
२०२५ मध्ये MAMI Mumbai Film Festival होणार नाही!
मुंबईतील चित्रपटसृष्टीतील वर्तृळात मानाचा समजला जाणारा ‘मामी’ (MAMI Film Festival) चित्रपट महोत्सव म्हणजे प्रत्येक कलाकारासाठी एक पर्वणी असतो… नवोदित दिग्दर्शक किंवा कलाकराचा चित्रपट किंवा शोर्ट फिल्म मामीमध्ये फिचर झाली तर जगभरात ती कलाकृती यशस्वी ठरते हे समीकरण फिक्स आहे… मात्र, या वर्षी काही कारणास्तव ‘मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस’ अर्थात ‘MAMI मुंबई फिल्म्स फेस्टिव्हल’ रद्द करण्यात आला आहे…याबद्दलची अधिकृत माहिती फेस्टिवलच्या सोशल मिडियावरुन देण्यात आली असून फेस्टिव्हलचे संचालक शिवेंद्रसिंह डुंगरपूर यांनीही अधिक माहिती दिली आहे. (Entertainment)

इन्स्टाग्रामवरील शेअर करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की, “आम्हाला हे कळवण्यात खंत वाटत आहे की, २०२५ मधील MAMI फिल्म फेस्टिव्हल होणार नाही. या फेस्टिव्हलची नव्या टीमसह पुनर्रचना करण्यात येत आहे, जेणेकरून हा फेस्टिव्हल भारतासह जगभरातील स्वतंत्र आणि प्रादेशिक सिनेमांचा दर्जेदार मंच म्हणून पुन्हा उभा राहील. तसेच, लवकरच संपूर्ण फेस्टिवलची नव्याने आखणी करुन आम्ही २०२६ साठीच्या MAMI फेस्टिव्हलची तारीख लवकरच जाहिर करु”.
================================
हे देखील वाचा : Sonali Bendre : “मला वाटायचं मायकल जॅक्सनचं नाक…”
=================================
दरम्यान, १९९७ पासून मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज (MAMI) मार्फत आयोजित होणारा हा फिल्म फेस्टिव्हल दक्षिण आशियातील एक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव मानला जातो. आजवर या महोत्सवातून अनेक कलाकार घडले असून आज जागतिक पातळीवर गाजणारे मराठी, कलाकार अभिनेते या फेस्टिवलचा एकेकाळी भाग नक्कीच होते…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi