Sachin Pilgoankar आणि ‘क्योंकी सास भी…’ मालिकेचं कनेक्शन आहे तरी

Mandakini : नेपोटिझमच्या शर्यतीत मंदाकिनीच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या…
हिंदी चित्रपसृष्टीने ६० ते ९०च्या दशकात अनेक अजरामर चित्रपट प्रेक्षकांना दिले. बरं केवळ उत्तम चित्रपटच नव्हे तर एकाहूनएक दर्जेदार कलाकार भारतीय चित्रपटसृष्टीला लाभले. त्याच ८०च्या दशकात तुफान गाजलेला चित्रपट म्हणजे राम तेरी गंगा मैली (Ram Teri Ganga Maili). या चित्रपटात घाऱ्या डोळ्यांच्या अभिनेत्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि प्रत्येकाच्या मनात तिने घर केलं. ती अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी (Mandakini). खरंतर मोजक्या चित्रपटात जरी मंदाकिनीने काम केलं असलं तरी आजही राम तेरी गंगा मैली या चित्रपटामुळे तीचं काम अजरामर आहे. पण तुम्हाला माहित आहे का मंदाकिनीने काही वर्षांपूर्वी आपल्या मुलासोबत मोठ्या पडद्यावर काम केलं होतं. जाणून घेऊयात मंदाकिनीच्या कुटुंबियांबद्दल…

तर, मुळात मंदाकिनीचं खरं नाव यासमिन जोसेफ. तिचे वडिल जोसेफ हे ब्रिटिश नागरिक होते तर आई मुस्लिम होती. मंदाकिनीने आपल्या अभिनयाची सुरुवात १९८५ मध्ये ‘अंतारेर भालोबाशा’ या बंगाली चित्रपटातून केली होती; पण तिला खरी ओळख राज कपूर यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेल्या राम तेरी गंगा मैली या चित्रपटातून मिळाली. १९८५ ते १९९६ या काळात मंदाकिनीने (Mandakini) ‘डान्स डान्स’, ‘लडाई’, ‘नाग नागिन’, ‘प्यार के नाम कुर्बान’, ‘प्यार करके देखो’ अशा अनेक चित्रपटात काम करत १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘जोरदार’ या चित्रपटात शेवटचे काम करत मोठ्या पडद्यावरुन एक्झिट घेतली. त्यानंतर तब्बल २६ वर्षांनी आपल्या मुलासोबत म्हणजे रब्बिल ठाकूर सोबत तिने एका म्युझिक अल्बममधून पदार्पण केले होते खरं पण पुन्हा ती पूर्वीचा फेम मिळवू शकली नाही. (Bollywood tadka)

मंदाकिनीने (Mandakini) लग्नानंतर बौद्ध धर्म स्वीकारला होता हे माहित आहे का? तर झालं असं की १९९० मध्ये मंदाकिनीने पुर्व बौद्ध मॉंक डॉ. काग्युर टी. रिनपोछे ठाकूर यांच्याशी लग्न केलं होतं. आणि त्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारत दलाई लामा यांची ती अनुयायी देखील झाली होती. केवळ इतकंच नव्हे तर ज्यावेळी मंदाकिनी चित्रपटांमध्ये कामं करत होती त्यावेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत तिचे सुर जुळले होते अशा चर्चा सुरु झाल्या होत्या आणि त्यांच्या सोबत क्रिकेटच्या मॅच पाहण्यासाठी ती गेल्याचे फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे केवळ बॉल्ड सीन्स देऊनच मंदाकिनी चर्चेत राहिली नाही तर दाऊद सोबतच्या मैत्रीमुळेही ती लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली. (Bollywood Gossips)
===========
हे देखील वाचा : Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय
===========
सध्या बॉलिवूडमध्ये नेपोटिझमची जोरदार चर्चा आहे आणि बरेच नेपो किड्स चित्रपटांमधून आपल्या अभिनय, दिग्दर्शनाचा प्रवास सुरु करताना दिसत आहेत. पण हिंदी चित्रपटसृष्टीचं ८०चं दशक आपल्या अभिनय आणि सौंदर्याने गाजवणाऱ्या मंदाकिनीचा (Mandakini) मुलगा या फेम पासून लांब आहे. खरं तर आपल्या आवडत्या कलाकारांच्या पर्सनल लाईफमध्ये काय सुरु असतं हे जाणून घेण्यात चाहत्यांना उत्सुकता असतेच पण यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही कदाचित त्रास होऊ शकतो याचं भान राखलं जात नाही याचाही विचार करायला हवाय… (Trending News)