यांच्यानंतर आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे होती. लता दीदींना संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांनी संगीताचे धडे वडिलांकडूनच गिरवले. वयाच्या केवळ पाचव्या वर्षी दीदींनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली. (Lata Mangeshkar Journey)

लता मंगेशकर यांच्या वडिलांचे म्हणजेच मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे अकालीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी लता दीदींवर घरातील सर्व भावंडांची जबाबदारी आली. त्यानंतर लतादीदींनी गाणं गात आपल्या भावंडांचा सांभाळ केला. याकाळात त्यांच्या कुटुंबाचे स्नेही असलेल्या आणि नवयुग चित्रपट कंपनीचे मालक असलेल्या मास्टर विनायक (Master Vinayak) यांनी या कुटुंबाला मोठी मदत केली. मास्टर विनायक यांनी दीदींना वयाच्या १३ व्या वर्षी १९४२ मध्ये ‘पहिली मंगळागौर‘ (Pahili Manglagour) या चित्रपटात काम दिले. काही चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनेते आणि अभिनेत्रींच्या बहिणीची भूमिका साकारली.

Lata Mangeshkar

१९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायक यांच्या कंपनीचे मुंबईला स्थलांतर झाले तेव्हा लतादीदी मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले लता आणि आशा यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात नूरजहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लता दीदींनी माता तेरे चरणोंमें हे भजन गायले.

१९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवाले पाकिस्तानला गेले. तेव्हा लतादीदी अमानत खाँ (देवासवाले) यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लतादीदींनी तालीम मिळाली. इ.स. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लतादीदींना मार्गदर्शन केले.

मास्टर हैदर अली यांनी लतादीदींची ओळख निर्माता शशधर मुखर्जी यांच्याशी करून दिली, ते त्यावेळी ‘शहीद‘ (Shahid) चित्रपटावर काम करत होते, परंतु त्यांनी या मुलीचा आवाज खूप पातळ आहे. असे सांगत लता दीदींना काम देण्यास नकार दिला होता. त्यावर रागाच्या भरात मास्टर हैदर अली म्हणले होते की, “आज तुम्ही रिजेक्ट केले. मात्र एक दिवस असा येईल जेव्हा सर्व निर्माते आणि दिग्दर्शक लताच्या पाया पडून तिला आपल्या चित्रपटात गाणे गाण्याची विनंती करतील.” तेव्हा दिग्दर्शक गुलाम हैदर यांनी केलेली ही भविष्यवाणी खरी ठरली.

Lata Mangeshkar

१९४८ मध्ये मास्टर हैदर अली यांनी लतादीदींना ‘मजबूर’ चित्रपटातील ‘दिल मेरा तोडा, मुझे कहीं का ना छोड दिया’ हे गाणे गाण्याची संधी दिली. हा दीदींच्या करिअरमधील सर्वात मोठा ब्रेक होता. त्यानंतर त्याच वर्षी त्यांनी मधुबाला यांच्या ‘महल’ या चित्रपटातील ‘आयेगा आने वाला‘ (Aayega Aanewala) हे गाणे गायले होते. या गाण्याने लता दीदींना हिंदी चित्रपटसृष्टीत गायिका म्हणून ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी एकापाठोपाठ एक गाणे रेकॉर्ड करण्याचा सपाटाच लावला होता. (Entertainment mix masala)

लता दीदींची गाणी गाजत होती, त्यांना काम मिळत होते मात्र आर्थिक परिस्थिती अजूनही सुधरत नव्हती. करिअरच्या सुरुवातीच्या काळात लतादीदी घरापासून रेकॉर्डिंग स्टुडिओपर्यंत चालत जायच्या. गाणी रेकॉर्ड केल्यानंतर त्या पूर्ण दिवस काहीही न खाता घालवायच्या. कारण रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये कॅन्टीन आहे हे त्यांना माहीत नव्हते. आणि जरी कँटीन असले तरी त्यांच्याकडे कमी पैसे असायचे. त्यांच्याकडे एक-दोन रुपये असायचे या पैशांतून त्या कुटुंबासाठी सामान विकत घ्यायच्या. (Bollywood Masala)

लता दीदींना दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी एक टोमणा मारला होता ज्यामुळे त्या उर्दू शिकल्या. एका लता दीदी आणि दिलीप कुमार यांची ओळख झाली. आणि त्यांनी दीदींना त्या कुठल्या हे विचारले. दीदी मराठी आहे , हे समजल्यावर दिलीप कुमार म्हणाले होते की, “मराठी लोकांच्या भाषेत काय आहे. मराठी लोकांना उर्दू येत नाही.” लतादीदींना त्यांचे बोलणे खटकले आणि वाईटही वाटले. यानंतर त्यांनी उर्दू शिकण्याचे ठरवले आणि त्या उर्दू भाषा शिकल्या. त्यांच्या गाण्यांमध्ये कधीही कोणाला मराठी लहेजा जाणवला नाही.

Lata Mangeshkar

लता दीदी हळूहळू गानकोकिळा बनल्या आणि त्यांची कीर्ती जगभर झाली. त्यांच्या यशाचा अनेकांना हेवा वाटायचं. मात्र कोणतीतरी त्यांना या हेव्यापायी विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. लतादीदींच्या आयुष्यातील हा सर्वात कठीण टप्पा होता. यामुळे त्या तीन महिने अंथरुणाला खिळून होत्या. शरीर इतके अशक्त झाले होते की, त्यांना अंथरुणावरून उठताही येत नव्हते, चालताही येत नव्हते. दीदींना हा विषप्रयोग कोणी केला होता याची कल्पना होती, मात्र त्यांच्याकडे याचे पुरावे नव्हते.

