Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं होतं करिअर
प्रत्येक जनरेशनची दिल की धडकन असणारी एक तरी अभिनेत्री असतेच… मग मीना कुमारी असो, मुमताज किंवा मराठमोळ्या स्मिता पाटील… ९०च्या दशकात लाखो दिलोंकी धडकन एकच होती ती म्हणजे माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)… विशेष म्हणजे माधुरीसुद्धा मराठमोळी… त्यावेळी कुठल्याही मुलीला तुला काय व्हायचं आहे? असं विचारलं तर मला माधुरी व्हायचं आहे असंच उत्तर सर्रास मिळत होतं…. तिचे लाखो-करोडो चाहते त्यावेळीही होते आणि आजही आहेत… ४१ वर्ष बॉलिवूड गाजवाणाऱ्या या डान्सिंग क्वीनचा आज वाढदिवस… खरं तर तिचे किस्से किंवा तिच्याबद्दल जाणून घेण्याची आपल्या सगळ्यांना कायमच उत्सुकता असते.. जाणून घेऊयात माधुरीचे अनेक रंजक किस्से… (Madhuri dixit birthday special)

माधुरीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती.. आता तुम्ही म्हणाल त्यात काय वेगळं…पण वयाच्या तिसऱ्या वर्षी चक्क तिने कथ्थक नृत्याचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. एका मुलाखतीमध्ये माधुरीने सांगितलं होतं की, त्यावेळी कोणतंही नृत्य शिकण्यासाठी मुलांचं वय ५ ते ६ वर्ष असावं अशी अट होती… पण घराजवळच असलेल्या डान्स क्लासमधील घुंगरांचा आवाज ऐकला की आपोआप तिचे पाय थिरकायला लागायचे.. त्या डान्स क्लासच्या खिडकीजवळ जाऊन माधुरी पण नृत्य करायची.. (Nostalagia)

एक दिवस गुरुजींनी तिला पाहिलं आणि तिच्या पालकांना तिचं वय जरी ३ वर्ष असलं तरी तिला डान्स क्लासला पाठवा असं सांगितलं आणि वयाच्या तिसऱ्या वर्षापासून माधुरी दीक्षितचा नृत्याचा प्रवास सुरु झाला… खरं तर नृत्य आणि अभ्यास यात आवड असणाऱ्या माधुरीला मायक्रोबायॉलॉजिस्ट व्हायची इच्छा होती… त्यासाठी साठ्ये कॉलेजमध्ये एडमिशनही घेतलं होतं… पण तिच्या destiny मध्ये अभिनय किंवा चित्रपटसृष्टी असल्यामुळे कॉलेजमध्ये असताना ‘अबोध’ चित्रपटासाठी तिला विचारण्यात आलं आणि इंडस्ट्रीला माधुरीच्या रुपात उत्तम नृत्यांगना आणि परिपुर्ण अभिनेत्री लाभली. (Bollywood news)

हा झाला तिच्या डान्स आणि करिअरची नेमकी सुरुवात कशी झाली याचा किस्सा.. आता जरा तिच्या नावाजलेल्या २ चित्रपटांचे किस्से जाणून घेऊयात.. माधुरीने शाहरुख खानसोबत केलेला ‘अंजाम’ चित्रपट आजही लोकप्रिय आहे… या चित्रपटात माधुरीने दिग्दर्शक राहूल यांच्या सांगण्यावरुन २० फुट उंच उडी देखील मारली होती… चित्रपटात शाहरुख आणि माधुरी यांच्यावर चित्रित झालेलं एक गाणं होतं जे चक्क एका टेकमध्ये शुट करण्यात आलं होतं… तर झालं असं की दिग्दर्शक राहूल यांना एक गाणं शुट करायचं होतं आणि ते एकाच टेकमध्ये केलं जावं अशी त्यांची इच्छा होती.. त्यावेळी केवळ माधुरी दीक्षितच वन टेकमध्ये हे गाणं करु शकेल असं त्यांनी म्हटलं आणि माधुरीलाही काहीतरी नवं करायला मिळणार याचा आनंद झाला.. (Mahduri the dancer)

