‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Mrunmayee Deshpande : साडे बारा हजार फूट उंचीवर ‘’मना’चे श्लोक’चं चित्रीकरण
मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाचा टिझर, ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या चेकलिस्टमध्ये आली आहेत… सध्या इतर मराठी चित्रपटांसोबतच या चित्रपटाचे देखील प्रेक्षकांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे.. पण तुम्हाला माहित आहे का? या मराठी चित्रपटाचं चित्रिकरण कुठे झालं आहे? तर, हिमाचलच्या निसर्गरम्य वातावरणात सुमारे साडेबारा हजार फूट उंचीवर चित्रिकरण करण्यात आलं आहे… हिमाचलच्या हिरव्या पर्वतरांगांमध्ये या चित्रपटाचं शूटिंग करणं हे जितकं निसर्गरम्य दिसते, तितकेच ते आव्हानात्मकही होतं.

याबद्दल दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे म्हणते, ‘’हा प्रवास आमच्यासाठी खूपच अनोखा होता. इतक्या उंचीवर संपूर्ण टीमला घेऊन जाऊन चित्रीकरण करणं, हे खूपच मोठं आव्हान होतं. वॅनिटी वॅन, मेकअपसारख्या कोणत्याच गोष्टींचा आधार न घेता, सर्वांनी मिळून हा ट्रेक केला. सर्व कलाकारांनी आणि टीमने अपार मेहनत घेतली आहे. हा प्रवास प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.”
================================
=================================
‘मना’चे श्लोक’ चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपूटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब ही तरुण कलाकारांची तगडी फळी आहे. त्यांच्यासोबतच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे अनुभवी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ‘‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केलं असून, निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi