Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Farida Jalal : २०० चित्रपटांमध्ये काम करूनही ‘या’ जेष्ठ अभिनेत्रीच्या मनात राहिली एक सल
१०० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास लाभलेल्या आपल्या हिंदी सिनेसृष्टीमधे आजवर अनेक दिग्गज, प्रतिभासंपन्न कलाकार होऊन गेले. आज देखील असे अनेक कलाकार आहेत, जे मागील अनेक दशकांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे. यातलेच एक नाव म्हणजे जेष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल. चित्रपट, मालिकांमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या फरीदा यांना कोणत्याही खास ओळखीची गरज नाही.(Farida Jalal)
बहुतकरून हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्याच्या आईची सोज्ज्वळ, प्रेमळ भूमिका साकारून फरीदा जलाल यांनी अफाट लोकप्रियता मिळवली. प्रत्येक दशकातील सुपरस्टारच्या आईची भूमिका त्यांनी साकारली. फरीदा यांना या क्षेत्रात काम करत ६० पेक्षा जास्त वर्ष झाले आहेत. या मोठ्या कालखंडात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. सोबतच अनेक सहायक भूमिकांमध्ये देखील त्या झळकल्या. (Bollywood Masala)

फरीदा यांनी त्यांच्या करियरमध्ये २०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवली. अगदी देव आनंद, राजेश खन्ना यांच्या पासून ते सलमान, शाहरुख, अजय आदी दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले. आज वयाच्या ७४ व्या वर्षी फरीदा त्यांच्या आयुष्यामध्ये खूपच समाधानी आहेत. मात्र असे असूनही त्यांच्या मनात एक खंत आहे. करियरच्या सुरुवातीच्या काळात फरीदा यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या.(Marathi latest news)
चित्रपटाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या घरातुन फरीदा जलाल या क्षेत्रात आल्या. एका टॅलेंट शोमध्ये त्यांनी मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवला तर राजेश खन्ना यांनी मुलांमध्ये पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर त्यांनी राजश्री प्रॉडक्शनच्या ‘तकदीर’ सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर त्या आराधना, गोपी, पुरस्कार, नया रास्ता, पारस, देवी, खोज, अमर प्रेम, आलाप, खुशबू, संकल्प आदी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र त्यांना मुख्य भूमिकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही.(Entertainment Masala News)
पुढे फरीदा चित्रपटांमध्ये सहाय्य्क भूमिकांमध्ये झळकू लागल्या. आणि त्यानंतर त्या थेट नवीन दमाच्या कलाकारांच्या आईच्या भूमिकेत दिसू लागल्या. मात्र सहाय्यक भूमिकांमध्ये त्यांनी प्रेक्षकांवर आणि चित्रपट निर्मात्यांवर मोठी छाप सोडली. कधी कधी तर मुख्य अभिनेत्रींपेक्षा फरीदा यांची डिमांड आणि क्रेझ जास्त पाहायला मिळायची. त्यामुळे सहाय्यक आणि आईच्या भूमिकांसाठी फरीदा जलाल यांनाच प्राधान्य दिले जायचे. फरीदा यांनी देखील त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेचे सोने केले. (Marathi Top Stories)

फरीदा आज वयाच्या ७४ व्या वर्षी फरीदा जलाल या त्यांच्या आयुष्यात आणि कामात समाधानी आहे, मात्र तरी देखील त्यांच्या मनात एक सल कायम राहिली. एका मुलाखतीदरम्यान फरीदा यांनी त्यांच्या या सलबद्दल सांगितले. फरीदा म्हणाल्या की, शालेय जीवनापासूनच फरीदा यांना अभिनयासोबतच नृत्याची देखील खूपच आवड होती. शाळेच्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचे नाव नृत्यासाठी सर्वात आधी घेतलं जायचं आणि त्या देखील आनंदाने डान्स करायच्या. पण दुर्दैवाने, मोठ्या पडद्यावर त्यांना कधीच नृत्य करण्याची संधी मिळाली नाही. त्यांना चित्रपटांमध्ये डान्स करण्याची खूपच इच्छा होती, मात्र असे कधी झालेच नाही. (Marathi Trending News)
=======
हे देखील वाचा : Ratna Pathak : लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर रत्ना पाठक यांनी केले नसीरुद्दीन शाह यांच्याशी लग्न
=======
चित्रपटांसोबतच टीव्ही जगतात देखील फरीदा यांनी स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आहे. त्यांनी देख भाई देख, ये जो है जिंदगी, शरारत, सतरंगी ससुराल, बालिकावधू आदी मालिकांमध्ये काम केले आहे. शिवाय त्या ओटीटी माध्यमावर देखील अनेक वेबसिरीजमध्ये झळकल्या आहेत. त्यांना त्यांच्या करियरमध्ये चार फिल्मफेयर आणि दोन बंगाल फिल्म जर्नलिस्ट एसोसिएशन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.(Marathi Top News)