महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
या कव्वालीमधील चूक मनमोहन देसाईंनी दुरुस्ती केली…
मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांचा २७ मे १९७७ रोजी प्रदर्शित झालेला ‘अमर अकबर अँथनी’ हा ऑल टाईम ग्रेट मूव्ही आहे. हंड्रेड पर्सेंट एंटरटेनमेंट असं या सिनेमाचं सूत्र होतं. मसाला सिनेमाचा बाप म्हणून हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे. या सिनेमाबाबत खूप काही तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल. तरी नित्य नव्या गोष्टींचा खुलासा होत राहतो. या चित्रपटांमध्ये ऋषी कपूर याने अकबर ही भूमिका निभावली आहे. या चित्रपटात तो एक कव्वाली गाणारा कलावंत दाखवला आहे. त्याच्यावर चित्रित ‘परदा है परदा’ ही कव्वाली प्रचंड लोकप्रिय झाली होती. आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या या कव्वालीला संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी अतिशय जल्लोष जोश पूर्ण संगीत दिले होते. दिल खूष करून टाकणारी ही कव्वाली गायली होती मोहम्मद रफी यांनी. या कव्वालीचे शूटिंग देखील तितकेच जबरदस्त झाले होते. ऋषी कपूर ने बेफाम अदाकरी यात केली होती. सर्व काही व्यवस्थित झाले होते पण चित्रीकरणाच्या दरम्यान एक छोटीशी चूक झाली होती. ही चूक एडिटिंग टेबलवर सिनेमा आला त्या वेळेला लक्षात आली. काय होती ही चूक? आणि मनमोहन देसाई यांनी ती कशी दुरुस्त केली? मोठा मनोरंजक किस्सा आहे.
या कव्वालीच्या दरम्यान प्रेक्षकांमध्ये अमिताभ बच्चन बसलेला असतो. तो देखील या कव्वालीचा आनंद घेत असतो. या कव्वालीच्या अंतऱ्यामध्ये जेव्हा रफीचा स्वर अगदी टिपेला पोहोचतो आणि ऋषी कपूर म्हणतो ‘…. तो तो तो अकबर मेरा नाम नही!’ त्यावेळी अमिताभ बच्चन प्रेक्षकातून अचानक उठून जोरात म्हणतो ‘अकबर तेरा नाम नही!’ पण गंमत म्हणजे शूटिंगच्या वेळेला मात्र ‘अकबर मेरा नाम नही…’ असंच चित्रित झालं होतं! कारण रेकोर्डिंगच तसे झाले होते. गाणे रेकॉर्ड करताना अमिताभ वर ही ओळ चित्रित करायची हे कुठे ठरले होते? शूटच्या दरम्यान ऐनवेळी तसे ठरले. मग अमिताभ बच्चन कसा म्हणेल ? अकबर मेरा नाम नही….?
एडिटिंग टेबलवर ज्यावेळी हा चित्रपट आला आणि बारकाईने ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांच्या एडिटर कमलाकर कारखानीस यांच्या ते लक्षात आले आणि त्यांनी सांगितलं ज्यावेळी अमिताभ बच्चन वर आपण ही ओळ चित्रित करतो त्यावेळी तो ‘अकबर मेरा नाम नही’ असे कसे म्हणेल? हे चुकीचे आहे. काय करायचे. प्रश्न पडला. मनमोहन देसाई (Manmohan Desai) म्हणाले,” आपण रफीच्या स्वरामध्ये तेवढी ओळ पुन्हा एकदा रेकॉर्ड करूया आणि सुपर इम्पोज करू. त्यात रफी म्हणेल अकबर तेरा नाम नही….’ म्हणून देसाई यांनी रफी साहेबांना कॉन्टॅक्ट केला. परंतु तेंव्हा त्यांना असे कळाले की, रफी त्यावेळेला भारतात नव्हते तर लंडनमध्ये होते. आता काय करायचे? काहींनी सल्ला दिला किशोर कुमार कडून गाऊन घ्या. परंतु एका ओळीसाठी किशोर कुमारला रेकॉर्डिंग बोलवणे योग्य दिसत नव्हते.
तेव्हा म्हणून मोहम्मद रफी यांना फोन करून सांगितले तुम्हीच किशोर कुमारशी बोलून घ्या. परंतु गंमत म्हणजे ही ओळ किशोर कुमार कडून गाऊन न घेता अमित कुमार कडून गाऊन घेण्यात आली. आपण जर ‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटाची ध्वनिमुद्रिका बघितली तर तिथे आपल्याला या कव्वालीचे गायक म्हणून फक्त रफी आणि कोरस असाच उल्लेख दिसतो. पण अलीकडे wikipedia वर मात्र ही कव्वाली रफी आणि अमित कुमार यांनी गायली असे नमूद केले आहे. तुम्ही देखील ही कव्वाली तर काळजीपूर्वक ऐकली तर ती ओळ आपल्याला अमित कुमारच्या स्वरात असल्याचे जाणवेल.
=====
हे देखील वाचा : लतादीदींनी फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात गायला नकार दिला…
=====
या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित ‘माय नेम इज अँथनी गोन्साल्विस’ हे गाणेदेखील जबरदस्त गाजले होते अँथनी गोन्साल्विस या नावाचे भारतीय चित्रपट संगीतात एक मोठे म्युझिक अरेंजर होते हे अनेक संगीतकारांचे त्या अर्थाने गुरु होते लक्ष्मीकांत प्यारेलाल पासून आर डी बर्मन पर्यंत या सर्वांचे आदर्श होते. या महान म्युझिक अरेंजरला ट्रिब्यूट म्हणून या चित्रपटात अँथनी गोन्साल्विस हे या पात्राला हे या कॅरेक्टरला नाव देण्यात आले होते. यात या गाण्यामध्ये अमिताभ बच्चन ईस्टर एग मधून बाहेर येतो त्या वेळेला जो इंग्रजी कोट तो उद्धृत करतो तो वस्तुतः १८७८ साली इंग्लंडचे तत्कालीन प्रधानमंत्री Benjamin Disraeli यांनी संसदेत केलेल्या एका भाषणातील महत्वाचे वाक्य होते. ते वाक्य होते
“we want a wonderful wow wait
you see the whole country of the system is just
opposition by the dev glowing
because you are sapasticared by ralaration sophisticated rhetorician intoxicated with the exuberance of your own verbosity”