Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

Nana Patekar एक्स गर्लफ्रेंड मनिषा कोईरालाबद्दल काय म्हणाले?

Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

अनुराधा : Hrishikesh Mukherjee यांची भावरम्य कविता!

Amitabh Bachchan यांचं खरं नाव ‘हे’ असतं; भाऊ अजिताभने केला

Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

स्त्री आणि भेड़ियाच्या जगात नवीन सुपरहिरो Thama ची एन्ट्री!

Bappi Lahiri ने संगीत दिलेल्या गाण्याला किशोर कुमारने कसे इम्प्रोवाइज केले?

‘मनाचे श्लोक’मधून Leena Bhagwat – मंगेश कदम मोठ्या पडद्यावर प्रथमच

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

माधुरी दीक्षित – अगदीच शाळकरी पोर हो…..

 माधुरी दीक्षित – अगदीच शाळकरी पोर हो…..
माझी पहिली भेट

माधुरी दीक्षित – अगदीच शाळकरी पोर हो…..

by दिलीप ठाकूर 15/05/2022

गिरगावातील खोताची वाडीतील मोजून दहा बाय दहाच्या खोलीत वाढताना एक पडदा थिएटर अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सपेक्षा मी गल्ली चित्रपट जरा जास्तच एन्जॉय केल्याने ‘पडद्यावरचे जग प्रत्यक्षात कसे बरे आहे/असते’ हे जाणून घेणे/पाहणे/अनुभवणे/निरीक्षण करणे याकडे माझा मी मिडियात आल्यावर पहिला रस होता…. (Madhuri Dixit)

तात्पर्य, सिनेमा पहायचा आणि परिक्षण करायचे या चौकटीत रहायचे नाही हे मी पक्के ठरवले आणि मग अनेक प्रकारचे अगणित लाईव्ह अनुभव येत गेले. 

माधुरी दीक्षितच्या ‘पहिल्या भेटी’ चा अनुभव अगदी यातूनच आला. 

नवशक्ती दैनिकात मी चित्रपट सदर लिहू लागलो आणि अशा सकारात्मक संधीची सतत वाट पाहू लागलो. राजश्री प्रॉंडक्शनच्या वतीने त्या काळात आपल्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांची मिडियाशी भेट घालून देत. दक्षिण मुंबईतील एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दुपारी चार वाजता शुध्द शाकाहारी नाश्ता (त्यांच्या चित्रपट संस्कृतीशी मिळता जुळता) आणि चहा असा त्यासाठी बेत असे. (सिनेमाचे जग म्हणजे ओली पार्टी हे घट्ट समीकरण येथे अपवाद).

मरीन ड्राईव्हच्या नटराज हॉटेलमध्ये (आता त्याचे नाव बदललयं) ‘अबोध’ (१९८४) चे नवीन चेहरे तापस पॉल आणि माधुरी दीक्षित यांच्या भेटीचे आमंत्रण हाती आले तेव्हा ‘ही नावे वाचून इम्प्रेस होण्यासारखे’ तेव्हा खरंच काही नव्हते. आणि ते गरजेचेही नव्हते.  राजश्री प्रॉंडक्शनने असे अनेक नवीन चेहरे रुपेरी पडद्यावर आणले, काही आपल्या गुणवत्तेने टिकले, काहींना नशिबाची साथ मिळाली नाही. अर्थात, सिनेमाच्या जगात यशासारखी सुंदर गोष्ट कोणतीच नसल्याने जे यशस्वी ठरले तेच नामवंत ठरले… (Madhuri Dixit)

‘अबोध’ हे राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटाच्या परंपरेतील नाव आहे एवढेच कौतुक होते. उपहार, पिया का घर, पहेली वगैरे नावं सांगता येतील. त्या काळात मुंबई आकाशवाणीवर कोणी दीक्षित बातम्या वाचत असे, ते करताना दीक्षितमधील दी… दीर्घ उच्चारत, पण त्यांचा आणि ‘नवतारका माधुरी’ चा काही संबंध असेल असे वाटत नव्हते. हिंदी चित्रपटसृष्टीत सी. पी. दीक्षित नावाचे दिग्दर्शक होते. फकिरा (शशी कपूर व शबाना आझमी), गजब (धर्मेंद्र व रेखा) हे त्यांचेच चित्रपट. त्यांची ही माधुरी कोणी आहे का असा प्रश्न मनात होता. पण त्याचे उत्तर मिळण्यासाठी खुद्द माधुरीशी बोलायला हवे. पण पाच साडेपाच वाजले तरी तिचा पत्ता नाही. त्या काळात घरी साधा लॅन्डलाईन असणे प्रतिष्ठेचे होते, तर मग मोबाईल हा शब्ददेखिल माहिती असणे शक्य नव्हते. तिला यायला उशीर का बरे होतोय हे समजायला मार्ग नव्हताच. राजश्री प्रॉडक्शन तसे शिस्तबद्ध आणि वक्तशीर. पण हे काय? आम्हा उपस्थित पत्रकारात चुळबुळ होणारच. 

