Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

…तर संगीतकार Madan Mohan रसिकांना अभिनय करताना दिसले असते!
भारतातील पहिली ऑफिशियल वॉर मूवी म्हणून ज्या सिनेमाचा उल्लेख होतो त्या ‘हकीकत’ (१९६४) या सिनेमाची मोहिनी आज देखील भारतीय सिनेमांवर आहे. मध्यंतरी दिग्दर्शक जेपी दत्ता यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं; आम्ही जेव्हा ‘बॉर्डर’ (१९९७) हा चित्रपट तयार करत होतो, त्यावेळी आमच्या नजरेपुढे पुढे हकीकत हाच सिनेमा होता आणि हाच प्लॉट वापरून आम्ही ‘बॉर्डर’ हा चित्रपट बनवला होता.” (फरक फक्त एवढा होता बॉर्डर हा चित्रपट भारत पाकिस्तान 1971 च्या युद्धावर आधारित होता तर ‘हकीकत’ ह्या चित्रपट 1962 सालच्या भारत चीन युद्धावर आधारित होता).

‘हकीकत’ हा चित्रपट १९६४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन आनंद यांनी केले होते. या चित्रपटात धर्मेंद्र, बलराज सहानी, प्रिया राजवंश, विजय आनंद, संजय खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. कैफी आजमी यांनी चित्रपटाची गाणी लिहिली होती तर संगीत मदन मोहन यांचे होते. ‘कर चले हम फिदा जानो तन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथीयो…’ हे मोहम्मद रफी यांनी गायलेले गाणं सर्वोत्कृष्ट देशभक्तीपर गीत म्हणून आज देखील लोकप्रिय आहेत. या चित्रपटात दिग्दर्शक चेतन आनंद, संगीतकार मदन मोहन यांना चित्रपटाचे संगीत देत असतानाच आणखी एक मोठी जबाबदारी देणार होते; पण काही कारणाने ते जमू शकलं नाही. तसे वर्क आउट झाले असते तर सिनेसृष्टीत मोठ्या घटनेची नोंद झाली असती. कोणती होती ती जबाबदारी आणि काय कारणाने ते वर्क आउट होवू शकले नाही? खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे.
===========
हे देखील वाचा : Shamshad Begum : ऑडीशनला गेली आणि बारा गाण्यांचे कॉन्ट्रॅक्ट साइन करून आली!
===========
संगीतकार मदनमोहन सिनेमाच्या दुनियेत येण्याच्या आधी भारतीय ब्रिटिश लष्करामध्ये नोकरी करत होते. ब्रिटिश आर्मीचे ते वरिष्ठ अधिकारी होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते आर्मीत होते. पण नंतर त्यांनी चित्रपटाच्या दुनियेत प्रवेश केला पण त्यांच्या या लष्करी जीवनाची आठवण दिग्दर्शक चेतन आनंद यांना होती. म्हणूनच त्यांनी ‘हकीकत’ या युद्धपटात त्यांना मेजर जनरल प्रताप सिंग ही भूमिका द्यायचे ठरवले. चित्रपटात भूमिका करा असं म्हटल्यानंतर ते नक्कीच नकार देतील म्हणून दिग्दर्शकाने त्यांना काहीच सांगितले नाही. फक्त गायक भूपिंदर सिंग यांना सांगितले की तुम्ही त्यांना म्हणजे मदन मोहनला घेऊन लडाख येथे घेवून या. चित्रपटाचे सर्व शूटिंग जम्मू काश्मीरमधील लडाख यथे झाले होते. गायक भूपिंदर सिंग यांनी हा किस्सा विविध भारतीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला होता .
भूपिंदर सिंग संगीतकार मदन मोहन यांना घेऊन लडाखला जायला निघाले. चंदीगड पर्यंत व्यवस्थित पोहोचले. पण नंतर काश्मीर प्रचंड पाऊस आणि बर्फ वृष्टी होऊन सर्व रस्ते आणि विमान वाहतूक ठप्प झाली. भूपिंदर सिंग आणि मदन मोहन यांना चंदिगढ मध्येच अडकून पडावे लागले. तीन चार दिवस झाले तरी फ्लाईट सुरू होत नव्हते. इकडे मदन मोहन यांच्याकडे मुंबई मध्ये बऱ्याच चित्रपटांचे संगीत देणे चालू होते. त्यामुळे त्यांनी भूपेंदराला सांगितले “मला माहिती नाही चेतन आनंद ने कशासाठी आपल्याला बोलावले आहे. परंतु मला मुंबईत काम आहे मी परत जातो. तू मात्र फ्लाईट सुरू झाल्यानंतर तिकडे जा आणि माझ्या वतीने दिग्दर्शक चेतन यांना सॉरी/ दिलगिरी कळव.” दोन दिवसांनी फ्लाइट्स सुरू झाल्या.
================================
हे देखील वाचा: Dharmendra : प्रेम चोप्राच्या भीतीची धर्मेंद्रने केली पोलखोल!
=================================
भूपिंदर सिंग लडाखला पोहोचले आणि त्यांनी चेतन आनंद यांना मदन मोहन यांचा निरोप दिला. तिथे गेल्यावर भूपिंदर सिंग यांचे असे लक्षात आले की मदन मोहन साठी एक खास भूमिका चेतन आनंद यांनी लिहून ठेवली होती. मदन मोहन यांचे मिलिटरी बॅकग्राऊंड लक्षात घेऊन त्यांना मेजर प्रताप सिंग ही भूमिका या चित्रपटात सादर करायची होती. पण पाऊस आणि बर्फ वृष्टी ने साऱ्यांच प्लान वर पाणी फेरले गेले. हि भूमिका नंतर चेतन आनंद यांचे धाकटे भाऊ विजय आनंद यांच्याकडे गेली. अर्थात ही भूमिका नंतर खूपच काटछाट करू पडद्यावर आली. जर काश्मीरमध्ये त्या काळात बर्फ वृष्टी झाली नसती तर कदाचित संगीतकार मदन मोहन यांना आपण हकीकत या चित्रपटात अभिनय करताना पाहू शकलो असतो पण हे व्हायचं नव्हतं.