Rekha नाही तर ‘उमराव जान’साठी दिग्दर्शकाची पहिली पसंती ‘या’ मराठी

Laxmikant Berde : जगाचा निरोप घेण्यापूर्वी ‘या’ दोन सहकलाकारांची आठवण काढली होती!
‘मी आलो, मी पाहिलं, मी जिंकू घेतलं सारं ’… खरंच लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी आपल्या अभिनयाच्या अवकाशात त्यांच्या सर्व चाहत्यांना सामावून घेत एक नवं जग दाखवलं. खुप लवकर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. नाटक, चित्रपटांमद्ये विविधांगी भूमिका साकारुन कायमस्वरुपी आपल्या मनात नाव कोरुन गेलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी शेवटच्या दिवसांमध्ये दोन कलाकरांची नावं घेतली होती. याबद्दल एका ज्येष्ठ कलाराने खुलासा केला आहे. जाणून घेऊय़ात…(Entertainment news)

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक दिग्गज आणि हरहुन्नरी कलाकारांसोबत कामं केली. त्यापैकी एक म्हणजे अभिनेते चेतन दळवी. ‘हमाल दे धमाल’, ‘फेका फेकी’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘किस बाई किस’, ‘धमाल बाबल्या गणप्याची’ अशा अनेक चित्रपटांमध्ये चेतन दळवी यांनी लक्ष्मीकांत यांच्यासोबत कामं केली. लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये चेतन यांनी लक्ष्मीकांत यांना शेवटच्य दिवसांत भेटायला गेले असता लक्ष्या काय म्हणाले हे त्यांनी सांगितलं. चेतन म्हणाले की, “लक्ष्याबरोबर कोणतीही भूमिका असो, मी करायला तयार आहे. लक्ष्या जायच्या आधी मी त्याला भेटायला गेलो. ‘काय रे, कसा आहेस?’ अशी मी लक्ष्याची विचारपूस केली. लक्ष्या मला म्हणाला, ‘तुम्ही दोघंच माझे.’ त्यावेळी त्याने माझं आणि विजय चव्हाणचं नाव घेतलं. ‘तुम्ही दोघंच, बाकी कोण नाही माझं.’ असं लक्ष्या मला म्हणाला. मी लक्ष्याला म्हटलं, ‘वेडा आहेस तू. आधी सांगायचं ना आम्हाला, काय होतंय ते! त्याने स्वतःचे फार हाल करुन घेतले होते.” (Marathi films)
===============================
हे देखील वाचा: YouTube : नेटफ्लिक्स अन् प्राइमशी स्पर्धा करण्यासाठी YouTubeचा नवा अवतार येणार
===============================
दरम्यान, चेतन यांनी केवळ चित्रपट नव्हे तर नाटकांमध्येही लक्ष्मीकांत यांच्यासोबत कामं केली होती. ‘टूरटूर’ नाटकात चेतन आणि लक्ष्याने साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. आजही चेतन त्यांचा खास मित्र आणि सहकलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण काढल्याशिवाय राहात नाहीत. पण खरंच आज जर का लक्ष्मीकांत बेर्डे असते तर मराठी चित्रपटसृष्टी आणि विनोदी चित्रपटांचा दर्जा काही और असता हे सत्य नाकारता येत नाही. (Laxmikant berde)