
“वॉशरुम्स नव्हते म्हणून आम्ही जंगलात जाऊन….”; Madhuri Dixit ने आऊटडोअर शुटचा सांगितला भयावह किस्सा….
बॉलिवूडमधला १०० कोटींचा टप्पा पार करणारा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणजे ‘हम आपके है कौन!’ (Hum Aapke Hain Kaun!) माधुरी दीक्षित, सलमान खान, रेणूका शहाणे यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने फॅमेली ओरिएन्टेंड चित्रपटांचा नवा ट्रेंड बॉलिवूडमध्ये सेट केला… १९९४ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाला आज ३० वर्ष पूर्ण होऊनही चित्रपटाची क्रेझ काही केल्या कमी झाली नाही. अशातच आता पूजा आणि निशा अर्थात रेणूका शहाणे व माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांनी एका मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला… यावेळी बोलताना माधुरीने त्याकाळातील आऊटडोअर शुट, व्हॅनिटी व्हॅन्सबदद्ल महत्वाचं विधान केलं आहे… (Bollywood’s first 100cr film)

काळानुसार कलाकारांना आऊटडोअर शुट करण्यासाठी बऱ्याच फॅसिटलीटी आता उपलब्ध झाल्या आहेत… परतुं, २०-३० वर्षांपूर्वी ही परिस्थिती वेगळी होती… याबद्दल झुमला दिलेल्या मुलाखतीत माधुरी म्हणाली की, “आधी चित्रपटांच्या सेटवर विशेषत: आऊटडोअर शूट करताना बऱ्याच अडचणी निर्माण व्हायच्या. बाहेर शूट असल्यावर महिला कलाकारांसाठी सुविधा उपलब्ध व्हायच्या नाहीत. सेटवर स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याने आम्ही मुली दिवसभर पाणीच प्यायचो नाही. आमचं हॉटेल ते शूटिंगचा सेट असं जवळपास २ तासांचं अंतर असायचं. तेव्हा आम्ही हॉटेल ते सेट असा कारने प्रवास करायचो. व्हॅनिटी व्हॅन नव्हत्याच… मग अशावेळी आम्ही (वॉशरूमसाठी ) जंगलात जायचो किंवा आमची हेअरड्रेसर शाल पकडून उभी राहायची. काहीजणी पाणीच प्यायच्या नाहीत. पण, कमी पाणी प्यायल्यामुळे आपल्या तब्येतीवर त्याचा वाईट परिणामही व्हायचा… पण या अडचणी असूनही आम्ही एकत्र आनंदाने शूटिंग पूर्ण केलं.” (Entertainment News)

तर, याबद्दल रेणुका शहाणे यांनी म्हटलं होतं, “माधुरी नेहमी मला सांगायची जर दिवसभर पाणी प्यायली नाहीस तर तुझ्या स्किनची वाट लागेल. तिलाही यामुळे स्किनचा त्रास झाला होता…तिने मला फार समजावलं होतं. माधुरी सेटवर मला खूप सांभाळून घ्यायची, तिने माझी प्रचंड काळजी घेतली.” (Renuka Shahane Movies) नुकत्याच रेणूका क्षितीज पटवर्धन दिग्दर्शित ‘उत्तर’ चित्रपटात अभिनय बेर्डे सोबत झळकल्या होत्या.
================================
================================
दरम्यान, सुरज बडजात्यांच्या ‘हम आपके है कौन!’ चित्रपट बऱ्याच कारणांसाठी कायमस्वरुपी लक्षात राहिला आहे… सर्वात आधी तर भली मोटी मल्टीस्टारकास्ट ज्यात मराठी आणि हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीतील मातब्बर कलाकार होते… एन्टरटेनिंग कथानकासोबत खिळवून ठेवणारी गाणी विशेष लोकप्रिय ठरली… खरं तर जी प्रेमची भूमिका सलमान खानने (Salman Khan) यात साकारली आणि त्यानंतर त्याचं इंडस्ट्रीत दुसरं नाव प्रेम हेच पडलं त्या भूमिकेसाठी आधी आमिर खान पहिली पसंती होता… तर, जवळपास ४.५ कोटी बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने १०० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिस कलेक्शन करत बॉलिवूडमध्ये नवा एरा सुरु केला होता… भारतात प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या या चित्रपटाचा लंडनमध्ये एक थिएटर शो करण्यात आला होता ज्यात १४ गाणी, २ लग्न आणि चित्रपटाचं संपूर्ण कथानक सादर केलं गेलं होतं…. (Unknown facts about Hum Aapke Hain Kaun!)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi