
Loot Kaand Trailer: काला हूं, लाल हूं… वक्त के साथ मालामाल हूं! ‘लुट कांड’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज…
Loot Kaand Trailer: पैशाची इच्छा आणि त्याची गरज… या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. भरपूर पैसा, हरवलेल्या बंदुका, बँक चोरी आणि खुनाचा थरार घेऊन येणारी ‘लुट कांड’ ही नवी मालिका ओटीटी जगतात येत आहे. मनोरंजन करणारा हा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे ही वेब सीरिज तुम्ही कोणत्याही सब्सक्रिप्शनशिवाय ओटीटीवर मोफत पाहू शकता.Amazon ची मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा Amazon MX Player ने आपल्या आगामी हायस्ट थ्रिलर लुट कांड ची घोषणा केली आहे, जी सगळ्यात वेगळी आहे. (Loot Kaand Trailer)

स्ट्रीमिंग सर्व्हिसने या मालिकेचा हृदयद्रावक टीझर प्रदर्शित केला, ज्यात प्रेक्षकांना लतिका आणि पलाश या दोन भावंडांच्या रंजक दुनियेत नेले गेले, जे आर्थिक संकटात जगण्यासाठी झगडत आहेत. विशेष फिल्म्स आणि एनटूओ फिल्म्स निर्मित या सहा भागांच्या मालिकेत तान्या माणिक ताला, साहिल मेहता, ज्ञानेंद्र त्रिपाठी आणि साद बिलग्रामी यांसारखे प्रतिभावान कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. रुचिर अरुण दिग्दर्शित आणि सौरव डे निर्मित लुट कांड लवकरच अॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर विनामूल्य स्ट्रीम होणार आहे.

‘लुट कांड’ या थ्रिलर चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात भूतकाळातील एका कथेने होते. लतिका आणि पलाश ही दोन भावंडं आहेत. भाऊ म्हणतो की त्यांचे वडील पैसे घेऊन पळून गेले नाहीत; ते बँकेतून पैसे आणत असताना त्यांचा अपघात झाला. पण त्यांना डिफॉल्टर ठरवण्यात आले. ही भावंडे आर्थिक अडचणींशी झुंजत आहेत. त्यांना कर्ज घेण्यासाठी बँकेत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या अस्तित्वाची ही लढाई त्यांना गुन्हेगारीच्या जगात घेऊन जाते, जिथे लढल्याशिवाय जगणे कठीण आहे.
================================
================================
‘लुट कांड’ ही वेब सीरिज २० मार्च २०२५ रोजी अॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे. ही मालिका विनामूल्य उपलब्ध असणार आहे. म्हणजे ते स्ट्रीम करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सब्सक्रिप्शनची गरज नाही.