लतादीदी आणि दिग्गज गायक मोहम्मद रफी साहेब यांच्यात वाद झाला होता. तब्बल ४ वर्षे त्यांच्यात अबोला होता. या दोघांनी जवळपास ४ वर्षे एकत्र गाणे गायले नाही किंवा एक स्टेज शेअर केले नाही. १९६७ मध्ये संगीतकार जयकिशन यांच्या सांगण्यावरून रफी साहेबांनी लतादीदींना पत्र लिहून माफी मागितली होती. लता दीदींसोबत काम करण्यासाठी प्रत्येक संगीतकार नेहमीच उत्सुक असायचा. दीदी प्रत्येक संगीतकारासाठी लकी होत्या. मात्र असे असून देखील संगीतकार ओ.पी. नय्यर यांनी दीदींसोबत कधीही काम केले नाही. लतादीदींचा आवाज प्रत्येक संगीतकारासाठी हमखास हिट गाण्याची गॅरंटी होता, पण ओ.पी. नय्यर यांचे त्यांच्या रचनांसाठी दीदींचा आवाज फिट नसल्याचे मत होते.

लता दीदींनी त्यांच्या करिअरमध्ये अफाट यश मिळवले. मात्र तरीही त्यांच्या मनात एक सल कायम राहिली. ती म्हणजे आपण शास्त्रीय गायिका होऊ शकलो नाही याची. यशस्वी गायिका झाल्यानंतर लता मंगेशकर यांनी ‘राम राम पावणे’ या मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यांनी ‘आनंदघन‘ (Anandghan) नावाने अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांनी ३६ भाषांमध्ये तब्बल ५० हजारहून अधिक गाणी गायली आहेत.

Lata Mangeshkar

याशिवाय लता दीदींनी त्यांचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले, पण त्यात यश मिळाले नाही. लता मंगेशकर यांनी 1990 मध्ये त्यांचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते. या बॅनरखाली त्यांनी गुलजार दिग्दर्शित ‘लेकीन’ या चित्रपटाची निर्मिती केली. लता दीदींच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये (Guinness World Records) देखील विक्रम नोंदलेले आहेत. १९७४ ते १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला. (Latest Marathi News)

लता दीदींना त्यांच्या संगीतसेवेसाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. लता मंगेशकर यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांना १९७२, १९७५ आणि १९९० मध्ये देण्यात आला होता. यानंतर त्यांना १९५८, १९६२, १९६५, १९६९, १९९३ आणि १९९४ मध्ये फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. लता मंगेशकर यांना त्यांच्या कारकिर्दीतील पहिला फिल्मफेअर पुरस्कार १९५८ मध्ये आलेल्या ‘मधुमती’ चित्रपटातील ‘आजा रे परदेसी’ या गाण्यासाठी मिळाला होता. यासोबतच लता दीदींना १९६९ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देखील मिळाला होता. यासोबतच १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. (Lata Mangeshkar Awards)

Lata Mangeshkar

१९९३ मध्ये फिल्मफेअरचा लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड लतादीदींना मिळाला. यासोबतच त्यांना १९९९ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देखील मिळाला होता. दीदींना २००१ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देण्यात आला होता. या सर्व पुरस्कारांशिवाय लतादीदींना राजीव गांधी पुरस्कार, एन.टी.आर. पुरस्कार, महाराष्ट्र भूषण, स्टारडस्टचे जीवनगौरव, झी सिनेचे जीवनगौरव या पुरस्कारांनीही गौरविण्यात आले. यासोबतच दीदींना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले होते.

सुरुवातीची अनेक वर्ष हलाखीमध्ये काढणाऱ्या लतादीदींची एकूण संपत्ती ३६८ कोटी रुपये आहे. लता मंगेशकर यांना पहिल्या गाण्यासाठी फक्त २५ रुपये मानधन मिळाले होते. एका अहवालानुसार, लता मंगेशकर यांची एकूण संपत्ती सुमारे ५ कोटी डॉलर्स म्हणजेच अंदाजे ३६८ कोटी रुपये आहे. गाण्यांच्या रॉयल्टीतून आणि अन्य गुंतवणुकीतून त्यांनी ही संपत्ती निर्माण केली आहे.

======

हे देखील वाचा : Abhishek Bachchan अनेक फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर चमकले अभिषेक बच्चनचे नशीब, आज आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक

Pranit More कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण; वीर पहारियावर विनोद करणे पडले महागात

======

लता मंगेशकर यांचे दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर प्रभु कुंज भवन नावाचे घर आहे. या घराची किंमत करोडोंमध्ये आहे. लता मंगेशकर या कारच्या शौकीन होत्या. त्यांच्याकडे शेवरलेट, ब्यूक आणि क्रायस्लर अशा अनेक शानदार कार्स होत्या. याशिवाय ‘वीर झारा’ चित्रपटातील गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनी एक मर्सिडीज कार भेट दिली होती.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: anandghan Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured lata mangeshkar Lata Mangeshkar awards Lata Mangeshkar death Lata Mangeshkar death anniversary Lata Mangeshkar details Lata Mangeshkar hindi Lata Mangeshkar information Lata Mangeshkar journey Lata Mangeshkar marathi songs Lata Mangeshkar propertty Lata Mangeshkar songs Marathi Movie गायिका लता मंगेशकर लता मंगेशकर लता मंगेशकर गाणी लता मंगेशकर पुण्यतिथी लता मंगेशकर पुरस्कार लता मंगेशकर प्रवास लता मंगेशकर माहिती लता मंगेशकर संपत्ती
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.