“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

Mangalashtaka Returns : थाटामाटात घटस्फोट घेण्याची धमाल गोष्ट येणार मोठ्या पडद्यावर
‘सुलट प्रेमाची उलट गोष्ट’ ही अनोखी टॅगलाइन असलेला ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ या चित्रपटात एक धमाल गोष्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा मनोरंजक टीजर लाँच करण्यात आला असून, त्यातून चित्रपटाची मजेशीर संकल्पना मांडणारा हा चित्रपट २३ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Mangalashtaka returns movie)

आपल्याकडे थाटामात लग्न करण्याची पद्धत आहे. मात्र थाटामाटात घटस्फोट घेण्याची धमाल मनोरंजक गोष्ट ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सुलट प्रेमाची उलट गोष्ट या टॅगलाइनमुळे या गोष्टीत काय काय ट्विस्ट अँड टर्न्स असणार याची उत्सुकता टीजरमुळे निर्माण झाली आहे. नेहमीपेक्षा एक वेगळी गोष्ट सांगणारा चित्रपट पाहण्यासाठी आता २३ मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. (Marathi upcoming movie)
=======================================
हे देखील वाचा: Waves Summit 2025: “प्रियांकाप्रमाणे हॉलिवूडमध्ये काम का करत नाही?”; करिना म्हणते….
========================================
वीर कुमार शहा यांनी निर्मिती केलेल्या ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केलं आहे. चित्रपटात वृषभ शाह, शीतल अहिरराव ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासह प्रसाद ओक, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, सोनल पवार, कमलेश सावंत, सुनील गोडबोले, प्रसन्न केतकर, प्राजक्ता नवले, भक्ती चव्हाण, शीतल ओसवाल, श्वेता खरात, समीर पौलस्ते यांच्याही भूमिका आहेत. (Mangalashtaka returns movie cast)