Aambat Shaukin :’आंबट शौकीन’ चित्रपटात पूजा, प्रार्थना दिसणार महत्वाच्या भूमिकेत

Laxmikant Berde : “बारामतीचे आहात म्हणून खुर्चीचा मोह”, बेर्डेंचं ‘ते’ अॅडिशन
“मी आलो.. मी पाहिलं… मी जिंकून घेतलं सारं…” हे गाणं एकाच कलाकारासाठी आहे आणि ते म्हणजे विनोदाचे बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde)…. त्यांच्या जाण्यामुळे इंडस्ट्री आणि त्यातही विनोदी चित्रपटसृष्टी खरंच पोरकी झाली… अशोक सराफ (Ashok Saraf) आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडगोळीने दिलेले अप्रितम विनोद आजही तितकेच ताजेतवाने वाटतात. “७० रुपये वारले.. किंवा धनंजय माने इथेच राहतात का?“ असे अनेक डायलॉग्स प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुतले आहेत. आजवर आपण अनेकांकडून लक्ष्मीकांत बेर्डे कसं नाटक किंवा चित्रपटावळी विनोदाचं अॅडिशन घ्यायचे हे ऐकलं आहे. पण आज लक्ष्मीकांत बेर्डे यांनीच एका नाटकाचा सांगितलेला किस्सा जाणून घेऊयात… (interview of Laxmikant berde)

कॉमेडिचं अचूक टायमिंग साधणारा विनोदाचा बादशाह असं लक्ष्मीकांत बेर्डे यांना म्हटलं जातं. त्यांच्या याच टायमिंगचं एक उदाहऱण म्हणजे चालू नाटकात त्यांनी मुख्यमंत्रीपदावरुन एक अॅडिशन घेत प्रेक्षकांना तुफान हसवलं होतं. ही आठवण सांगताना बेर्डे म्हणाले की, “एका असं अचानक एक वाक्य मला सुचलं होतं. माझा पुण्याला शो होता. आणि त्यात असं होतं की माझ्याऐवजी मुख्यमंत्री मरतो आणि त्याला वर नेलं जातं. तर तो म्हणतो आता मी खाली जाणार नाही कारण माझं मुख्यमंत्रीपद गेलं आहे त्यामुळे मी इथेच राहून राज्य करेन. तिथे त्याला एक खुर्ची रिकामी दिसते, आजूबाजूला देव बसले असतात. तो म्हणतो ते अनधिकृत बांधकाम कुणाचं आहे? तर त्याला सांगतात ते देवांचा राजा इंद्राचं आसन आहे अधिकृत आहे ते. त्याचा मेल्यावरही खुर्चीचा मोह सुटत नव्हता. तर त्यावर मी पटकन अॅडिशन घेत “तुम्ही बारामतीचे का?” असं म्हटलं होतं आणि माझ्या त्या वाक्यामुळे प्रेक्षकांमध्ये हशा पिकला होता”. (Comedy kong Laxmikant berde)
लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांना लहानपणापासूनच अभिनयात आपलं आयुष्य घडवायचं होतं. पण वडिलांच्या इच्छेमुळे त्यांनी मॅट्रिकनंतर १ महिना नोकरी केली होती. कारण, वडिलांना ते पास होणार नाहीत याची पुर्ण खात्री होती. या नोकरीचा एक किस्सा सांगताना वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची प्रेरणा कुठून मिळते? यावर उत्तर देताना बेर्डे म्हणाले की, “वडिलांच्या सांगण्यावरून कशीबशी १ महिना मी नोकरी केली. काय करायचो सकाळी टिटवाळा फास्ट जायचो. त्यावेळी चुकून झोप लागली की झोपेत अंबरनाथ किंवा डोंबिवलीला जायचो. नंतर मी झोपणं टाळण्यासाठी आजूबाजूला बसलेल्या माणसांचं निरीक्षण करायला लागलो. त्यावेळी असं वाटायचं की दिल्ली मुंबईची माणसं माझ्या बाजूला बसून बोलतायत. आणि हे निरीक्षण मला हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना फायदेशीर ठरलं. मला माणसांचं निरीक्षण करायला फार आवडतं आणि त्याचाच फायदा मद्रासी किंवा इतर कोणत्याही भूमिका करताना मला नक्कीच झाला”. (Marathi classic films)
===========================
हे देखील वाचा: अशोक सराफ…. एक आदर्शवत कलाकार!
===========================
दरम्यान, लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant berde) यांना नोकरी करायची नव्हती तरी साहित्य संघांतील नोकरी त्यांना कलाकार म्हणून फारच फायदेशीर ठरली होती. याचाच किस्सा सांगताना ते म्हणाले होते की, ”कलाकार म्हणून मी साहित्य संघाची ७ वर्ष नोकरी केली त्याचा मला बराच फायदा झाला. कामं तशी कमी मिळाली पण मला प्रेक्षकांमध्ये बसून ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ यांसारखी मोठी नाटकं पाहायला मिळाली. याव्यतिरिक्त जेव्हा मी संगीत नाटटकांसाठी बाहेरगावी जायचो तेव्हा तिथे पार लहान रोल असायचे माझे आणि ते झालं की बाकीचा वेळ मी प्रेक्षकांमध्ये बसून नाटक पाहायचो. त्यातून एक गोष्ट मला शिकायला मिळाली ती म्हणजे प्रेक्षकंना काय पाहायला आवडतं? त्यांना कुठले विनोद आवडतात? ते प्रेक्षकांमद्ये प्रेक्षक होऊन बसल्यानंतर मला कळलं आणि ते मी माझ्या अभिनयात उतरवण्याचा प्रयत्न केला”. (Marathi movie nostalagia)

लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी १९८३ पासून अभिनयाची सुरुवात केली. पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘टूर टूर’ या नाटकामुळे त्यांना अभिनेता म्हणून ओळख मिळाली. आणि त्यानंतर लक्ष्मीकांत यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. ९ एप्रिल २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या महेश कोठारे (Mahesh Kothari) यांच्या ‘पछाडलेला’ चित्रपटात ते शेवटचे झळकले आणि त्यानंतर १६ डिसेंबर २००४ मध्येच त्यांचं निधन झालं आणि मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टी देखील एका मोठ्या नटाला हुकली. (Untold stories of Laxmikant berde)