मग काय सरोज खान (Saroj khan) यांनी आपल्या जादूई आणि अदाकारीपूर्ण कॉरीऑग्राफरची छडी उचलली आणि ते संपूर्ण गाणं मेहबूब स्टुडिओमध्ये वन टेकमध्ये शुट करण्यात आलं.. साधारणपणे गाणं शुट झालं की एडिटींग आणि इतर बऱ्याच गोष्टींसाठी काही दिवस जातात.. पण भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील मोजक्या गाण्यांपैकी हे गाणं असं होतं ज्यात एडिटिंगची गरजच नव्हती.. ‘अंजाम’ चित्रपटातील ते गाणं होतं (इथे song च दाखवूया) ‘बरसों के बाद आई मुझको याद एक बात तेरे बिन नहीं गुजरे दिन, तेरे बिन नहीं गुजरे रात…’ (Entertainement)
================================
हे देखील वाचा: ‘या’ रुपात माधुरी हवी होती असं आता वाटतंय का?
=================================
माधुरीच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘साजन’ चित्रपट… चित्रपटाची कथा तर छान होतीच पण त्यातील प्रत्येक गाणी आणि तिचं नृत्य आजही ताजतवानं वाटतं.. या चित्रपटात माधुरीसोबत संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सलमान खान (Salman khan) होते.. चित्रपट सुपरहिट ठरला होता खरा पण तुम्हाला माहित आहे का माधुरीला हा चित्रपट न करण्याचा सल्ला दिला होता.. (Entertainment news)
माधुरीने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत १९९१ साली आलेला ‘साजन’ संजय दत्त अपंग दाखवला आहे म्हणून तु करु नकोस असा सल्ला दिल्याचं तिनेच सांगितलं होतं…लोकांचं माधुरीला असं सांगणं होतं की संजय दत्त एक स्टार आहे आणि त्यात तो दिव्यांग दाखवलाय तर त्याच्यासोबत तुझी जोडी कशी वाटेल आणि लोकांनाही त्याला अशा भूमिकेत पाहणं आवडणार नाही त्यामुळे ‘साजन’ चित्रपट करु नकोस .. पण विशेष म्हणजे १९९१ साली ‘साजन’ हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता…(Bollywood tadaka)

माधुरीच्या बालपणीचा.. तिच्या गाजलेल्या चित्रपटाचा किस्सा जाणून घेतल्यानंतर माधुरीच्या फोटोशुटचाही एक किस्सा तुम्हाला सांगते.. गौतम राजाध्यक्ष (Gautam Rajadhyaksha)… फिल्मी दुनियेतील मोठं नाव… ते फॅशन फोटोग्राफर होते…रेखा, शबाना आझमी, टीना मुनीम, जॅकी श्रॉफ अशा बड्या कलाकारांचे पोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपणाऱ्या गौतम यांची माधुरी दीक्षितही एकेकाळी मॉडेल होती…राजाध्यक्षांनी माधुरीचं वर्णन करताना माधुरीच्या चेहऱ्यातलं सौम्य आणि क्लासिक सौंदर्य बघून मायकल अॅन्जेलोच्या चित्रपटांची आठवण येते असं म्हटलं होतं… (Fashion Photography)
================================
हे देखील वाचा: माधुरी दीक्षित – अगदीच शाळकरी पोर हो…..
=================================
तर एकदा माधुरी चित्रपटाचं शुटींग संपवून फोटोग्राफीसाठी गौतम यांच्याकडे गेली होती.. तेव्हा तिने काळा पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर फिकट रंगाचा एक कोट घातला होता.. फोटो काढताना अचानक राजाध्यक्षांना सूचलं की माधुरीने एकदा गोल फिरुन खाली बसावं म्हणजे एक हटके फोटो मिळेल.. कल्पना ऐकून माधुरीनेही होकार दिला..ठरल्याप्रमाणे शुट सरु झालं पण ड्रेस उडेना.. माधुरीने त्यावेळी तब्बल १२० गिरक्या घेतल्या असतील पण तरीही गौतम यांना हवा तसा फोटोच मिळाला नाही… एकदा तर चक्क गौतम यांनी माधुरीला बर्फाच्या लादीवर बसवलं होतं.. याशिवाय सुर्याची पहिलं किरणं तिच्या चेहऱ्यावर पडताना फोटो हवा होता म्हणून तिला पहाटे वाळूतून पळायलाही लावलं होतं.. अर्थात या सगळ्यामुळे माधुरीचं उत्तम फोटोशुट झालं होतं खरं.. पण त्या काळात topची अभिनेत्री असूनही patiently तिने हे सारं काही केलं हे कौतुकास्पदच म्हणावं लागेल…(Entertainment tadaka)

‘जमाई राजा’, ‘खेल’, ‘स्वाती’, ‘राम लक्खन’, ‘याराना’, ‘संगीत’, ‘त्रिदेव’ अशा अनेक चित्रपटांमध्ये माधुरीने versatile भूमिका साकारल्या… नृत्य आणि अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या माधुरी दीक्षितला कलाकृती मीडियाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा…(Madhuri dixit movies)