जगातल्या सर्वात महागड्या Avatar : Fire and Ash चित्रपटाच्या ट्रेलरची

Madhuri Dixit हिचा ‘तो’ चित्रपट ७३ वेळा पाहणारे कलाविश्वातील ‘ते’ दिग्गज आहेत तरी कोण?
धकधक गर्ल Madhuri Dixit हिच्या नृत्य आणि अभिनयाचे चाहते भारतातच नाहीत तर संपूर्ण जगात आहेत… तिचं सौंदर्य, हास्य, लाघवीपणा प्रेक्षकांना कायमच भूरळ घालते… ९०च्या दशकात तिने एकाहून एक दर्जेदार चित्रपट केले… अगदी सामान्यांपासून ते कलाविश्वातीलच कलाकार देखील माधुरीचे चाहते होते आणि आजही आहेत… पण तुम्हाला माहित आहे का? एक असे ज्येष्ठ कलाकार होते ज्यांनी चक्क माधुरीचा एक चित्रपट तब्बल ७३ वेळा पाहिला होता…कोण आहेत ते ग्रेट आर्टिस्ट आणि तो चित्रपट कोणता जाणून घेऊयात…(Bollywood News)

तर, माधुरी दीक्षित हिच्या कलेचे चाहते होते जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसेन (M F Husain)… हो लागला ना शॉक? कारण, त्यांच्याच चित्रांचे जगात लाखो चाहते आहेत आणि तेच एका अभिनेत्रीच्या कामाचे आणि तिच्या चित्रपटांचे चाहते होते…त्यांना माधुरी हिचा अभिनय आणि नृत्य फार आवडायचं… इतकंच नाही तर त्यांनी तिचा ‘हम आपके है कौन?’ (Hum Aapke Hai Kaun?) हा चित्रपट चक्क ७३ वेळा पाहिला होता आणि एकदा तर चित्रपट पाहण्यासाठी अख्खं थिएटरच बुक केलं होतं…

दरम्यान, माधुरी दीक्षित हिच्या सोबत एक चित्रपट करण्याची देखील हुसेन यांची इच्छा होती…त्यानुसार त्यांनी २००० मध्ये ‘गजगामिनी’ हा चित्रपट केला देखील. यात माधुरी प्रमुख भूमिकेत होती. कामना चंद्रा यांनी ‘गजगामिनी’ चित्रपटाचं सहलेखन केलं होतं. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी हे दिग्गज कलाकार देखील होते. तगडी स्टारकास्ट असूनही चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर आपटला होता… चित्रपट जरी अयश्वी ठरला असला तरी त्यांच्या चित्रांनी अनोखी जादू केलीच… आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे असणाऱ्या माधुरी दीक्षित हिने हुसेन यांना मानवंदना देत त्यांनी काढलेली चित्र स्वत:च्या घरी लावली आहेत…
================================
हे देखील वाचा : Sridevi यांनी नकार दिलेल्या ‘या’ चित्रपटामुळे माधुरीला मिळाला धकधक गर्लचा टॅग!
=================================

एम.एफ. हुसेन यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मुंबईत अनेक चित्रपटांची पोस्टर्स तयार केली होती. १९६७ मध्ये, त्यांना ‘थ्रू द आयज ऑफ अ पेंटर’(प्रायोगिक चित्रपट) यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच, २००४ मध्ये तब्बू आणि कुणाल कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मीनाक्षी: अ टेल ऑफ थ्री सिटीज’ या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. विशेष म्हणजे, हा चित्रपट कान्स महोत्सवात प्रदर्शित झाला होता.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi