Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

Nana Patekar एक्स गर्लफ्रेंड मनिषा कोईरालाबद्दल काय म्हणाले?

Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

अनुराधा : Hrishikesh Mukherjee यांची भावरम्य कविता!

Amitabh Bachchan यांचं खरं नाव ‘हे’ असतं; भाऊ अजिताभने केला

Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

स्त्री आणि भेड़ियाच्या जगात नवीन सुपरहिरो Thama ची एन्ट्री!

Bappi Lahiri ने संगीत दिलेल्या गाण्याला किशोर कुमारने कसे इम्प्रोवाइज केले?

‘मनाचे श्लोक’मधून Leena Bhagwat – मंगेश कदम मोठ्या पडद्यावर प्रथमच

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Shraddha Kapoor : बॉलिवूडमधला पहिला तमाशापट इतिहास रचणार?

 Shraddha Kapoor : बॉलिवूडमधला पहिला तमाशापट इतिहास रचणार?
कलाकृती विशेष

Shraddha Kapoor : बॉलिवूडमधला पहिला तमाशापट इतिहास रचणार?

by रसिका शिंदे-पॉल 10/06/2025

कुठल्याही भाषेतील चित्रपटात आयटम सॉंगपेक्षा एखादी ठसकेबाज लावणी असेल तर? नादखुळाच ना…. मराठी चित्रपटसृष्टीत याच ठसकेबाज लावणीचा किंवा तमाशापटांचा एक काळ होता… दर्जेदार लावण्या, बतावण्या चित्रपटातून सादर केल्या जात होत्या.. कालांतराने मराठीने हिंदीतील आयटम सॉंग्स आत्मसात केलं पण हिंदीने काही मराठीची लावणी आत्मसात केली नाही… मात्र, पहिल्यांदाच चक्क बॉलिवूडमध्ये महाराष्ट्रातील लावणी सम्राज्ञीच्या जीवनावर एक भव्य चित्रपट लवकरच येणार असं सांगितलं जातंय.. विशेष म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘छावा’ (Chhaava) फेम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) करणार आहेत आणि मराठमोळंपण भरलेली बॉलिवूडची एक देखणी अभिनेत्री यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. कोण आहे ही अभिनेत्री आणि कोणत्या लावणी सम्राज्ञीच्या जीवनावर उतेकर चित्रपट करणार आहेत जाणून घेऊयात…(Bollywood news)

२०२५ हे वर्ष खऱ्या अर्थाने विकी कौशल (Vicky Kaushal) आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचं आहे… कारण जानेवारी ते जूनपर्यंत बरेच दिग्गज कलाकारांचे चित्रपट रिलीज झाले पण अजूनही ‘छावा’ची हवा काय कमी झाली नाहीये… लक्ष्मण उतेकर यांनी पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.. त्यातही बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराज (Chattrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावरील इतका मोठा ऐतिहासिकपट त्यांनी तयार केला आणि इतिहास रचला… अगदी तसंच आजवर बॉलिवूडमध्ये लावणी किंवा तमाशा या विषयाला कुणीच हात लावला नाही. आणि आता तेच मोठं पाऊल लक्ष्मण उतेकर उचलणार आहेत… महाराष्ट्रातील तमाशाचा काळ ज्यांनी जगला, अनुभवला आणि टिकवला अशा लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्यावर उतेकर लवकरच बायोपिक आणणार असं म्हटलं जातंय…. कोण आहेत विठाबाई नारायणगावकर जाणून घ्या…(Entertainment Trending News)

सुप्रसिद्ध पठ्ठे बापूराव यांच्या तमाशातून प्रेरणा घेणाऱ्या बापूमांग नारायणगावकर आणि शांताबाई यांना १९३५ साली विठाबाईंच्या रुपाने कन्यारत्न झालं…लहानपणापासूनच तमाशाचा फड पाहात आणि ढोलकीचा ताल ऐकून मोठ्या झालेल्या विठाबाई यांच्यावर वडिलांच्या निधनानंतर तमाशाचा फड सुरु ठेवण्याची जबाबदारी अचानक अंगावर पडली.. त्यांनी ‘भाऊ-बापूमांग नारायणगावकर’ या नावाने तमाशाचा फड उभा केला. तमाशा परंपरेत काम करत असताना विठाबाईंनी जेवढे ऐश्वर्य पाहिले तेवढंच दुःखही अनुभवलं. विठ्ठलाने मला लोकांच्या मनोरंजनाबरोबर प्रबोधनासाठी पाठविले आहे. मी माझ्या कलेचा उपयोग लोकशिक्षणासाठी करेन ही खुणगाठ मनी बाळगून विठाबाईंनी महाराष्ट्रात मराठवाडा, खान्देश, विदर्भ, कोकण पट्ट्यातील गावागावात आपली कला सादर केली. ८ मुलांची आई असणाऱ्या विठाबाईंनी तमाशाच्या चौरंगावर काम करताना बाळंतपणाच्या जीवघेण्या यातनाही सहन करून रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं… (Marathi Lavani Songs)

विठाबाईच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. मग ते कात्रजच्या घाटात विठाबाईच्या गाडीला झालेला अपघात असेल किंवा बाळंतपणातून सावरणं असेल, तमाशा थाटात करायचा आणि सामाजिक बांधिलकी जपायची ही खूणगाठ त्यांनी बांधली होती. ‘पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची’, ‘नेसली पितांबर जरी’ या त्यांच्या लोकप्रिय लावण्या आहेत. शिवाय ‘रक्तात न्हाली कुऱ्हाड’,’रंगल्या रात्री अशा’, ‘छोटा जवान’, ‘मुंबईची केळेवाली’ आणि ‘रायगडची राणी’ ही त्यांची गाजलेली वगनाट्यं. इतकंच नाही तर भारत-चीन युद्धादरम्यान विठाबाईंनी लष्करातील सैनिकांसाठी नेफा सीमेवर १९६२ साली तमाशा सादर केला होता.घरापासून दूर देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांना तमाशा कलेच्या माध्यमातून मानवंदना देण्याचा बहूमान विठाबाईंनी मिळाला.

अशा या इतक्या ग्रेट कलावंताची भूमिका सगळ्यांची लाडकी अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) साकारणार असं समोर येत आहे.. वडिल शक्ती कपूर जरी पंजाबी असले तरी ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे (Padmini Kolhapure) यांची बहिण शिवांगी कोल्हापूरे श्रद्धाची आई.. आता आई आणि मावशी दोघींचं मराठीपण लहानपणापासूनच अंगात असल्यामुळे श्रद्धा स्वत:ला मराठीच समजते… इतकंच नाही तर बऱ्यावेळा पॅप्स किंवा पत्रकारांसोबतही ती मराठीच बोलताना दिसचे.. तिचा मराठी लूक, स्पष्ट मराठी बोलणं एक वेगळाच ऑरा क्रिएट करतं…इतकंच नाही तर नुकत्याच झालेल्या Waves summit 2025 मध्ये श्रद्धाने इन्स्टाग्रामच्या हेडला चक्क पुरणपोळी खाऊ घातली होती… त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून उपजत श्रद्धामध्ये मराठी बाज आणि ठसका असल्यामुळे तमाशा कलावंत विठाबाई यांची भूमिका ती उत्तमरित्या निभावू शकेल अशी अपेक्षा नक्कीच आहे…(Marathi Movies)

===============================

हे देखील वाचा:   Deepika Padukone : “इंडस्ट्रीच्या बाहेरची अशी भावना….”; दीपिकाचं महत्वाचं विधान

===============================

‘हैदर’, ‘स्त्री’, ‘आशिकी’, ‘बागी’, ‘छिछोरे’ या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणारी श्रद्धा नक्कीच या चित्रपटामुळे एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून लोकांसमोर येईल आणि लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट तिच्या अभिनयातील करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरेल यात शंकाच नाही…आणि बॉलिवूडमध्ये मराठीतील काही कथा मोठ्या कॅनवासवर साकारण्याचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांचा ट्रेण्ड प्रेक्षकांना भावेल आणि जागतिक स्तरावर या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्टारातील लावणी ही लोककला आणि त्यासाठी झटलेल्या प्रत्येक कलावंताची दखल घेतली जाईल असंही म्हणावं लागेल… बॉलिवूडमध्ये सध्या सीक्वेल्स, हॉरर-कॉमेडी, कॉमेडी याच प्रकारातील चित्रपट जास्त येताना दिसतात.. मात्र, या गर्दीत लक्ष्मण उतेकर यांचा तमाशापट स्वत:चं वेगळेपण नक्कीच सिद्ध करेल अशी अपेक्षा आहे…(Bollywood)

रसिका शिंदे-पॉल

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ansuni kahani Biopics Bollywood Bollywood Chitchat bollywood classic movies bollywood mix masala bollywood tadaka bollywood update Celebrity News Chhaava Entertainment Entertainment News Laxman Utekar shraddha kapoor untold stories
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.