…. अखेर आपल्या आई बाबांसोबत माधुरी आली आणि आल्या आल्याच शुध्द मराठीत मराठीत म्हणाली, उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. विलेपार्लेवरुन आम्ही वेळेवर निघालो होतो, पण मुंबईतील ट्रॅफिकची सगळ्यांनाच कल्पना आहे….. पण अगदीच शाळकरी विद्यार्थीनी हो. तिच्यात तत्क्षणी ‘स्टार मटेरियल’ असे काही नव्हतेच. राजश्री प्रॉंडक्शनच्या चित्रपटाची नायिका अशीच सोज्वळ, साधी असते/असावी अशा इमेजला हे रुपडे एकदम फिट्ट होते. अगदी छोटी गोष्ट वाटते पण महत्वाची आहे.  औपचारिक पत्रकार परिषद झाली आणि अनौपचारिक भेटीगाठी, गप्पा सुरु झाल्या, त्या जास्त महत्वाच्या असतात. त्याच कलाकार आणि पत्रकार यांच्यातील अंतर शक्य तितकं  कमी करतात. (Madhuri Dixit)

यातूनच  माधुरी दीक्षितशी माझी पहिली भेट झाली. पहिल्या भेटीत आवडला तो तिचा आत्मविश्वास आणि अतिशय उत्तम मराठी. ‘मी अंधेरीत जे.बी.नगरला राहते, कधीही फोन करा, आपण सविस्तर मुलाखत करु’ हे तिचे म्हणणे आणि ‘अबोध’ बद्दल साधारण बोलणे हे इतकेच तेव्हा बोलणे शक्य झाले….

 सिनेमाच्या जगात अशा अनेक भेटी होत असतात, त्यातील काही विसरल्या जातात, तर काहींच्या बाबतीत काही वेगळेच घडते. ‘पहिल्या भेटीत सर्वसाधारण वाटणारे आपल्या गुणवत्ता आणि मेहनतीच्या जोरावर स्टार बनतात’. माधुरी दीक्षितचे तेच झाले. आणि त्याचीच तर ‘स्टोरी’ होते. अनाकलनीय घडणे हीच चित्रपट व्यवसायाची जादू आहे. 

न्यू एक्सलसियर थिएटरच्या चौथ्या मजल्यावरील मिनी थिएटरमध्ये (कालांतराने ते बंद झाले) ‘अबोध’ च्या प्रेस शोला मात्र माधुरी आपल्या आई बाबांसोबत  अगदी वेळेवर आली, आम्हा समीक्षकांना भेटली तरी हा चित्रपट अगदी साधारण असल्याने यशाची शंका होती. मुंबईतील मेन थिएटर ऑपेरा हाऊसमधून मोजून अवघ्या चार आठवड्यात या चित्रपटाची रिळे गोडावूनमध्ये जमा झाली, पण माधुरीच्या कर्तबगारीची रिळे मात्र तिला स्टार घडवणारी ठरली… (Madhuri Dixit)

  माधुरी दीक्षितच्या भेटीचे योग मग येतच राहिले. एन. चंद्रा यांच्या कृपेने नटराज स्टुडिओत ‘तेजाब’ चा (२७ फेब्रुवारी १९८७) चा मुहूर्त, काही महिन्यांनी चंद्रा यांच्यामुळेच मेहबूब स्टुडिओत ‘एक दो तीन चार….’ गाण्याच्या शूटिंगच्या वेळी माधुरीच्या भेटीत तोच आत्मविश्वास आणि तेच फोकस्ड बोलणे अनुभवले. असे अनेक अनुभव सांगता येतील. 

 आपल्या लग्नापूर्वी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने (१५ मे १९९९) तिने जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांना चायनीज जेवणाची दिलेली पार्टी या भेटीगाठीतील हायपॉईंट! आजही जिभेवर त्या पदार्थांची चव आहे हो….. (Madhuri Dixit)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Entertainment Indian Cinema MadhuriDixit movies Top Films
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.