Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘लाईफलाईन’ सिनेमात माधव अभ्यंकर किरवंताच्या भूमिकेत दिसणार !

 ‘लाईफलाईन’ सिनेमात माधव अभ्यंकर किरवंताच्या भूमिकेत दिसणार !
Actor Madhav Abhyankar
मिक्स मसाला

‘लाईफलाईन’ सिनेमात माधव अभ्यंकर किरवंताच्या भूमिकेत दिसणार !

by Team KalakrutiMedia 06/07/2024

आधुनिक विज्ञान आणि परंपरा यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा ‘लाईफलाईन‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या महाराष्ट्राचे लाडके ‘अण्णा’ म्हणजेच माधव अभ्यंकर यांची व्यक्तिरेखा समोर आली आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देवाब्राह्मणांच्या आशीर्वादाने चित्रपटातील माधव अभ्यंकर यांच्या व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. आपल्या विचारांवर, मतांवर ठाम असणाऱ्या एका खंबीर किरवंताची ते या चित्रपटात भूमिका साकारत आहेत.आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी आणि भारदस्त व्यक्तिमत्वाने माधव अभ्यंकर यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमच स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता ‘लाईफलाईन’मधून एका वेगळ्याच भूमिकेतून ते चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.(Actor Madhav Abhyankar)

Actor Madhav Abhyankar
Actor Madhav Abhyankar

आपल्या भूमिकेबद्दल माधव अभ्यंकर म्हणतात, ” देव आयुष्य देतो, तर किरवंत मोक्ष देतो, अशा धार्मिक विचारसरणीची ही व्यक्तिरेखा असून त्याचा भक्ती, श्रद्धा यांवर जास्त विश्वास आहे. प्रत्येक धार्मिक क्रियेमागे काही कारण असते, हे पटवून देणारी ही व्यक्तिरेखा आहे. यापूर्वी मी अनेक भूमिका साकारल्या परंतु अशा प्रकारची भूमिका मी प्रथमच साकारत आहे. त्यातही अशोक सराफ यांसारखे मातब्बर कलाकार माझ्यासोबत आहेत. त्यामुळे ही माझ्यासाठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. तरुण दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभवही कमाल होता. हल्लीच्या तरुणाईचा दृष्टिकोन, त्यांची कामाची पद्धत हेसुद्धा शिकण्यासारखे आहे.” 

Actor Madhav Abhyankar
Actor Madhav Abhyankar

क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत, ‘लाईफलाईन‘ या चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर, हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्या मुख्य भूमिका आहेत. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाचे साहिल शिरवईकर यांनी दिग्दर्शिन केले आहे.(Actor Madhab Abhyankar)

============================

हे देखील वाचा: मनोज बाजपेयींच्या ‘सत्या’ चित्रपटाला २६ वर्षे पूर्ण, अभिनेत्याने शेअर केल्या जुन्या आठवणी

=============================

तसेच राजेश शिरवईकर यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत तर अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांचा आवाज लाभला आहे. ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरलेला हा चित्रपट 2 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Actor Madhav Abhyankar Actor Madhav Abhyankar lifeline movie Actor Madhav Abhyankar marathi movies Celebrity News Entertainment Life line Marathi Movie life line movie Marathi Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.