‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Mrunmayee Deshpande : “आरडाओरडा करून शो बंद पाडणाऱ्या…”, ‘मना’चे श्लोक’साठी मराठी कलाकार आले एकत्र
मराठी चित्रपट ‘मना’चे श्लोक’ नावामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता… काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यात चालु शो बंद पाडला होता.. यावरुन आता मराठी कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे… मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित आणि अभिनित या चित्रपटाला इंडस्ट्रीतील लोकांनी पाठिंबा दिला आहे… काय म्हणाले आहेत कलाकार जाणून घेऊयात… (Mrunmayee Deshpande movie)
अभिनेत्री नेहा शितोळे हिने पोस्ट करल लिहिले आहे की, “काल पुण्यात जे काही घडलं त्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. कलाकार म्हणून आमच्या कपड्यांवर, वैयक्तिक आयुष्यावर, आमच्या मतांवर, आम्ही निर्माण केलेल्या कलाकृतींवर तुमच्या मनात खरंतर स्वत:च्या आयुष्यात असमाधानी असण्याबद्दल आणि यंत्रणेविषयी असमाधानी असल्यामुळे साठलेला राग काढणं सोपं आहे. नुसतेच आपला साठलेला राग काढायला सिनेमाचे पोस्टर फाडणाऱ्यांनो…आमचं काम बंद करायला लावणाऱ्या, कायदा भंग करणाऱ्या ‘संस्कृती रक्षकांनो’ कधीतरी आयुष्यात नीट विचार करून कुठल्या विचाराला पाठिंबा द्यायचा आणि कुठल्या नाही हे ठरवा. आपल्या मनाचं ऐका…चिथवणाऱ्या लोकांचा हेतू समजून घ्या…’मना’चे श्लोक या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आणि कलाकारांबरोबर मी वैयक्तिकरित्या ठामपणे उभी आहे.” (Marathi entertainment news)

तर, राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक आशिष बेंडे लिहितो, “सिनेमाचं पोस्टर, टीझर येऊन बरेच दिवस झाले. त्याच हेच टायटल होतं, तेव्हा कुणी पेटून उठलं नाही. पण बरोबर प्रीमियरच्या दिवशीच भावना दुखावल्या जातात हे जरा गमतीशीर आहे. कोणाला काही प्रॉब्लेम असल्यास सेन्सॉर बोर्ड, कोर्ट यांच्याकडे ‘वेळेत’ जायला हवं होतं. सेन्सॉर वगैरे सह सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यावर शो बंद पाडणे आणि निर्मात्यांचं नुकसान तसेच जमलेल्या प्रेक्षकांचा रसभंग करणं हे मुळात बेकायदेशीर आहे.
================================
हे देखील वाचा : Manache Shlok : कुटुंब, प्रेम अन् मैत्रीची रंगतदार गोष्ट; धमाकेदार ट्रेलर रिलीज
================================
तर, सचिन गुरव म्हणतो की, “तिकडे जोरजोरात आरडाओरडा करून शो बंद पाडणाऱ्या किती लोकांना श्लोक पाठ आहेत? २५ ऑगस्टला सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासून हे लोक झोपले होते का? आधीच मराठी सिनेमा काठावर उभा राहून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करतोय आणि त्यात हे नवीन…”
या व्यतिरिक्त सायली संजीव, सोनाली कुलकर्णी, आदिनाथ कोठारे, गिरीजा ओक, सुहृद गोडबोले यांनी सुद्धा या घटनेचा निषेध नोंदवत आम्ही या चित्रपटाच्या टीमसोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत असं म्हटलं आहे… दकम्यान, कोर्टाने चित्रपटाचे शीर्षक ‘मना’चे श्लोक’ हे श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकाशी साधर्म्य असूनही, त्यांचा प्रत्यक्ष संबंध नसल्याचं सांगत या निरीक्षणानंतर कोर्टाने निर्मात्यांच्या बाजूने निर्णय दिला आणि चित्रपट प्रदर्शनासाठी मार्ग मोकळा केला होता…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi