Aatli Batmi Futali: ‘सखूबाई’ गाण्यात दिसणार गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा

Mahavatar Narsimha : भगवान विष्णूंची बॉक्स ऑफिसवर किमया; बिग बजेट चित्रपटांना केलं घायाळ
बॉलिवूड असो किंवा साऊथच्या कुठल्याही पठडीतील चित्रपट असोत.. Animated चित्रपटांचा एक वेगळाच प्रेक्षकवर्ग आहे हे डावलून चालणार नाही… कितीही आधुनिक ग्राफिक्स किंवा तंत्रज्ञानाचा वापर करणारे Action चित्रपट आले तरी Animated चित्रपटांची क्रेझ काही केल्या कमी होणार नाही हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘महावतार नरसिंहा’ (Mahavatar Narsimha) हा चित्रपटाने सिद्ध करुन दाखवलं आहे… (Bollywood News)

होम्बले फिल्म्स आणि क्लेम प्रॉडक्शन्सच्या या अॅनिमेटेड फीचर चित्रपटाने बड्या बड्या कलाकारांच्या चित्रपटांना धडक दिली आहे.. एकही मोठा कलाकार नसलेल्या या चित्रपटाने सैय्यारालाही टक्कर दिली आहे… चला तर मग जाणून घेऊयात १० दिवसांमध्ये महावतार नरसिंहा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे. अश्विन कुमार दिग्दर्शित हा चित्रपट भक्त प्रल्हादच्या कथेवर आणि महाअवतार नरसिंहाच्या अवतारावर आधारित असून एक वेगळंच प्रेक्षकांना या चित्रपटाच्या निमित्ताने अनुभवता येत आहे…
================================
=================================
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार महावतार नरसिंहा या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.७५ कोटी, दुसऱ्या दिवशी ४.६ कोटी, तिसऱ्या दिवशी ९.५ कोटी, चौथ्या दिवशी ६ कोटी, पाचव्या दिवशी ७.७ कोटी, सहाव्या दिवशी ७.७ कोटी, सातव्या दिवशी ७.५ कोटी, आठव्या दिवशी ७.७ कोटी, नवव्या दिवशी १५.४ कोटी, दहाव्या दिवशी २३.४ कोटी, अकराव्या दिवशी आत्तापर्यंत १.४९ कोटी कमवत एकूण ९२.७४ कोटींची कमाई केली आहे… त्यामुळे लवकरच हा अॅनिमेटेड चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार हे निश्चित आहे… (Mahavatar Narsimha box office collection)

हिंदीत एकीकडे ‘सैय्यारा’ (Saiyaara) चित्रपटाने अगदी सोनाक्षी सिन्हा, अजय देवगण यांच्या चित्रपटांना मागे टाकलं असताना दुसरीकडे आता महावतार नरसिंहा या चित्रपटाची धडक थेट ‘सन ऑफ सरदार २’, ‘किंगडम’ आणि ‘धडक २’ शी होणार आहे…त्यामुळे आता अॅनिमेटेड चित्रपट बड्या बड्या स्टार कलाकारांच्या चित्रपटांना मागे टाकण्याता सपाटा असाच सुरु ठेवणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे…(Animated movies in Indian cinema)
================================
हे देखील वाचा: Housefull 5 : थिएटर्सनंतर ओटीटीवर येणार मनोरंजनाची मेजवानी!
=================================
दरम्यान, होम्बले फिल्म्स आणि क्लिम प्रॉडक्शन्सने अधिकृतपणे अनेक अॅनिमेटेड चित्रपटांच्या सीरिजची घोषणा केली आहे. या फ्रँचायझीमधील आगामी महावतार परशुराम (२०२७), महावतार रघुनंदन (२०२९), महावतार धावकदेश (२०३१), महावतार गोकुलानंद (२०३३) आणि महावतार कल्की (२०३५-२०३७) या चित्रपटांचा समावेश आहे. (Homble films animated movie universe)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi