Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ajay Devgan ‘शतक’साठी निवेदकाच्या भूमिकेत!

Dhurandhar मराठीत बनला तर ८०च्या दशकातील ‘हे’ कलाकार असते प्रमुख

Mahashivratri Vishesh: कलर्स मराठीवर रंगणार महाशिवरात्रीचा विशेष सोहळा; प्रकटणार बारा

Bigg Boss Marathi 6 च्या घरात अनुश्रीच्या अश्रूंचा बांध फुटला;

अहंकारातून भूमिका नाकारली आणि आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागले!

Vishal-Akshaya Wedding: मुंबई-पुणे नाही तर गंगा घाटाच्या कुशीत असलेल्या त्रियुगीनारायणमध्ये

Bigg Boss Marathi 6 च्या घरात नवा रणसंग्राम; ‘टरमाळी’ म्हणत

Aandhi चित्रपटाच्या रिलीजला ५१ वर्ष पूर्ण; राजकारण बदलले पण चित्रपटाचा

“मरण पत्करेन पण माफी मागणार नाही”; बिग बॉसच्या घरातून बाहेर

Big Boss Marathi Season 6 : टोळीत प्रेमाची खळी खुलणार!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mahashivratri Vishesh: कलर्स मराठीवर रंगणार महाशिवरात्रीचा विशेष सोहळा; प्रकटणार बारा ज्योतिर्लिंगे

 Mahashivratri Vishesh: कलर्स मराठीवर रंगणार महाशिवरात्रीचा विशेष सोहळा; प्रकटणार बारा ज्योतिर्लिंगे
Colors Marathi Mahashivratri Vishesh
टीव्ही वाले मिक्स मसाला

Mahashivratri Vishesh: कलर्स मराठीवर रंगणार महाशिवरात्रीचा विशेष सोहळा; प्रकटणार बारा ज्योतिर्लिंगे

by Team KalakrutiMedia 12/02/2026

मराठी टेलिव्हिजनवर यंदाची महाशिवरात्र एक अद्वितीय आध्यात्मिक सोहळा घेऊन येत आहे. भक्ती, अध्यात्म आणि शिवतत्त्वाचा भव्य अनुभव प्रेक्षकांना देण्यासाठी कलर्स मराठी ( Colors Marathi) वाहिनीने दोन विशेष भागांची पर्वणी सादर केली आहे. ‘आई तुळजाभवानी’ (Aai Tulja Bhavani) आणि ‘जय जय स्वामी समर्थ’ (Jai Jai Swami Samarth ) या मालिकांमधील हे विशेष एपिसोड्स केवळ कथानकापुरते मर्यादित नसून, ते प्रेक्षकांना एका दिव्य आध्यात्मिक प्रवासावर घेऊन जाणार आहेत.(Colors Marathi Mahashivratri Vishesh)

Aai Tulaja Bhavani Serial
Jai Jai Swami samarth

महाशिवरात्र (Mahashivratri) ही शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि ऊर्जेने परिपूर्ण अशी रात्र मानली जाते. या दिवशी शिवतत्त्व अधिक जागृत होते, अशी श्रद्धा आहे. या पार्श्वभूमीवर ‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा विशेष भाग रविवारी, १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. या भागात ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या गूढ आध्यात्मिक संकल्पनेचा उलगडा करण्यात येणार आहे. महादेवांच्या विराट आणि ब्रह्मांडरूपाचे दर्शन प्रभावी दृश्यांमधून घडवले जाणार असून, त्यामागील तत्त्वज्ञानही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाईल. देवी यमाई आणि आई तुळजाभवानी यांच्या कथानकातून शिवतत्त्वाशी असलेला सूक्ष्म संबंध अधोरेखित केला जाईल. भक्ती आणि तत्त्वज्ञान यांचा सुरेख संगम या भागात अनुभवायला मिळेल.

Aai Tulaja Bhavani Serial
Jai Jai Swami Samarth

यानंतर सोमवारी, १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचा २६ मिनिटांचा विशेष भाग सादर होणार आहे. स्वामी समर्थांच्या जीवनप्रवासातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग यात उलगडणार आहे. भाऊसाहेब जहागीरदार यांच्या आयुष्यातील निर्णायक क्षणातून शिवतत्त्वाची अनुभूती प्रेक्षकांना दिली जाणार आहे. शिवतांडव स्तोत्राच्या गजरात स्वामी समर्थांच्या अंतःकरणातून प्रकट होणारी बारा ज्योतिर्लिंगे हा प्रसंग विशेष आकर्षण ठरणार आहे. प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे आध्यात्मिक महत्त्व आणि त्यातील दैवी संकेत भव्य दृश्य रचनेतून साकारले जातील.(Colors Marathi Mahashivratri Vishesh)

==================================

हे देखील वाचा: Vishal-Akshaya Wedding: मुंबई-पुणे नाही तर गंगा घाटाच्या कुशीत असलेल्या त्रियुगीनारायणमध्ये विशाल अक्षयाने बांधली लग्नगाठ   

==================================

या दोन्ही विशेष भागांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, नेत्रदीपक सेट्स, प्रभावी पार्श्वसंगीत आणि कलाकारांचा दमदार अभिनय यांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हा अनुभव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, तो भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करणारा ठरणार आहे. यंदाची महाशिवरात्र प्रेक्षकांसाठी श्रद्धा, भक्ती आणि दिव्यतेचा अनोखा संगम घेऊन येत आहे. कुटुंबासमवेत हा आध्यात्मिक सोहळा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना या विशेष भागांमधून मिळणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: 12 Jyotirlinga Aai Tuljabhavani Celebrity Colors Marathi Devotional Serial Marathi Devotional Shows Marathi Entertainment Hindu Festival Special Jai Jai Swami Samarth Mahashivratri 2026 Mahashivratri Vishesh Marathi Serial Special Episode Marathi TV Shows Shiv Tandav Shiv Tatva
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.